Friday, June 12, 2026

शब्दार्थ

CSS Level 2 - शब्दार्थ

शब्दार्थ

❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य, अमाप : संख्या मोजता न येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या काढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

शब्दार्थ

✅✅ समानार्थी शब्द ✅✅

● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार

● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पद्म, नलिनी

● अंधार : काळोख, तम, तिमिर

● अगत्य: आस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर

● ओढाळ: अनिर्बंध, उनाड, भटक्या

● एकवार : एकदा, एकवेळ

● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख

● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी

● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट

● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ

● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व

● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम

● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा

● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य

● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा

● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष

● अनमान : हयगय, उपेक्षा, दुर्लक्ष, अनादर

● अचानक : अनपेक्षित, एकाएकी

● आघात : धक्का, चोट, प्रहार

Visit for more information

Copyright © 2026 VisionGov Academy. All rights reserved.

No comments:

Post a Comment

रक्ताभिसरण संस्था: रचना, कार्य व विकार - MPSC Complete Notes

रक्ताभिसरण संस्था: रचना, कार्य व विकार - MPSC Complete Notes विद्यार्थी मित्रांनो, MPSC, PSI, Talathi परीक्षेत विज्ञान विषयात...