सिंधू संस्कृती / हडप्पा संस्कृती: जगातील पहिली नागरी संस्कृती - संपूर्ण माहिती 75+ PYQ
लेखक: Prashant Sir | VisionGovAcademy
मित्रांनो, प्राचीन भारताच्या इतिहासात 'सिंधू संस्कृती' हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. UPSC Prelims, MPSC, पोलीस भरती, तलाठी, SSC, रेल्वे या सर्व परीक्षेत 2 ते 3 प्रश्न हमखास येतात. या लेखात आपण 2500 BC ते 1750 BC मधील या महान संस्कृतीची A to Z माहिती नकाशा, फोटो आणि 75+ प्रश्नांसह बघणार आहोत.शेवटपर्यंत वाचा. एक पण मार्क जाणार नाही.
चित्र: सिंधू संस्कृतीचा विस्तार - हडप्पा ते लोथल, मांडा ते दायमाबाद
1. सिंधू संस्कृती: एका नजरेत - 10 Basic Facts for Exam
| मुद्दा | माहिती | Exam Trick |
|---|---|---|
| दुसरी नावे | हडप्पा संस्कृती, सिंधू-सरस्वती संस्कृती, कांस्ययुगीन संस्कृती | हडप्पा आधी सापडला म्हणून नाव |
| कालखंड | इ.स.पू. 3300 ते 1300. परिपक्व काळ: 2600 ते 1900 BC | UPSC ला काळ विचारतात |
| प्रथम शोध | 1921 - दयाराम साहनी - हडप्पा. 1922 - राखालदास बॅनर्जी - मोहेंजोदडो | नाव + वर्ष + ठिकाण पाठ करा |
| क्षेत्रफळ | 12.5 लाख चौ. किमी. इजिप्त व मेसोपोटेमियापेक्षा मोठी. | सगळ्यात मोठी प्राचीन संस्कृती |
| विस्तार | त्रिकोणी. उत्तर: मांडा. दक्षिण: दायमाबाद. पूर्व: आलमगीरपूर. पश्चिम: सुत्कागेंडोर | 4 सीमा पाठ करा |
| नदी | सिंधू व तिच्या उपनद्या, सरस्वती/घग्गर-हाक्रा नदीच्या खोऱ्यात | सरस्वती नदी महत्वाची |
| वैशिष्ट्य | जगातील पहिली 'नियोजित' नागरी संस्कृती. 'गटार व्यवस्था' साठी प्रसिद्ध. | 1 नंबर वैशिष्ट्य |
| लिपी | चित्रलिपी. 400 ते 600 चिन्हे. 'Boustrophedon' पद्धत. | आजपर्यंत वाचता आलेली नाही |
| धातू | तांबे, कांस्य, सोने, चांदी. लोखंड माहीत नव्हते. | कांस्ययुग - Bronze Age |
| प्राणी | बैल, हत्ती, गेंडा, वाघ माहीत. घोडा माहीत नव्हता. | घोडा = महत्वाचा मुद्दा |
2. सिंधू संस्कृतीचा शोध: 1856 ते 1924 चा प्रवास
1856 मध्ये ब्रिटिशांनी कराची-लाहोर रेल्वे लाईन टाकताना हडप्पा येथील ढिगाऱ्यातील विटा वापरल्या. पण त्याचे महत्व कोणाला कळले नाही.
टप्प्याटप्प्याने शोध:
- 1856: जनरल कनिंगहॅम यांनी हडप्पाला भेट दिली. काही शिक्के मिळाले पण महत्व कळले नाही.
- 1921 - हडप्पा: भारतीय पुरातत्व विभागाचे दयाराम साहनी यांनी पंजाबातील हडप्पा येथे उत्खनन केले. एक प्राचीन शहर सापडले. 6 धान्याची कोठारे सापडली.
- 1922 - मोहेंजोदडो: राखालदास बॅनर्जी यांनी सिंध प्रांतातील मोहेंजोदडोचा शोध लावला. 'मोहेंजोदडो' म्हणजे सिंधी भाषेत 'मृतांचा ढिगारा'.
- 1924 - घोषणा: सर जॉन मार्शल यांनी 'Illustrated London News' मध्ये लेख लिहून जगाला सांगितले की ही 'इजिप्त व मेसोपोटेमियाच्या समकालीन' एक महान नागरी संस्कृती आहे.
3. सिंधू संस्कृतीचा विस्तार: 4 राज्ये + 2 देश + 1500 स्थळे
ही संस्कृती फक्त सिंधू नदीपूरती मर्यादित नव्हती. तिचा विस्तार त्रिकोणी आकारात 12.5 लाख चौ. किमी होता. आजपर्यंत 1500+ स्थळे सापडली आहेत.
A] चारही दिशांच्या सीमा:
| दिशा | सीमेवरील ठिकाण | सध्याचे राज्य/देश | नदी | वैशिष्ट्य |
|---|---|---|---|---|
| उत्तर | मांडा | जम्मू-काश्मीर, भारत | चिनाब | सर्वात उत्तरेकडील |
| दक्षिण | दायमाबाद | महाराष्ट्र, भारत | प्रवरा-गोदावरी | सर्वात दक्षिणेकडील. रथाचे पुरावे |
| पूर्व | आलमगीरपूर | उत्तर प्रदेश, भारत | हिंडन-यमुना | सर्वात पूर्वेकडील |
| पश्चिम | सुत्कागेंडोर | बलुचिस्तान, पाकिस्तान | दाश्क | सर्वात पश्चिमेकडील. बंदर |
B] 10 महत्वाची स्थळे व त्यांची A to Z माहिती:
4. नगररचना: 4500 वर्षांपूर्वीचे Smart City
सिंधू लोकांचे 'नगर नियोजन' हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. 4500 वर्षांपूर्वीचे शहर आजच्या शहरांपेक्षा भारी होते. जगात कुठेच अशी व्यवस्था नव्हती.
A] शहराची रचना - 'Grid Pattern' - जाळीदार पद्धत
- संपूर्ण शहर 2 भागात विभागलेले: 1. पश्चिमेकडील उंचवटा 'दुर्ग/गढ़ी' (Citadel) - राज्यकर्ते, पुरोहित, धान्याची कोठारे. 2. पूर्वेकडील सखल भाग 'खालचे शहर' (Lower Town) - सामान्य लोक, व्यापारी, कारागीर राहत.
- रस्ते एकमेकांना 90° कोनात छेदत. 'जाळीदार पद्धत' - Grid System. आजच्या चंदीगड, न्यू यॉर्क सारखी.
- मुख्य रस्त्याची रुंदी 10.5 मीटर - 34 फूट. लहान रस्ते 1.5 ते 3 मीटर. रस्त्यावर दिवे लावण्याची सोय.
- घरे भाजलेल्या विटांची. 1:2:4 प्रमाणात विटा - लांबी:रुंदी:जाडी. प्रत्येक घरात आंगण, स्नानगृह, स्वयंपाकघर, विहीर. 2 मजली घरे पण होती.
- खिडक्या रस्त्यावर उघडत नव्हत्या - Privacy साठी. मुख्य दरवाजा लहान रस्त्यावर.
B] जगातील पहिली 'गटार व्यवस्था' - Drainage System - 1 नंबर
- प्रत्येक घरातील सांडपाणी व पावसाचे पाणी घराबाहेरील नाल्यात सोडले जाई. स्नानगृहातून उतार असलेली मोरी.
- रस्त्याच्या दुतर्फा झाकलेली गटारे. विटा व दगडी फरशा वापरून बनवली. वरून दगडी फरशा.
- ठराविक अंतरावर 'Manhole' होते. साफसफाई साठी. 'सोकपिट' - Soak Pit पण होते.
- मोठ्या नाल्याला मिळण्यापूर्वी 'संडास' - Cesspit बसवले होते. घाण वाळू अडवण्यासाठी. नंतर काढून टाकत.
- महत्व: 4500 वर्षांपूर्वीची ही व्यवस्था आजच्या मुंबई-पुण्यात पण नाही. स्वच्छतेला किती महत्व देत होते हे कळते.
C] 'मोठे स्नानगृह' - Great Bath, मोहेंजोदडो - धार्मिक केंद्र
- लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर, खोली 2.4 मीटर. तळाला भाजलेल्या विटा व जिप्समचे प्लास्टर - पाणी गळू नये म्हणून.
- पाणी बाहेर काढण्यासाठी मोठे नाल. बाजूला कपडे बदलण्याच्या खोल्या. पाणी भरण्यासाठी विहीर.
- उपयोग: धार्मिक विधीसाठी किंवा सार्वजनिक स्नानासाठी वापरत असावेत. आजच्या 'कुंभमेळ्या' सारखे.
D] धान्याची कोठारे - Granaries - हडप्पा व मोहेंजोदडो
- हडप्पा येथे 6 कोठारे - 50x20 मीटर. मोहेंजोदडो येथे सर्वात मोठे - 45x15 मीटर.
- खालून हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा. उंदीर येऊ नयेत म्हणून.
- राज्याचा धान्यसाठा. कराच्या रूपात धान्य जमा करत.
5. सामाजिक व आर्थिक जीवन: समतावादी समाज
A] समाजव्यवस्था:
- 4 वर्ग: 1. विद्वान/पुरोहित - दुर्ग भागात राहत. 2. योद्धे - फार कमी शस्त्रे सापडली. 3. व्यापारी - शिक्के वापरत. 4. कामगार/शेतकरी/कारागीर - खालच्या शहरात.
- मातृसत्ताक पद्धत: मातृदेवतेच्या खूप मूर्ती सापडल्या. स्त्रियांचा मान मोठा होता. संपत्ती आईकडून मुलीकडे.
- खाद्य: गहू, जव, वाटाणा, तीळ, मोहरी, खजूर. मांसाहार - मासे, कोंबडी, डुक्कर. तांदूळ लोथल व रंगपूर येथे. 'लस्सी' पित होते.
- पोशाख: कापूस व लोकरीचे कपडे. जगात सर्वात आधी कापूस पिकवला - याला ग्रीक लोक 'सिंडॉन' म्हणत. पुरुष कमरेला वस्त्र व अंगावर शाल - डाव्या खांद्यावरून. स्त्रिया पटका व स्कर्ट. 'सिंदूर' वापरत. लिपस्टिक, काजळ, उटणे वापरत.
- मनोरंजन: सोंगट्या, फासे खेळत. नृत्य, संगीत आवडत. 'नर्तिकेचा पुतळा' पुरावा.
B] शेती: मुख्य व्यवसाय
- पिके: गहू, जव, मोहरी, तीळ, कापूस, वाटाणा. तांदूळ लोथल व रंगपूर. ऊस माहीत नव्हता.
- नांगराचा शोध: कालीबंगन येथे 'नांगरलेले शेत' सापडले. लाकडी नांगर व बैल वापरत. जगात प्रथम.
- सिंचन: कालवे - शॉर्टूघाई, अफगाणिस्तान येथे. 'बंधारे' बांधत. 'रहाट' वापरत.
- प्राणी: कुत्रा, मांजर, बैल - एकशिंगी, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ, हरीण, माकड पाळत. 'घोडा' माहीत नव्हता. सुरकोटडा येथे घोड्याचे हाड सापडले, पण ते 2000 BC नंतरचे. त्यामुळे वादग्रस्त आहे.
C] व्यापार: अंतर्गत + परदेशी - शिक्क्यांचा वापर
- अंतर्गत व्यापार: बैलगाडी व होडीने. 'बैलगाडी' चे मातीचे खेळणे सापडले. 'जहाजाचा शिक्का' लोथल येथे सापडला.
- परदेशी व्यापार: मेसोपोटेमिया - इराक, ओमान - माकन, बहारीन - दिल्मुन, इराणशी व्यापार. त्यांच्या लिपीत 'मेलुह्हा' देशाचा उल्लेख आहे. तो हडप्पाच.
- निर्यात: कापूस - याला ग्रीक लोक 'सिंडॉन' म्हणत, मणी, हस्तिदंत, लाकूड, मोर.
- आयात: सोने - कर्नाटक (कोलार), चांदी - अफगाणिस्तान, इराण, तांबे - राजस्थान (खेत्री), , नीलम - बदक्षान (अफगाणिस्तान), फीरोजा - इराण, शंख - गुजरात, मोती - समुद्र.
6. धर्म व कला: मूर्तीपूजा होती, मंदिरे नव्हती
A] धर्म: प्रोटो-हिंदू धर्माची सुरुवात
- मातृदेवता: सर्वात जास्त पूजा. मातीच्या मूर्ती सापडल्या. डोक्यावर पंख्यासारखा मुकुट. ही 'शक्ती' ची उपासना. आजच्या 'दुर्गा' चे मूळ रूप.
- पशुपती शिव: एका शिक्क्यावर 3 तोंडे असलेला, डोक्यावर शिंगे असलेला, योगासनात - पद्मासनात बसलेला पुरुष. आजूबाजूला हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस. खाली हरीण. याला 'आदि-शिव' किंवा 'प्रोटो-शिव' म्हणतात. आजच्या 'शिव' चे मूळ रूप.
- निसर्गपूजा: पिंपळाच्या झाडाची पूजा. नागाची पूजा. अग्नीची पूजा - कालीबंगन व लोथल येथे 'अग्निकुंडे' सापडली. पाण्याची पूजा - Great Bath.
- मंदिरे नव्हती: एकही मंदिर सापडले नाही. मूर्तीपूजा घरात किंवा उघड्यावर करत. पुरोहित वर्ग होता.
- मृत्यू नंतर: मृतदेह पुरत - 3 पद्धती. 1. पूर्ण शरीर उत्तर-दक्षिण पुरत. 2. अर्धे जाळून हाडे पुरत. 3. जंगलात ठेवून नंतर फक्त हाडे पुरत. हडप्पा येथे 'R-37' स्मशानभूमी.
B] कला: कांस्ययुगातील उत्कृष्ट कला
- मूर्तिकला: 1. 'नर्तिकेचा काशाचा पुतळा' - मोहेंजोदडो. 11.5 सेमी. उजव्या हातात 4 बांगड्या. डावा हात कमरेवर. गर्विष्ठ चेहरा. 'Lost Wax' पद्धत. 2. 'दाढीवाल्या पुरोहिताचा' दगडी पुतळा - 17.5 सेमी. शाल पांघरलेला. डोळे अर्धे मिटलेले. 3. 'लाल दगडी पुरुषाचे धड' - हडप्पा.
- शिक्के: 2000+ शिक्के. भाजलेल्या मातीचे, Steatite दगडाचे. चौकोनी. 'एकशिंगी बैल' - Unicorn 60% शिक्क्यांवर. वाघ, हत्ती, गेंडा, मगर पण आहेत. मागे आरसा व कंगवा असलेल्या स्त्रिया.
- मातीची भांडी: चाकावर बनवलेली - Wheel Made Pottery. लाल रंग व काळ्या रंगाची नक्षी. झाडे, प्राणी, भौमितिक आकार, मोर. 'गोब्लेट' - पिण्याचे भांडे.
- मणी: चन्हुदडो व लोथल येथे कारखाने. सोने, चांदी, तांबे, Steatite, Agate, Carnelian दगडाचे. 'Etched Carnelian Beads' प्रसिद्ध.
7. सिंधू लिपी: न उलगडलेले कोडे - 100 वर्ष झाली
- प्रकार: चित्रलिपी - Pictographic. 400 ते 600 चित्रे/चिन्हे. इजिप्तच्या Hieroglyphics सारखी.
- लिहिण्याची पद्धत: 'Boustrophedon' - ग्रीक शब्द. अर्थ: 'बैलाने नांगर चालवावा तशी'. एक ओळ उजवीकडून डावीकडे, दुसरी डावीकडून उजवीकडे.
- सापडली कुठे: शिक्क्यांवर, मातीच्या भांड्यांवर, तांब्याच्या पट्ट्यांवर, शस्त्रांवर. 5000+ लेख सापडले.
- सर्वात मोठा लेख: 26 अक्षरांचा. सरासरी 5 अक्षरे. सर्वात लहान 1 अक्षर.
- वाचता का येत नाही: 1. द्विभाषिक लेख - Rosetta Stone सारखा सापडला नाही. इजिप्तची लिपी ग्रीक सोबत होती म्हणून वाचली. 2. ओळी खूप लहान. 3. कोणती भाषा आहे ते माहित नाही - संस्कृत, द्रविड, मुंडा? 4. 100 वर्ष प्रयत्न करून पण नाही जमले.
- प्रयत्न: फिनलंडचे Asko Parpola, भारताचे Iravatham Mahadevan यांनी प्रयत्न केले. संगणक वापरला पण जमले नाही.
8. सिंधू संस्कृतीचा नाश: इ.स.पू. 1900 ते 1300 - 7 प्रमुख कारणे
इ.स.पू. 1900 नंतर ही महान संस्कृती हळूहळू लयाला गेली. इ.स.पू. 1300 पर्यंत पूर्ण नष्ट झाली. कारणे नक्की माहित नाहीत. 7 सिद्धांत आहेत.
- 1. आर्यांचे आक्रमण - रामप्रसाद चंदा, मोर्टिमर व्हीलर: ऋग्वेदात इंद्राला 'पुरंदर' - पुरांचा विध्वंस करणारा म्हटले आहे. मोहेंजोदडो येथे 13 सांगाडे एका खोलीत सापडले. त्यावर वार केलेले. पण आता हा सिद्धांत नाकारला आहे. कारण: 1. सांगाडे वेगवेगळ्या काळातील. 2. आर्य इ.स.पू. 1500 मध्ये आले, संस्कृती इ.स.पू. 1900 ला नष्ट व्हायला लागली. 3. घोडा, लोखंड, रथ आर्यांनी आणले, सिंधू लोकांना माहीत नव्हते.
- 2. पूर - एम.आर.साहनी, मार्शल: सिंधू नदीला वारंवार पूर येत. मोहेंजोदडो 7 वेळा बुडून पुन्हा वसले. गाळाचे 9 मीटर थर सापडले. टेक्टॉनिक हालचालींमुळे जमीन उंच-सखल झाली.
- 3. दुष्काळ व हवामान बदल - सर्वात मान्य सिद्धांत: सरस्वती नदी कोरडी पडली - 2000 BC. मान्सून कमजोर झाला. 200-300 वर्षे दुष्काळ पडला. लोक स्थलांतरित झाले - पूर्वेकडे गंगा-यमुना खोऱ्यात, दक्षिणेकडे गुजरात, महाराष्ट्रात. 'राखीगढी' चे DNA टेस्ट वरून सिद्ध झाले.
- 4. भूकंप: कालीबंगन येथे भूकंपाचे पुरावे. घरे कोसळली. जमीन फाटली. नद्यांचे प्रवाह बदलले.
- 5. जंगलतोड व पर्यावरण नाश: विटा भाजण्यासाठी, तांबे वितळवण्यासाठी जंगले तोडली. जमीन नापीक झाली. वाळवंट वाढले - थरचे वाळवंट.
- 6. बाह्य आक्रमण: मेसोपोटेमियातील लोकांचे किंवा बलुची टोळ्यांचे आक्रमण. पण पुरावे कमी.
- 7. महामारी: प्लेग किंवा कॉलरा सारखी साथ. मोहेंजोदडो येथील 13 सांगाडे याचा पुरावा असू शकतो.
9. परीक्षेसाठी 75 VVI प्रश्न-उत्तरे - One Liner - 25 नवीन
- सिंधू संस्कृतीतील लोक 'कापूस' पिकवत होते का? उत्तर: होय, जगात सर्वात आधी.
- कापसाला ग्रीक लोक काय म्हणत? उत्तर: सिंडॉन - Sindon
- सिंधू लोक 'ऊस' पिकवत होते का? उत्तर: नाही.
- सिंधू संस्कृतीत 'लोखंडाचा' वापर होता का? उत्तर: नाही. ते कांस्ययुग होते.
- 'हस्तिदंती पट्टी' कोठे सापडली? उत्तर: लोथल - मोजमापासाठी
- सिंधू लोक 'शंख' चा वापर कशासाठी करत? उत्तर: बांगड्या, भांडी बनवण्यासाठी
- कोणत्या ठिकाणी 'सोकपिट' सापडले? उत्तर: मोहेंजोदडो व हडप्पा
- सिंधू संस्कृतीतील 'सर्वात मोठे' धान्याचे कोठार कोठे आहे? उत्तर: मोहेंजोदडो
- 'रथ' चे पुरावे कोठे मिळाले? उत्तर: दायमाबाद - काशाचे 4 रथ
- सिंधू लोक 'युद्धखोर' होते का? उत्तर: नाही, फार कमी शस्त्रे सापडली. शांतताप्रिय.
- कोणत्या ठिकाणी 'मण्यांचा कारखाना' होता? उत्तर: चन्हुदडो व लोथल
- 'इट्च्ड कार्नेलियन बीड्स' कशाचे बनलेले? उत्तर: अगेट दगडाचे - पांढरी नक्षी
- सिंधू संस्कृती 'समतावादी' होती याचा पुरावा काय? उत्तर: घरे सारख्याच आकाराची. श्रीमंत-गरीब भेद नाही.
- 'महाविद्यालय' इमारत कोठे सापडली? उत्तर: मोहेंजोदडो
- सिंधू लोक 'वजने' कशाची बनवत? उत्तर: पायाची - Chert दगड
- कोणत्या ठिकाणी 'जलाशये' सापडली? उत्तर: धोलावीरा - 16 जलाशये
- 'साइनबोर्ड' कोठे सापडला? उत्तर: धोलावीरा - 10 मोठी अक्षरे
- सिंधू संस्कृतीचे 'बंदर' कोणते? उत्तर: लोथल व सुत्कागेंडोर
- मेसोपोटेमियन लिपीत सिंधू संस्कृतीला काय म्हणत? उत्तर: मेलुह्हा
- सिंधू लोक कोणत्या 'दिशेला' डोके करून मृतदेह पुरत? उत्तर: उत्तर-दक्षिण
- 'आर्यांचे आक्रमण' सिद्धांत कोणी मांडला? उत्तर: रामप्रसाद चंदा व मोर्टिमर व्हीलर
- 'पूर' सिद्धांत कोणी मांडला? उत्तर: एम.आर.साहनी
- सिंधू संस्कृतीचे 'पतन' कधी सुरू झाले? उत्तर: इ.स.पू. 1900
- सिंधू संस्कृती 'संपूर्ण नष्ट' कधी झाली? उत्तर: इ.स.पू. 1300
- सिंधू संस्कृतीचा 'उत्तराधिकारी' कोणती संस्कृती? उत्तर: वैदिक संस्कृती - पण 600 वर्षांचे अंतर
10. FAQ - वारंवार विचारले जाणारे 10 प्रश्न
Ans: होय. हडप्पा आधी सापडले म्हणून 'हडप्पा संस्कृती' नाव पडले. पण सिंधू नदीच्या खोऱ्यात असल्याने 'सिंधू संस्कृती' पण म्हणतात. आता 'सिंधू-सरस्वती संस्कृती' म्हणतात कारण सरस्वती नदीच्या खोऱ्यात पण स्थळे सापडली.
Ans: होय, चित्रलिपी होती. 400-600 चिन्हे. पण आजपर्यंत वाचता आलेली नाही. त्यामुळे याला 'प्रागैतिहासिक' काळ म्हणतात.
Ans: नाही. मोहेंजोदडो, हडप्पा येथे घोड्याचे पुरावे नाहीत. सुरकोटडा येथे हाडे सापडली पण ती 2000 BC नंतरची. त्यामुळे वादग्रस्त. आर्यांनी घोडा आणला.
Ans: 1. नियोजित नगररचना - Grid Pattern. 2. गटार व्यवस्था. 3. भाजलेल्या विटांची घरे. 4. सार्वजनिक इमारती - Great Bath, Granary. 5. वजने-मापे, शिक्के - व्यापार.
Ans: होय. पुरावे: 1. मातृदेवता मूर्ती. 2. पशुपती शिव शिक्का. 3. अग्निकुंडे. 4. पिंपळ, नाग पूजा. 5. Great Bath - धार्मिक स्नान. पण मंदिरे नव्हती.
Ans: नाही. आता हा सिद्धांत नाकारला आहे. मुख्य कारणे: हवामान बदल, सरस्वती नदी कोरडी पडणे, पूर, दुष्काळ. आर्य 1500 BC मध्ये आले, संस्कृती 1900 BC ला नष्ट व्हायला लागली.
Ans: धार्मिक विधीसाठी - पवित्र स्नान. आजच्या 'कुंभमेळ्या' सारखे. किंवा राजा-पुरोहितांच्या खास स्नानासाठी.
Ans: दोन्ही. गहू, जव, भाज्या खात. मासे, कोंबडी, डुक्कर, मेंढीचे मांस पण खात. हाडे सापडली आहेत.
Ans: दोन्ही देशांची. 1947 पूर्वी अखंड भारत होता. 60% स्थळे पाकिस्तानात - हडप्पा, मोहेंजोदडो. 40% भारतात - लोथल, कालीबंगन, धोलावीरा, राखीगढी. ही 'भारतीय उपखंडाची' संस्कृती आहे.
Ans: UPSC Prelims - 1 ते 2 प्रश्न दरवर्षी. MPSC - 2 ते 3 प्रश्न. पोलीस भरती - 1 ते 2 प्रश्न. तलाठी - 1 प्रश्न. सगळ्यात महत्वाचा टॉपिक.
11. 1 मिनिट Revision Trick - 10 Points
2. काळ: 2600-1900 BC - परिपक्व. कांस्ययुग.
3. सीमा: मांडा - उत्तर. दायमाबाद - दक्षिण. आलमगीरपूर - पूर्व. सुत्कागेंडोर - पश्चिम.
4. मोठे शहर: मोहेंजोदडो. सर्वात मोठे - राखीगढी.
5. वैशिष्ट्य: नगररचना + गटार व्यवस्था - 1 नंबर.
6. Great Bath: मोहेंजोदडो. गोदी - लोथल. नांगरलेले शेत - कालीबंगन. जलाशये - धोलावीरा.
7. लिपी: चित्रलिपी. वाचता आलेली नाही. Boustrophedon.
8. धर्म: मातृदेवता + पशुपती शिव. मंदिरे नाहीत.
9. माहीत नव्हते: लोखंड, घोडा, ऊस, तलवार.
10. पतन: हवामान बदल + सरस्वती नदी कोरडी + पूर + दुष्काळ. आर्यांचे आक्रमण नाही.

Post a Comment