⏱️ काळ, काम आणि वेग कसे सोडवायचे?
Police Bharti • Talathi • ZP • MPSC • SSC साठी 3 मार्क पक्के | Prashant Sir ची झ्याटू ट्रिक
1. काळ काम वेग म्हणजे काय? सोप्या भाषेत
मित्रांनो, काळ-काम-वेग म्हणजे कोणी किती वेळात किती काम करतो. A ला एक काम करायला 10 दिवस लागतात, B ला 20 दिवस लागतात, तर दोघे मिळून किती दिवसात करतील? हाच प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीत येतो.
Golden Rule: जो जास्त काम करतो त्याचा वेग जास्त. A 10 दिवसात करतो, B 20 दिवसात करतो. म्हणजे A ची Speed, B च्या दुप्पट आहे. कारण A निम्म्या वेळात काम संपवतो.
2. सगळ्यात महत्वाचे 4 Formula | दगडावरची रेघ
Formula 1: काम = वेग × वेळ
परीक्षेत एकूण काम = 1 मानायचं किंवा LCM घ्यायचं.
Formula 2: A आणि B एकत्र काम करतात
A ला 10 दिवस, B ला 20 दिवस. तर 1/10 + 1/20 = 3/20 काम 1 दिवसात. पूर्ण काम = 20/3 = 6.66 दिवस.
Formula 3: A सोडून गेला तर
Formula 4: पुरुष-महिला-मुले
M=माणसे, D=दिवस, H=तास. काम समान असेल तरच वापरायचं.
3. Prashant Sir ची "LCM ट्रिक" | 5 सेकंदात उत्तर
Trick: LCM ची ट्रिक कशी वापरायची?
Step 1: दिलेल्या दिवसांचा LCM काढा. तेच एकूण काम समजा.
Step 2: LCM / दिवस = 1 दिवसाचे काम (Efficiency).
Step 3: एकूण काम / एकत्रित Efficiency = लागणारे दिवस.
उदाहरण: LCM ट्रिक ने सोडवूया
Q: A ला 10 दिवस, B ला 15 दिवस लागतात. दोघे मिळून किती दिवसात करतील?
Step 1: 10 आणि 15 चा LCM = 30. म्हणजे एकूण काम = 30 Unit समजा.
Step 2: A 1 दिवसात = 30/10 = 3 Unit काम करतो. B 1 दिवसात = 30/15 = 2 Unit काम करतो.
Step 3: दोघे मिळून 1 दिवसात = 3+2 = 5 Unit काम करतात.
Step 4: 30 Unit काम करायला = 30/5 = 6 दिवस. उत्तर.
फायदा: अपूर्णांक येत नाही. 1/10 + 1/15 करायची गरज नाही. थेट पूर्णांकात उत्तर.
4. Police Bharti Important Questions | 25 Solved
Q1. [Basic]
A एक काम 12 दिवसात करतो, B तेच काम 18 दिवसात करतो. दोघे मिळून किती दिवसात करतील?
A=36/12=3, B=36/18=2. एकत्र=5 Unit/day.
Time=36/5 = 7.2 दिवस = 7 दिवस 4 तास 48 मिनिटे. उत्तर.
Q2. [एक सोडून गेला]
A आणि B एक काम 15 दिवसात करतात. 6 दिवस काम केल्यावर A सोडून गेला. उरलेले काम B ने 18 दिवसात केले. तर A एकटा किती दिवसात करेल?
उरलेले काम=1-2/5=3/5. हे B ने 18 दिवसात केले.
B चे 1 दिवसाचे काम = (3/5)/18 = 3/90 = 1/30. म्हणजे B ला 30 दिवस लागतात.
A चे 1 दिवसाचे काम = 1/15 - 1/30 = 1/30. म्हणजे A ला 30 दिवस. उत्तर.
Q3. [पुरुष-महिला]
2 पुरुष किंवा 3 महिला एक काम 8 दिवसात करतात. तर 1 पुरुष आणि 2 महिला मिळून किती दिवसात करतील?
1M + 2W = 1.5W + 2W = 3.5W.
3W लोकांना 8 दिवस लागतात. 1W ला = 3×8=24 दिवस.
3.5W लोकांना = 24/3.5 = 240/35 = 48/7 दिवस = 6.85 दिवस. उत्तर.
Q4. [पाईप आणि टाकी]
एक नळ टाकी 4 तासात भरतो, दुसरा नळ 6 तासात रिकामी करतो. दोन्ही एकत्र चालू केले तर टाकी किती वेळात भरेल?
भरणारा नळ = +12/4=+3 L/hr. रिकामा करणारा = -12/6=-2 L/hr.
एकत्र = 3-2=1 L/hr भरेल.
Time=12/1 = 12 तास. उत्तर.
Q5. [कठीण]
A हा B पेक्षा 50% जास्त काम करतो. B एकटा 12 दिवसात काम करतो. तर A आणि B मिळून किती दिवसात करतील?
B चे 1 दिवसाचे काम=1/12. A चे=1.5×1/12=1/8. म्हणजे A ला 8 दिवस.
एकत्र=1/8+1/12=5/24. Time=24/5 = 4.8 दिवस. उत्तर.

Post a Comment