कोतवाल भरती - सराव पेपर 2026

📝 VisionGov - कोतवाल / तलाठी Mock Test

GK + गणित + मराठी + चालू घडामोडी
👮‍♂️

तयार आहात का?

प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. Test निवडा आणि सुरू करा.

⏱️ 60:00📝 50 प्रश्न🎯 100 गुण
🎯

तुमचा निकाल

कोतवाल भरती 2026 - संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम आणि पगार

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागामार्फत कोतवाल भरती 2026 ला सुरुवात झाली आहे. गृह विभागात 2000 जागा आणि महसूल विभागात कोतवाल पदासाठी हजारो जागा रिक्त आहेत. या लेखात आपण कोतवाल पदाची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

1. कोतवाल म्हणजे काय? काम काय असते?

कोतवाल हा गाव पातळीवरील महसूल विभागाचा महत्वाचा कर्मचारी असतो. त्याची नेमणूक जिल्हाधिकारी (Collector) करतात. त्याचे मुख्य काम तलाठी आणि ग्रामपंचायतीला मदत करणे, शासकीय नोटीस बजावणे, गावातील माहिती गोळा करणे आणि महसूल वसुलीसाठी मदत करणे हे आहे. हे पद पूर्णपणे शासकीय असून पगार राज्य शासनातून दिला जातो.

2. कोतवाल भरतीसाठी पात्रता काय?

  • शिक्षण: किमान 4थी पास (काही जिल्ह्यात 7वी/10वी मागितली जाते)
  • वय: 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 45 वर्षे)
  • निवास: त्याच गावचा किंवा तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक
  • भाषा: मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

3. कोतवाल भरतीचा अभ्यासक्रम (Syllabus)

वरील Mock Test याच अभ्यासक्रमावर आधारित आहे:

विषयगुण
मराठी व्याकरण25
अंकगणित / गणित25
सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता25
चालू घडामोडी25

4. कोतवालचा पगार किती?

7व्या वेतन आयोगानुसार कोतवालला Rs. 15,000/- ते Rs. 20,500/- पर्यंत मानधन + महागाई भत्ता मिळतो. हा पगार जिल्ह्यानुसार बदलतो. काही जिल्ह्यात S-1 वेतनश्रेणी लागू आहे.

💡 आमचा सल्ला: रोज वरील Mock Test सोडवा. 50 पैकी 40+ गुण येईपर्यंत सराव करा. आम्ही VisionGov Academy वर रोज नवीन पेपर टाकत असतो. हा लेख Bookmark करून ठेवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कोतवाल भरतीचा फॉर्म कधी येईल?

सप्टेंबर - ऑक्टोबर 2026 मध्ये जिल्हा निहाय जाहिरात येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा.

कोतवाल भरतीसाठी लेखी परीक्षा असते का?

हो, 100 गुणांची लेखी परीक्षा असते आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी होते.

© 2026 VisionGov Academy | Udgir, Maharashtra | हा लेख आमच्या तज्ञांनी तयार केला आहे.

Post a Comment