सर्वनाम | Sarvanam Complete Notes PDF | MPSC, Police Bharti, Talathi Exam

| 100% मार्क मिळवून देणारे Notes | VisionGov Academy

प्रस्तावना: सर्वनाम म्हणजे काय?

मित्रांनो, मराठी व्याकरणात 30 पैकी 2-3 प्रश्न फक्त शब्दांच्या जातींवर येतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 'सर्वनाम'. MPSC, वनरक्षक, तलाठी, पोलीस भरती या सगळ्या परीक्षांत यावर प्रश्न विचारलाच जातो.

'सर्व' म्हणजे सगळे आणि 'नाम' म्हणजे नाव. जे शब्द नामाऐवजी वापरले जातात त्यांना 'सर्वनाम' म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरतात.

उदा: राम शाळेत गेला. राम हुशार आहे. राम रोज अभ्यास करतो.
हे वाक्य कसं वाटतं? कंटाळवाणं ना. म्हणून आपण म्हणतो: राम शाळेत गेला. तो हुशार आहे. तो रोज अभ्यास करतो. इथे 'तो' हे सर्वनाम आहे.

सर्वनामाचे 6 मुख्य प्रकार | स्पष्टीकरण + उदाहरणे

1. पुरुषवाचक सर्वनाम

जे सर्वनाम बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याबद्दल बोलणे चालू आहे त्यांचा बोध करून देते.

पुरुष एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष मी आम्ही, आपण
द्वितीय पुरुष तू, तुम्ही तुम्ही, आपण
तृतीय पुरुष तो, ती, ते ते, त्या, ती
महत्त्वाचे नियम:
  1. आपण: हा शब्द दोन्हीकडे वापरला जातो. 'आपण जेवूया' इथे 'आम्ही' असा अर्थ आहे. 'आपण बसा' इथे 'तुम्ही' असा अर्थ आहे. परीक्षेत हा गोंधळ करतात.
  2. आदरार्थी बहुवचन: मोठ्या व्यक्तीसाठी 'तू' ऐवजी 'तुम्ही' वापरतो. उदा: गुरुजी, तुम्ही कधी येणार?
MPSC प्रश्न: 'आपण' हे सर्वनाम कोणत्या पुरुषात येते?
उत्तर: प्रथम व द्वितीय दोन्ही पुरुषात. वाक्यावरून ठरवावे लागते.

2. दर्शक सर्वनाम

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते.

जवळचे: हा, ही, हे, हे, ह्या, ही
दूरचे: तो, ती, ते, ते, त्या, ती

उदा: हा माझा भाऊ आहे. ती माझी बहीण आहे.

Trick: 'ह' ने सुरू होणारे जवळचे. 'त' ने सुरू होणारे दूरचे.

3. संबंधी सर्वनाम

एका वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी जोडून दाखवणारे सर्वनाम.

जोड्या लक्षात ठेवा: जो - तो, जी - ती, जे - ते, ज्या - त्या, ज्याला - त्याला

उदा: जो अभ्यास करतो, तो पास होतो.

परीक्षेत कसा प्रश्न येतो?
'जे चकाकते ते सोने नसते' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
उत्तर: 'जे' आणि 'ते' - संबंधी सर्वनाम.

4. प्रश्नार्थक सर्वनाम

प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते.

मुख्य शब्द: कोण, काय, कोणी, कोणाला, कसला, कशाला, कुठला

उदा: तुझे नाव काय आहे? परीक्षेला कोण येणार?

लक्षात ठेवा: 'काय' हा शब्द जेव्हा नामासोबत येतो तेव्हा तो 'प्रश्नार्थक विशेषण' होतो. उदा: 'काय पुस्तक वाचतोस?' इथे 'काय' हे विशेषण आहे, सर्वनाम नाही.

5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम

निश्चित व्यक्ती किंवा वस्तूचा बोध न करून देणारे सर्वनाम.

मुख्य शब्द: कोणी, काही, कोण, काय, कोणीतरी, काहीतरी, प्रत्येक, सर्व

उदा: दारावर कोणीतरी उभे आहे. मला काही खायला दे.

6. आत्मवाचक सर्वनाम

'स्वतः' या अर्थाचा बोध करून देणारे सर्वनाम.

मुख्य शब्द: आपण, स्वतः, आपला, आपली, आपले

उदा: मी माझे काम स्वतः करतो. आपण आपले रक्षण केले पाहिजे.

सर्वनामांची विभक्ती | Declension

परीक्षेत 1 मार्क इथे हमखास असतो. 'त्याने' या शब्दाची विभक्ती कोणती? असे प्रश्न येतात.

विभक्ती प्रत्यय 'तो' चे रूप 'मी' चे रूप
प्रथमा0तोमी
द्वितीयास, ला, तेत्याला, त्यासमला
तृतीयाने, ए, शीत्याने, त्याशीमाझ्याने
चतुर्थीस, ला, तेत्याला, त्यासमला
पंचमीऊन, हूनत्याहूनमजपासून
षष्ठीचा, ची, चेत्याचा, त्याचीमाझा, माझे
सप्तमीत, ई, आत्यात, त्यावरमाझ्यात
संबोधन0ए तो!-
MPSC PYQ: 'माझ्याकडून' या शब्दात कोणती विभक्ती आहे?
उत्तर: पंचमी विभक्ती. 'कडून' हा प्रत्यय पंचमीचा आहे.

सर्वनाम आणि विशेषण यातील फरक | सर्वात जास्त चुकतात इथे

नियम: जर एखादा शब्द नामाच्या आधी येऊन त्या नामाबद्दल माहिती देत असेल तर तो 'सर्वनाम' नसून 'विशेषण' असतो.

उदा 1: तो मुलगा हुशार आहे. इथे 'तो' हे दर्शक विशेषण आहे.

उदा

Post a Comment

Previous Post Next Post