विषय: ब्रिटीश काळातील शिक्षण प्रणाली आणि जमीनमहसूल सुधारणा
भारताच्या इतिहासात 1757 ते 1947 हा काळ म्हणजे ब्रिटीश राजवटीचा काळ. या 200 वर्षात ब्रिटीशांनी भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले. या बदलांपैकी दोन सर्वात महत्त्वाचे बदल म्हणजे आधुनिक शिक्षण प्रणालीची सुरुवात आणि जमीनमहसूल व्यवस्थेत केलेल्या सुधारणा.
ब्रिटीशांचा मूळ उद्देश भारतातून जास्तीत जास्त नफा कमावणे आणि आपले साम्राज्य टिकवणे हा होता. त्यासाठी त्यांना सुशिक्षित कारकून आणि स्थिर महसूलाची गरज होती. म्हणूनच त्यांनी शिक्षण आणि जमीनमहसूल या दोन क्षेत्रांवर विशेष भर दिला. या दोन्ही धोरणांचा दूरगामी परिणाम भारतीय समाजावर झाला. MPSC, PSI, STI आणि UPSC च्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.
भाग A: पार्श्वभूमी - ब्रिटीशपूर्व आणि सुरुवातीचा काळ
ब्रिटीश येण्यापूर्वी भारतात शिक्षणाची परंपरा खूप जुनी होती. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला सारखी विद्यापीठे जगप्रसिद्ध होती. गावोगावी गुरुकुल आणि पाठशाळा होत्या. मुस्लिम काळात मदरसे आणि मक्तब सुरु झाले. परंतु हे सर्व शिक्षण धर्माशी निगडित होते आणि ते केवळ विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होते.
16 व्या शतकापासून युरोपियन सत्तांचा भारतात प्रवेश सुरु झाला. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि शेवटी ब्रिटीश आले. त्यांच्यासोबत त्यांची भाषा, धर्म आणि शिक्षण पद्धतीही आली.
1. पोर्तुगीज आणि इतर युरोपियनांचा प्रभाव
- पोर्तुगीज: पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन होते. त्यांनी 16 व्या शतकात गोवा, बॉम्बे, दमन, दिव, हुगळी येथे वसाहती स्थापन केल्या. 1575 मध्ये गोवा येथे जेसुइट कॉलेज स्थापन करण्यात आले. हे भारतातील पहिल्या पाश्चात्य शिक्षण संस्थांपैकी एक होते. येथे लॅटिन, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, व्याकरण आणि संगीत शिकवले जात असे. त्यांचा मुख्य उद्देश ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हा होता.
- डच आणि फ्रेंच: डच आणि फ्रेंचांनीही काही ठिकाणी शाळा सुरु केल्या परंतु त्यांचा प्रभाव मर्यादित होता.
2. ब्रिटीशांचा प्रारंभिक काळ 1600-1813
- 1600: ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. सुरुवातीला त्यांचा उद्देश फक्त व्यापार होता.
- 1614: ब्रिटिशांनी भारतात पाद्री आणि प्रोटेस्टंट धर्माचा प्रचार सुरु केला.
- 1698: ब्रिटिश वसाहतीत इंग्रजी शिक्षण सुरु करण्याचा पहिला प्रयत्न.
- 1715: मद्रास येथे सेंट मेरी चॅरिटी स्कूल सुरु करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी ही शाळा होती.
3. प्राच्यवादी विरुद्ध पाश्चात्यवादी वादाची सुरुवात
18 व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीश अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले. एक गट भारतीय भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या बाजूने होता. त्यांना प्राच्यवादी म्हणतात. दुसरा गट इंग्रजी आणि पाश्चात्य विज्ञानाचा प्रसार करण्याच्या बाजूने होता. त्यांना पाश्चात्यवादी म्हणतात.
- प्राच्यवादी: सर विल्यम जोन्स, वॉरेन हेस्टिंग, जोनाथन डंकन. 1794 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे एशियाटीक सोसायटी ऑफ बंगाल स्थापन केली. 1781 मध्ये वॉरन हेस्टिंग्ज यांनी अरबी आणि पर्शी भाषेसाठी कलकत्ता मदरशा सुरु केली. 1791 मध्ये जोनाथन डंकन यांनी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरु केले.
- मॅक्सम्यूलर: जर्मन विद्वान मॅक्सम्यूलर यांनी वैदिक ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार केला.
- जॉन्स आणि विल्किन्स: यांना भारतविद्येचे जनक म्हटले जाते.
4. भारतीय सुधारकांचे योगदान
या काळात काही भारतीय समाजसुधारकांनीही शिक्षणासाठी पुढाकार घेतला. राजाराम मोहन रॉय यांनी पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञानाचा पुरस्कार केला. राधाकांत देव आणि जयनारायण घोषाल यांनी कलकत्ता येथे हिंदू कॉलेज स्थापन करण्यासाठी मदत केली.
5. चार्ल्स ग्रांट आणि आधुनिक शिक्षणाचा पाया
चार्ल्स ग्रांट यांना भारतातील आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता म्हटले जाते. 1792 मध्ये त्यांनी Observation on the state of the society among the Asiatic subjects of great Briton हा निबंध लिहिला. त्यात त्यांनी सांगितले की भारतीय समाज अंधश्रद्धा आणि अज्ञानात आहे. त्याला पाश्चात्य शिक्षण आणि ख्रिश्चन धर्माद्वारेच सुधारता येईल.
6. 1813 चा चार्टर अॅक्ट - मैलाचा दगड
1813 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा सनद कायदा नव्याने करण्यात आला. या कायद्याच्या कलम 43 नुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी, साहित्याच्या पुनरुद्धारासाठी आणि वैज्ञानिक शिक्षणासाठी कंपनीने दरवर्षी एक लाख रुपये खर्च करावेत अशी तरतूद करण्यात आली.
परंतु हा पैसा नेमका कशावर खर्च करावा यावरून मोठा वाद निर्माण झाला. तो पैसा संस्कृत आणि अरबी ग्रंथांच्या छपाईवर खर्च करावा की इंग्रजी शाळा काढाव्यात यावरून प्राच्यवादी आणि पाश्चात्यवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला. हा वाद 22 वर्षे चालला आणि 1835 मध्ये मॅकॉलेच्या ठरावाने तो निकाली निघाला.
7. इतर प्रारंभिक संस्था
- 1800: लॉर्ड वेलस्ली यांनी कलकत्ता येथे Fort William College सुरु केले. कंपनीच्या अधिकाऱ्यांना भारतीय भाषा शिकवण्यासाठी. 1802 मध्ये ते बंद झाले.
- 1806: इंग्लंडमध्ये हेलिसबरी कॉलेज सुरु. भारतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी.
- 1817: राजा राममोहन रॉय आणि डेविड हेयर यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे हिंदू कॉलेज सुरु. पुढे यालाच प्रेसिडेन्सी कॉलेज म्हटले जाऊ लागले.
भाग B: लॉर्ड मॅकॉलो समिती 1835 - इंग्रजी शिक्षणाचा विजय
1813 च्या कायद्यानुसार आलेला एक लाख रुपये कसा खर्च करावा यावरून 20 वर्षे वाद चालू होता. हा वाद सोडवण्यासाठी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले यांची शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
1. मॅकॉलेचे स्मरणपत्र 2 फेब्रुवारी 1835
मॅकॉले हे कट्टर पाश्चात्यवादी होते. त्यांनी आपल्या स्मरणपत्रात म्हटले की "भारतीय भाषांतील सर्व साहित्य एकत्र केले तरी इंग्लंडच्या एका चांगल्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या एका कपाटाइतकेही होणार नाही". त्यांच्या मते इंग्रजी ही जगातील सर्वात प्रगत भाषा आहे आणि त्याद्वारेच भारताला आधुनिक बनवता येईल.
मॅकॉलेचे प्रसिद्ध वाक्य: "आपल्याला असा एक वर्ग निर्माण करायचा आहे जो रक्त आणि रंगाने भारतीय असेल पण अभिरुची, विचार, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्तेने इंग्रज असेल."
2. 7 मार्च 1835 चा ठराव
मॅकॉलेच्या शिफारशी मान्य करून लॉर्ड बेंटिक यांनी 7 मार्च 1835 रोजी ठराव संमत केला. त्यानुसार:
- सरकारचा सर्व पैसा इंग्रजी शिक्षणावर खर्च केला जाईल.
- सरकारी नोकऱ्यांसाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असेल.
- पाश्चात्य विज्ञान आणि साहित्याचा प्रसार केला जाईल.
3. झिरपता सिद्धांत - Downward Filtration Theory
मॅकॉलेच्या धोरणाला लॉर्ड ऑकलेंड यांनी पुढे नेले. त्यांच्या मते प्रथम उच्च आणि मध्यम वर्गाला इंग्रजी शिक्षण द्यावे. ते शिक्षण हळूहळू खालच्या वर्गापर्यंत झिरपेल. परंतु व्यवहारात हे धोरण अपयशी ठरले कारण उच्च वर्गापर्यंतच शिक्षण मर्यादित राहिले.
4. विल्यम अँडम्सचा अहवाल 1830
बेंटिक यांनी बंगाल आणि बिहारमधील देशी शिक्षणाची स्थिती जाणून घेण्यासाठी विल्यम अँडम्स यांची नियुक्ती केली. त्यांच्या अहवालात असे दिसून आले की बंगाल आणि बिहारमध्ये हजारो देशी पाठशाळा आहेत परंतु त्यांची स्थिती दयनीय आहे. शिक्षकांना पगार नाही आणि अभ्यासक्रम जुना आहे.
भाग C: 1835 ते 1854 - विस्तार आणि तयारीचा काळ
मॅकॉलेच्या ठरावानंतर इंग्रजी शिक्षणाचा वेगाने प्रसार झाला.
- 1835: कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना. येथे पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकवले जाऊ लागले.
- 1836: नागपूर, ढाका, पटना, हुगळी येथे नवीन महाविद्यालये सुरु.
- 1840: भारतीय शिक्षण समिती भंग करून त्याऐवजी शिक्षण बोर्ड स्थापन.
- 1842: लॉर्ड ऑकलेंड यांनी बंगालचे 9 विभाग करून प्रत्येक विभागात एक शाळा सुरु केली.
- 1847: लॉर्ड हार्डिंग यांनी कलकत्ता येथे शिक्षक प्रशिक्षण विद्यालय सुरु केले.
- 1854: लॉर्ड डलहौसी यांनी 33 प्राथमिक शाळा सुरु केल्या.
भाग 2: वुडचा खलिता 1854 - भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
1853 मध्ये ब्रिटीश संसदेने कंपनीच्या सनदेचे पुनरावलोकन केले. त्यावेळी बोर्ड ऑफ कंट्रोलचे प्रमुख सर चार्ल्स वुड यांनी 19 जुलै 1854 रोजी भारतातील शिक्षणाबाबत 100 कलमी जाहीरनामा पाठवला. यालाच वुडचा खलिता म्हणतात.
1. वुडच्या खलित्याची उद्दिष्टे
- भारतात पाश्चात्य संस्कृती आणि ज्ञानाचा प्रसार करणे.
- प्रशासनासाठी सुशिक्षित आणि निष्ठावान भारतीय कारकून तयार करणे.
- भारतीयांना नैतिक आणि भौतिक प्रगतीच्या दिशेने नेणे.
2. वुडच्या खलित्याच्या प्रमुख शिफारसी
- शिक्षणाचे 4 स्तर: प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय आणि विद्यापीठ.
- प्रत्येक प्रांतात शिक्षण विभाग: डायरेक्टर ऑफ Public Instruction नेमावा. त्याच्या खाली निरीक्षक असावेत.
- तीन विद्यापीठे: लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे विद्यापीठे स्थापन करावी.
- अनुदान पद्धत: खासगी शाळा आणि कॉलेजांना सरकारने अनुदान द्यावे.
- स्त्री शिक्षण: स्त्री शिक्षणाला विशेष प्रोत्साहन द्यावे.
- व्यावसायिक शिक्षण: वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कृषी महाविद्यालये सुरु करावी.
- माध्यम: प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून आणि उच्च शिक्षण इंग्रजीतून.
3. वुडच्या खलित्याची अंमलबजावणी 1854-1866
- 1857: मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे विद्यापीठे स्थापन.
- प्रत्येक प्रांतात शिक्षण विभाग सुरु.
- 1856: रुडकी आणि कलकत्ता येथे अभियांत्रिकी महाविद्यालय.
- 1851: पुना संस्कृत कॉलेज आणि इंग्लिश स्कूलचे एकत्रीकरण करून पुना कॉलेज.
4. जेम्स थॉमसनची ग्रामीण शिक्षण योजना 1843-53
वायव्य प्रांतात जेम्स थॉमसन यांनी ग्रामीण शिक्षणासाठी वेगळी योजना राबवली. 5-6 गावांच्या गटासाठी एक शाळा, कृषी विज्ञानाचे शिक्षण स्थानिक भाषेतून.
भाग 3: हंटर आयोग 1882 ते रॅले आयोग 1902
1. स्त्री शिक्षणाचा विकास
- 1819: कलकत्ता येथे तरुण स्त्री सभा.
- 7 मे 1849: जोनाथन बेथ्युन यांनी कलकत्ता बालिका विद्यालय सुरु केले.
- 1865-66: मौल्ट्री यांनी शैक्षणिक स्थितीचा अहवाल दिला.
2. हंटर शिक्षण आयोग 1882-83
लॉर्ड रिपन यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. यात 20 सदस्य होते त्यापैकी 8 भारतीय होते. महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली.
महत्वाच्या शिफारसी: प्राथमिक शिक्षणावर भर, ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे द्यावे, माध्यमिक शिक्षणाचे 3 प्रकार, खासगी संस्थांना अनुदान.
1882: पंजाब विद्यापीठ, 1887: इलाहाबाद विद्यापीठ.
3. थॉमस रॅले आयोग 1902 आणि विद्यापीठ कायदा 1904
लॉर्ड कर्झन यांनी विद्यापीठांच्या दर्जा सुधारण्यासाठी थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्याच्या शिफारशीनुसार भारतीय विद्यापीठ कायदा 1904 संमत झाला. यामुळे विद्यापीठावरील सरकारी नियंत्रण वाढले.
भाग 4: 1904 ते 1947
- सॅडलर आयोग 1917: कलकत्ता विद्यापीठाच्या समस्या. 3 वर्षाची पदवी, इंटरमिडिएट बोर्ड.
- 1916-1921: म्हैसूर, बनारस, पटना, उस्मानिया, अलीगढ, लखनऊ विद्यापीठे.
- हार्टॉग समिती 1929: शिक्षणाच्या दर्जावर अभ्यास.
- वर्धा योजना 1937: गांधीजींची 7 वर्षे मोफत आणि सक्तीचे शिक्षण.
- सार्जंट योजना 1944: 1984 पर्यंत 100% साक्षरतेचे उद्दिष्ट.
भाग 5: ब्रिटीश काळातील जमीनमहसूल सुधारणा
शिक्षणाबरोबरच ब्रिटीशांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीमध्येही मोठे बदल केले. त्यांचा मुख्य उद्देश भारतातून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हा होता.
1. जमीनमहसूल सुधारणेची गरज
ब्रिटीश येण्यापूर्वी मुघल काळात जमीनमहसूल व्यवस्था अनिश्चित होती. कंपनीला स्थिर उत्पन्न हवे होते. त्यामुळे त्यांनी जमिनीची मोजणी करून कायमस्वरूपी महसूल ठरवण्याचा निर्णय घेतला.
2. तीन प्रमुख पद्धती
A. कायमधारा पद्धत 1793 - Lord Cornwallis
क्षेत्र: बंगाल, बिहार, ओरिसा | मालक: जमीनदार
या पद्धतीत जमीनदारांना जमिनीचा कायमचा मालक बनवले. त्यांना सरकारला दरवर्षी ठराविक रक्कम द्यावी लागे. तोटा: जमीनदारांनी शेतकऱ्यांचे शोषण केले. फायदा: सरकारला स्थिर उत्पन्न.
B. रयतवारी पद्धत 1820 - Sir Thomas Munro
क्षेत्र: मद्रास, मुंबई | मालक: शेतकरी
शेतकरी आणि सरकार यांच्यात थेट संबंध. जमिनीचे मोजमाप करून 50-60% महसूल. तोटा: दर खूप जास्त, सावकारी वाढली.
C. महालवारी पद्धत 1822 - Holt Mackenzie
क्षेत्र: उत्तर भारत | मालक: संपूर्ण गाव
गावाला एक घटक मानून सामूहिक महसूल. गावप्रमुख जबाबदार.
3. परिणाम
नकारात्मक: शेतकऱ्यांवर कराचा बोजा, सावकारी, 1857 च्या उठावाचे कारण.
सकारात्मक: जमिनीची नोंद, कायदेशीर हक्क.
भाग 6: स्वातंत्र्यानंतरचे आयोग
मुदलियार आयोग 1952
माध्यमिक शिक्षणात सुधारणा. 11 वर्षे शालेय शिक्षण, तीन भाषा सूत्र.
Revision Table
| काळ | आयोग/कायदा | वर्ष | महत्व |
|---|---|---|---|
| ब्रिटीश | 1813 चार्टर अॅक्ट | 1813 | शिक्षणासाठी 1 लाख |
| ब्रिटीश | मॅकॉले मिनिट | 1835 | इंग्रजी शिक्षण |
| ब्रिटीश | वुडचा खलिता | 1854 | शिक्षणाचा मॅग्नाकार्टा |
| ब्रिटीश | हंटर आयोग | 1882 | प्राथमिक शिक्षण |
| ब्रिटीश | कायमधारा | 1793 | बंगाल |
| ब्रिटीश | रयतवारी | 1820 | मद्रास, मुंबई |
| स्वातंत्र्यानंतर | मुदलियार आयोग | 1952 | माध्यमिक शिक्षण |
निष्कर्ष
ब्रिटीश काळातील शिक्षण आणि जमीनमहसूल या दोन धोरणांनी आधुनिक भारताचा पाया घातला. शिक्षणामुळे भारतात नवजागृती, राष्ट्रीय चळवळ आणि विज्ञानाचा प्रसार झाला. तर जमीनमहसूल सुधारणांमुळे शेतीचे व्यापारीकरण झाले पण शेतकरी वर्ग पिळला गेला.
या दोन्ही धोरणांचा अभ्यास केल्याशिवाय ब्रिटीश राजवटीचे स्वरूप समजू शकत नाही. MPSC आणि UPSC च्या दृष्टीने हे दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत.
📚 प्राचीन भारतीय इतिहास – संबंधित महत्त्वाचे लेख
- 🔹 सिंधू संस्कृती (हडप्पा व मोहेंजोदडो) संपूर्ण माहिती
- 🔹 वैदिक काल – ऋग्वेद, समाज, वर्णव्यवस्था व अर्थव्यवस्था
- 🔹 जैन व बौद्ध धर्म – महावीर, गौतम बुद्ध व तत्त्वज्ञान
- 🔹 मौर्य साम्राज्य – चंद्रगुप्त, चाणक्य व सम्राट अशोक
- 🔹 गुप्त साम्राज्य – समुद्रगुप्त, चंद्रगुप्त विक्रमादित्य व सुवर्णयुग
- 🔹 प्राचीन दक्षिण भारत – सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव व राष्ट्रकूट
- 🔹 ब्रिटिश कालातील महत्त्वाचे कायदे (Acts) – संपूर्ण नोट्स

Post a Comment