इयत्ता 6 वी भूगोल - खडक व खडकांचे प्रकार नोट्स | महाराष्ट्र स्टेट बोर्ड

इयत्ता - सहावी

भूगोल - पृथ्वीचा अभ्यास, ज्ञानाचा विकास

प्रकरण 1. पृथ्वी आणि वृत्ते

अक्षवृत्ते

अक्षवृत्त आकृती
  • 0° चे विषुववृत्त
  • 1° ते 90° उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्ते
  • 1° ते 90° दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते
  • प्रत्येकी 1° च्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात

पृथ्वी गोलाकार असून तिच्या पृष्ठभागावर क्षैतिज वर्तुळाकार रेषा असतात. या वर्तुळांना अक्षवृत्त असे म्हणतात...

रेखावृत्ते - भौगोलिक स्पष्टीकरण

रेखावृत्त आकृती

• प्रत्येकी 1° च्या अंतराने एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात.

रेखावृत्ते

पृथ्वीवरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. यांना रेखावृत्त म्हणतात. 0° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात...

लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर 111 किमी असते. तसेच विषुववृत्तावर लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर 111 किमी असते.

  • 0° वृत्त विषुववृत्त 180° विरुद्ध
  • 1° पूर्व ते 179° पूर्व विषुववृत्त, एकूण 179 पूर्व गोलार्धातून 179 विषुववृत्ते असतात
  • 1° पश्चिम ते 179° पश्चिम विषुववृत्त, एकूण 179 पश्चिम गोलार्धातून 179 विषुववृत्ते असतात

वृत्तजाळी

पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते.

पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो.

प्रकरण 2. चला वृत्ते वापरूयात

पृथ्वीची वृत्ते

आपण काही महत्त्वाच्या वृत्तांचा परिचय करून घेऊ.

विषुववृत्तापासून 23°30' उत्तर तसेच 23°30' दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यदर्शन वर्षात दोन दिवस लंबावर पडतो. पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंब रूपात पडत नाहीत. 23°30' उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व 23°30' दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील 66°30' ही दोन अक्षवृत्ते देखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते 66°30' उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते यादरम्यान...

प्रत्येक 24 तासांच्या कालावधीत दिन व रात्र असतात. आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त म्हणजे 66°30' उत्तर व दक्षिण गोलार्धातील वृत्त. या वृत्तांच्या पलीकडे उन्हाळ्यात 24 तास सूर्य दिसतो व हिवाळ्यात 24 तास रात्र असते. या दिवसालाच मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. हा विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना दिवस लहान होत जातो. 90° ध्रुवावर एका वर्षात फक्त एकदा सूर्य उगवतो व सहा महिन्यांनी अस्ताला जातो. 6 महिन्यांचा दिवस, 6 महिन्यांची रात्र असते. या कालावधीत सूर्य क्षितिजा समांतर फिरतो.

जगातील सर्वात लहान देश म्हणून 'व्हॅटिकन सिटी' ओळखला जातो. त्याचे क्षेत्रफळ 0.44 चौकिमी आहे. आकाराने मोठा देश म्हणजे रशिया. याच्या सीमेवरील इटली हा देश आहे. पृथ्वीच्या कालीविषयी व तीवरत असणाऱ्या पृथ्वीवरील तापमानाचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. त्याचा विस्तार व अनुभव वायुमंडळ निर्माण होतात. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे वनस्पती व प्राणी यांचे विविधता निर्माण होते.

0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (Prime Meridian) म्हणून ओळखले जाते. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व इतर देशांच्या प्रमाणवेळेशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त 'ग्रीनविच रेखावृत्त (G.M.T. = Greenwich Mean Time)' म्हणून ओळखले जाते.

180° रेखावृत्त हेही एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. या रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180° रेखावृत्तांपर्यंत रेखावृत्ते काढली जातात. 180° रेखावृत्ताला संदर्भ रेषा वाररेषा विचारात घेतली जाते.

विषुववृत्त हे वृत्तवृत्त आहे तसेच एकमेकांना समांतर असलेल्या रेखावृत्ते मिळून वृत्तजाळ तयार होते.

प्रकरण 3. पृथ्वीगोल, नकाशा तुलना व वैशिष्ट्ये

भूगोल दालन

'अर्था' हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल असून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन (Maine) राज्यात 'यामस' (Yarmouth) येथे ही पृथ्वीची रचना प्रतिकृती आहे. या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.

प्रकरण 4. हवा व हवामान

हवा

एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो. तिचे वर्णन आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते. यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो.

हवामान

प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रात एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे 'हवामान' होय. उदा., हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते.

हवेचे तापमान, वारे, आर्द्रता, इत्यादींमुळे वारंवार बदल घडतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो.

हवेची अंगे

  • तापमान : पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूभागाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते.
  • हवेचा दाब : हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो. त्याला हवेचा दाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला हवेचा उर्ध्व दाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते.
  • वारे : जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिजसमांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारा म्हणतात. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो.
  • आर्द्रता : वातावरणात बाष्प असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते.
  • वृष्टी : हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत होणारे रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत.

अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासून उंची, समुद्रसान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे, इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो.

प्रकरण 5. तापमान

पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधात (पट्ट्यांत) विभाजन करता येते.

महत्त्वाची वृत्ते

उत्तर ध्रुव - 90° उत्तर, 66°30' उत्तर - आर्क्टिक वृत्त, 23°30' उत्तर - कर्कवृत्त, विषुववृत्त - 0°, 23°30' दक्षिण - मकरवृत्त, 66°30' दक्षिण - अंटार्क्टिक वृत्त, दक्षिण ध्रुव - 90° दक्षिण

समुद्रसान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्रसपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो.

विशेष माहिती

जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्रसपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते.

जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी...

भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ होते. वाळवंटात असते. पाण्याची वाफ ही उष्णता शोषून घेते. त्यामुळे त्या भागात हवा थंड व दमट राहते. वाळवंटी परिसरातील वाळवंटात हवा शुष्क असते. कापल्या वस्तुमध्ये हवा कोरडी राहते. परिसराची तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसाच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणाची दैनंदिन तापक्रम कक्षा म्हणतात.

तापमानातील फरकांमुळे महासागरांमध्ये पाण्याचे उर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यांमुळे निर्माण होतात.

विशेष माहिती - हरितगृह वायूंचा परिणाम :

वातावरणातील काही वायू जसे ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यांची उष्णता शोषण्याची क्षमता अधिक आहे. जसे की कार्बन डायऑक्साईड दीर्घकाळपर्यंत वातावरणात टिकून राहतो. त्याच्या वाढीमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते असे मानले जाते. या कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते, त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात.

जग - वार्षिक तापमान

(नकाशा: वार्षिक सरासरी तापमान - आंतरराष्ट्रीय रेषांसह जागतिक वितरण, पिंक रंगाच्या समताप रेषा)

पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केला आहे. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाकून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात.

दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागांतून ही समताप रेषा जाते.

तापमापक :

हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठणबिंदू -39° से आहे, तर अल्कोहोलचा गोठणबिंदू -130° से आहे. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळे तापमानातील -30° से पासून +55° से पर्यंतचा फरक या द्रव्यांच्या साहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहाइट या एककात मोजतात. ते तापमापकावर °C किंवा °F असे मांडतात.

साधा तापमापक

  • सेल्सिअस
  • फॅरेनहाइट
  • काचेची निर्वात नळी
  • तापमान मोजपट्टी
  • पारा किंवा अल्कोहोल
  • आधारपट्टी

तापमापकात -40 ते 50 °C पर्यंत दर्शवलेले आहे.

प्रकरण 6. महासागरांचे महत्त्व

महासागर क्षेत्रफळ (चौ.किमी)
पॅसिफिक P 16,62,40,977
अटलांटिक A 8,65,57,402
हिंदी H 7,34,26,163
दक्षिण 2,03,27,000
आर्क्टिक 1,32,24,479

महासागरांमध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवंकापासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात.

सर्व नद्या डोंगरांमधून व पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात. नद्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडे-झुडपे व मृतावशेष सोबत घेऊनच महासागरांना मिळतात. वरील दोन्ही प्रकारात मृतावशेषाचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे, क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यात मिसळतात.

ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात, त्याप्रमाणे ते महासागरातही होतात. ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते.

महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते. या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते. पाण्याची क्षारता (खारटपणा) प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. समुद्राच्या क्षारता दर हजारी (‰) या प्रमाणात सांगितली जाते. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35 % असते. 'मृत समुद्र' हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता 332 % आहे.

पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो. तसेच सरासरी कमाल व किमान तापमानातही तफावत असते. ही तफावत किनारी प्रदेशात (समुद्रसान्निध्य) कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात (खंडांतर्गत) जास्त असते.

महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सान्निध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते.

विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंब रूप पडतात. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे

पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुप्रवाह निर्माण होतात. या वायुप्रवाहातील फरकामुळे 'वारे' वाहतात, त्यांना ग्रहीय वारे असेही म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह 'उष्ण' किंवा 'शीत' असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशांकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशांकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान वाढवत करतात.

सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्या वेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. उलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते.

उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंकवाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात.

वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस (पर्जन्य) पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी-नाल्यांद्वारे शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजेच पर्जन्यचक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते हे लक्षात घ्या.

विशेष माहिती - सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी/खारफुटीची जंगले, सुंद्रीची वने वाढतात. खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. खारफुटीच्या वनांमुळे किनारी भागास महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते. तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहरांची फुफ्फुसे म्हणून ओळखतात.

महासागराच्या समस्या

पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या बनून निर्माण झाली आहे.

  • महासागरांचे विभेदन होणारा दरवर्षीचा मानवजन्म टाकाऊ
  • जलप्रदूषण टाकणारे अगदी हानिकारक
  • प्लॅस्टिकची आणि
  • किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड पाण्यामुळे होणारे क्षरण
  • उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी
  • समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण

या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. काही किनारपट्टीचे प्रदेश तर जलचरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अनेक जलचर यामुळे होणाऱ्या मार्गावर आहेत. उदा., निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी.

60° दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात.

प्रकरण 7. खडक व खडकांचे प्रकार

भूपृष्ठावर व त्याखालीसुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात.

खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशिअम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय इतरही खनिजे असतात.

खडकांचे प्रकार → अ. ग. रूपा

निर्मितीप्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

  • अग्निजन्य खडक / अग्निज खडक / मूळ खडक
  • गाळाचे खडक / स्तरित खडक
  • रूपांतरित खडक

विशेष माहिती

पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धुलिकण, राख, इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लाव्हारसापासून मूळ खडक तयार होतात.

अग्निजन्य खडक

ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस (मॅग्मा) आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात. हे खडक सच्छिद्र नसतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म नसतात. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहे व अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे.

विशेष माहिती

प्यूमिस खडक हा अग्निजन्य खडक ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.

नाळाचे खडक

तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशाप्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनात खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर घट्ट होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात.

गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. गाळाच्या खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकाच प्रकारचे नसतात. काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारणतः गाळाचे खडक सच्छिद्र असतात.

वाळूचा खडक, चुनखडक, पंकारूप (शेल), प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात.

जीवाश्म (fossil)

गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे तसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात.

विशेष माहिती

राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लालकिल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते.

(छायाचित्र: लाल किल्ला - वाळूच्या खडकाचे उदाहरण)

रूपांतरित खडक

पृथ्वीच्या ज्वालामुखी व इतर भू- हालचालींनी सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्याद्वारे समजून घ्या.

खडकाचा प्रकार मूळ खडक खडकाचा नमुना रूपांतरित खडक खडकाचा नमुना
अग्निजन्य ग्रॅनाईट [Image] नीस [Image]
अग्निजन्य बेसाल्ट [Image] ॲम्फिबोलाईट [Image]
स्तरित चुनखडक [Image] संगमरवर [Image]
स्तरित कोळसा [Image] हिरा [Image]
स्तरित वाळूचा खडक [Image] क्वार्टझाईट [Image]
स्तरित पंकाश्म (शेल) [Image] स्लेट [Image]

दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण होते. या कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते. कोळसा जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरतात.

मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोवेधक असते.

विशेष माहिती

आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता.

(छायाचित्र: संगमरवर खडक - ताजमहाल / खाण)

आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्रॅनाईट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडकाच्या विशिष्ट धर्तीमुळे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत.

जांभा खडक

आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो.

प्रकरण 8. नैसर्गिक संसाधने

पृथ्वीवरील एकूण पाणी 100% → पृथ्वीवरील वापरण्यायोग्य पाणी 3% → पृथ्वीवरील वापरण्यास उपलब्ध पाणी 0.003%

(आकृती: पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण दर्शवणारा डायग्राम)

पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे. बरेचसे पाणी खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प (0.003%) पाणी सर्व सजीव वापरू शकतात. तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे.

वनस्पतींचे 'गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष' असे स्थूलमानाने वर्गीकरण करता येते. गवतांपैकी काही तृणाची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. त्यामुळे त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण टाळता आली. मानव वस्ती करून राहू लागला. सिंधू, नाईल, युफ्रेटीस, व होयांग हो या नद्यांची खोरी ही यांपैकी काही उदाहरणे आहेत.

वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती, इत्यादी उत्पादने आपल्याला मिळवता येतात. विषुववृत्तापासून विचार केला तर कटिबंधानुसार खालील प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात.

नैसर्गिक वनस्पतीचे अक्षवृत्तीय वितरण

(आकृती: विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वनस्पती वितरण - उष्ण कटिबंधीय सदाहरित, पानझडी, वाळवंटी, गवताळ प्रदेश, समशीतोष्ण, मिश्र वने, शंकूच्या आकाराची अक्षवृत्तीय वितरण TSP)

पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागांत विविध प्रकारचे वनस्पती कमी-अधिक संख्येने आढळून येतात. मानवासह सर्व सजीवांचे हे वितरण असमान असते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरे, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन सर्व सजीव राहतात. मानव मात्र आपल्या सोईनुसार या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करतो.

प्रकरण 9. ऊर्जा साधने

पदार्थावर आधारित ऊर्जा साधने प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने
उदा., लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू. उदा., सौर, पवन (वारा), पाणी, भरती-ओहोटी व भूगर्भीय उष्णता.
पदार्थ कायमस्वरूपी राहत नाहीत. नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात.
पदार्थ एकदा वापरल्यांनंतर संपतात. पुनर्वापर होत नाही. सातत्याने उपलब्ध असते. पुनर्वापर होत नाही.
मर्यादित स्वरूपात उपलब्ध असते. मुबलक स्वरूपात उपलब्ध असते.
निसर्गात नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. निसर्गात सहज उपलब्ध होतात.
अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने जैविक आहेत. प्रक्रिया नैसर्गिक आहेत.
ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होते. अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांच्या पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. स्वच्छ व प्रदूषण विरहित ऊर्जा साधने. ही सर्व ऊर्जा साधने अपारंपरिक आहेत.
ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने खर्चिक आहेत. या ऊर्जा साधनांच्या वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे खर्चिक असते.
दुरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असतात. दुरगामी विचार करता ही ऊर्जा साधने पर्यावरण पूरक आहेत.
विद्युत निर्मिती प्रकार : औष्णिक व अणू विद्युत निर्मिती प्रकार : औष्णिक व गतिज

खनिज तेल व नैसर्गिक वायू :

भूहालचालींमुळे ज्याप्रमाणे दगडी कोळशाची निर्मिती झाली त्याचप्रमाणे खनिज तेल व नैसर्गिक वायूंची निर्मिती झाली. खनिज तेल भूगर्भाखाली अथवा सागरतळाखाली जमिनीत सापडते.

बहुतेक खनिज तेलाच्या विहिरींमध्ये नैसर्गिक वायूंचे साठेही आढळतात. खनिज तेलाचे साठे मर्यादित स्वरूपात असतात. त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे खनिज तेलाची किंमत जास्त असते. खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास 'काळे सोने' (Black Gold) असेही म्हणतात.

भारत - प्रमुख कोळसा व खनिज तेल क्षेत्र

(नकाशा: भारतातील प्रमुख कोळसा क्षेत्र व खनिज तेल क्षेत्र दर्शवणारा नकाशा)

बायोगॅस :

प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ (पाण्याचा पालापाचोळा, टरफले, इत्यादी) यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते. या ऊर्जेचा वापर स्वयंपाकघरातील गॅस, पाणी गरम करणे, दिवे प्रकाशित करणे यासाठी करता येतो.

वरील सर्व ऊर्जा साधने वनस्पती व प्राणी यांच्या मृतावशेषांमुळे निर्माण झालेली असल्यामुळे त्यांना जैविक ऊर्जा साधने असेही म्हणतात.

जलऊर्जा :

वाहत्या पाण्याच्या गतिज ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला जलऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती केली जाते. जलऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी होत नाही. तसेच जलविद्युत निर्माण करताना वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करता येतो. उदा., पंजाबमधील भाक्रा नांगल व महाराष्ट्रातील कोयना, इत्यादी.

पवनऊर्जा :

पवनऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असावा लागतो. वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात व गतिज ऊर्जा निर्माण होते. या गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. जिल्ह्यातील साक्री येथील सौरविद्युत प्रकल्प, सौरऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हिटर, वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात. सौरऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यांवर अवलंबून असते.

सौरऊर्जा :

सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. सौरऊर्जेची तीव्रता पृथ्वीवर उष्ण कटिबंधामध्ये सर्वात जास्त असते. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात या ऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. उदा., महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सौरविद्युत प्रकल्प. सौरऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हिटर, वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात. सौरऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यांवर अवलंबून असते.

सागरी ऊर्जा : सागरी लाटा व भरती-ओहोटी या सागर जन्याच्या हालचाली आहेत. या हालचाली अतिशयपणे चालू असतात. लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून वीजेनिर्मिती करण्याचे तंत्र आता अवगत झाले आहे. तेथे सुद्धा गतिज ऊर्जेतून विद्युत ऊर्जा मिळवली जाते. ही ऊर्जासुद्धा प्रदूषणमुक्त व अक्षय आहे.

  • अल्फा कॅलिफोर्निया सोलार प्रोजेक्ट (अमेरिका, संयुक्त संस्थाने)
  • कॅलिफोर्निया व्हॅली सोलार युनिट (कॅलिफोर्निया, संयुक्त संस्थाने)
  • गोलमुड सोलार पार्क (चीन)
  • चारंक सोलार पार्क (पाटण, गुजरात)
  • वेलस्पन एनर्जी प्रोजेक्ट (मध्य प्रदेश)
  • हे काही मोठे सौरऊर्जा प्रकल्प आहेत.

भूऔष्णिक ऊर्जा :

पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक 32 मीटरला एक अंश सेल्सिअसने (1° से) वाढते. या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विद्युतनिर्मिती करण्याची प्रक्रिया मानवाने अवगत केली आहे. या भूऔष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी करता येतो. भारतात हिमाचल प्रदेश राज्यात मणिकरण येथे असा प्रकल्प आहे.

भूगर्भापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर हे 6371 किमी आहे. तेथील तापमान सुमारे 4000° से असते.

प्रकरण 10. मानवी व्यवसाय

व्यवसाय विभागणीवर आधारित आहे. जगा प्रत्येक व्यवसायात प्राथमिक व्यवसाय म्हणून पशुपालन, मासेमारी इत्यादी. उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणूनच प्राथमिक व्यवसाय म्हणतात. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात.

दुग्धाचे संकलन व विक्री होताना, दुग्धाची वाहतूक आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पाहायला मिळते. सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांतील स्पष्टता दिसते आहे. बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक म्हणून त्यांचे काम करतात. अशा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय म्हणतो. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असल्याने या व्यवसायांना 'सेवा व्यवसाय' असेही म्हणतात. यामध्ये वाहतूक, मालाची चढ-उतार करणे, मालाची विक्री इत्यादी येतात. काही काम करण्यासाठी या व्यक्तीकडे 'विशेष' कौशल्य असते. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे, परंतु ही सेवा व्यवसायांप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवेना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात.

परीक्षेला जाता जाता...

  • पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे
  • हिंदी महासागरावर भारताइतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभला नाही.

भारताच्या भूसीमा :

  • उत्तर पश्चिम (वायव्य) = अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
  • उत्तर = चीन, भूतान, नेपाळ
  • पूर्व = म्यानमार आणि बांग्लादेश
  • दक्षिण पूर्व (आग्नेय) = श्रीलंका
  • दक्षिण पश्चिम (नैऋत्य) = मालदीव
  • भारताची भूसीमा 7 देशांबरोबर संलग्न आहे.
  • भारताची सागरी सीमा (Water Boundaries) 2 देशांसोबत संलग्न आहे.
  • सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असणारे राज्य राजस्थान आहे.
  • मिझोरामची सीमा म्यानमार आणि बांग्लादेश या दोन देशांना लागून आहे.
  • भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार 29 अंशांपेक्षा जास्त आहे.
  • पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते.
  • स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो.
  • 82 अंश 30 पूर्व ह्या रेखावृत्तावर भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे.
  • विषुववृत्तापासून (Equator) च्या अंतरानुसार क्रम : मुंबई कोलकाता शिलाँग जोधपूर.
  • पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांश फिरते.
  • प्रत्येक रेखावृत्त (longitude) ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटांचा कालावधी लागतो.
  • सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत 2 तासांचा फरक आहे.
  • 10 डिग्री = अंदमान आणि निकोबार विलग करते,
  • 8 डिग्री = मिनिकॉय आणि मालदीव विलग करते,
  • 9 डिग्री = मिनिकॉय आणि लक्षद्वीप विलग करते, डंकन चॅनल लहान अंदमानला मोठ्या अंदमान पासून विलग करते.
  • 22 मार्च आणि 22 सप्टेंबर = दिवस आणि रात्र समान समान 12-12 तासांचे असतात.
  • उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर पुढील पाच आशियायी देशांच्या सीमा एकत्र आल्या आहेत = भारत, चीन, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान

अक्षांश आणि दिवसांचा कालावधी :

  • 0° = 12 तास,     41° = 15 तास,
  • 63° = 20 तास,      66.5° = 24 तास.
  • वर्षातील 21 जून हा सर्वात मोठ्या दिवस आहे.
  • भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ मध्ये पाच साडे (5.30) तासांचे अंतर आहे.
  • मॅकमोहन रेषा = भारत आणि चीन दरम्यान.
  • भारताला एकूण 7517km लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
  • भारताला एकूण 15200km लांबीची भूसीमा लाभलेली आहे.
  • प्रत्येक रेखावृत्ताची (Longitude or Meridian) लांबी 20000km आहे.
  • विषुववृत्तावर (Equator) दोन रेखावृत्तांमधील अंतर 111km असते.
  • खोरे क्षेत्र (Basin Area) नुसार नद्यांचा क्रम (sq.km मध्ये) = स्वर्णरेखा (20600), साबरमती (21674), ब्राह्मणी (39268), तापी (65145), नर्मदा (98796)
  • हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात, त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात त्यांना भाबर म्हणतात.
  • गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते कारण ईशान्य मान्सून वार्यामुळे (Monsoon) कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते.
  • भारत पाकिस्तान मधील सिंधू जल करारावर सखा 19 सप्टेंबर 1960 रोजी झाला.
  • आंतरराज्य पाणी विवाद अधिनियम 1956 मध्ये लागू.
  • गंगा नदीच्या पाण्याच्या वापराचा 30 वर्षांचा करार भारत आणि बांग्लादेश 1996 मध्ये झाला.
  • वालुका गिरी निर्मिती करिता वारा एका दिशेने वाहणे आवश्यक आहे.
  • पुरांकरीता कारणीभूत असणारे भूरूपशास्त्रीय घटक - मोठे पाणलोट क्षेत्र, पाण्याचा अपुरा निचरा.
  • स्नो ईटर वारे = चिनुक वारे
  • नैऋत्य मान्सून भारतात दोन मार्गांनी प्रवेश करतात = अरबी समुद्र व बंगाल उपसागरावरील वारे.
  • भारतातच्या पश्चिम घाटात = प्रतिरोध प्रकारचा पाऊस
  • तपांबर मध्ये 6.4°C ने दर 1000 मीटरला कमी होते.
  • विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा 5 अंश ते 30 अक्षांशापर्यंत आढळतो व्यापारी वाऱ्याचा पट्टा.
  • दव, दहिवर, सर्व प्रकारचे मेघ ही संघननाची रूपे आहेत
  • पर्जन्य हे संघननाचे रूप नाही
  • कोरड्या व ओल्या फुग्याचा तापमानक सापेक्ष आर्द्रतेचे मापन करतो.
  • बाष्प संपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.
  • हवा प्रदूषणाचे प्रतिबंधक उपाय : ऊर्जेचा कमी वापर, प्रदूषण सहनशील वनस्पतींची लागवड करणे, सौर व पवन ऊर्जा वापर
  • पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणारी मातीची धूप = शिंतोडो धूप
  • समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते = याला तापमानाचा सामान्य लोप दर म्हणतात.

🚩 छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास 🚩

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा महत्त्वपूर्ण इतिहास संपूर्ण 10 पानांमध्ये जाणून घ्या.

📚 MPSC | पोलीस भरती | तलाठी | ZP | SSC परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त!

📖 संपूर्ण इतिहास वाचा

🚩 VISIONGOV ACADEMY
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विश्वासाचे व्यासपीठ

Post a Comment

Previous Post Next Post