ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना.

१.२ ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना

प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे

बंगाल

ब्रिटिशांचा बंगालवरील विजय हा त्यांच्या भारतातील सत्तास्थापनेचा पाया मानला जातो. या विजयाने तत्कालीन जागतिक परिस्थितीत इंग्लंडचे महत्व अतोनात वाढले.

बंगालचे नवाब

अ.क्र. बंगालचे नवाब कालावधी वैशिष्ट्ये
मुर्शिदकुलीखान १७१७-२७ इजारा व्यवस्था सुरू केली
शुजाउद्दीन १७२७-३९
सरफराज खान १७३९-४०
अलीवर्दी खान १७४०-५६
सिराजउद्दौला १७५६-५७ प्लासीची लढाई
मीरजाफर १७५७-६०
मीरकासिम १७६०-६३ राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला हलवली.
मीरजाफर १७६३-६५ बक्सरची लढाई.
निजामुद्दौला १७६६-७०
१० शैफुद्दौला १७६६-७०
मुबारकउद्दौला १७७०-७५

महत्वाचे मुद्दे

  • इंग्रजांची भारतातील पहिली वखार (Factory म्हणजेच व्यापारी केंद्र) – सुरत (जहांगीरच्या काळात १६०८).
  • १६४० – मद्रास – सेंट जॉर्ज किल्ला
  • बंगालची पहिली वखार – १६५१ – हुगळी – परवानगी दिली – सुभेदार शाहशुजाने (शहाजहानचा दुसरा मुलगा)
  • १६५१ ला राजघराण्यातील एका स्त्रीवर डॉ. बाऊटन याने केलेल्या उपचारामुळे खूष होऊन – शाहशुजाने – फक्त ₹ 3000 वार्षिक रकमेच्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल बिहार व ओरिसात मुक्त व्यापाराची परवानगी दिली.
  • १६९८ सुभेदार अलीमशानाने – इंग्रजांना – सुतानती, कालिकत व गोविंदपूरची जमीनदारी दिली (तिन्ही मिळून आजचे कोलकत्ता) यात फक्त ₹ १२०० जुन्या मालकांना दिले.
  • १७१७ – मुघल बादशाह – 'फर्रुखसियार'कडून कंपनीला व्यापाराचे विशेषाधिकार मिळाले. त्यात कंपनीला –
    • बंगालमध्ये मालाची आयात-निर्यात जकातमुक्त.
    • मालवाहतुकीकरता जकातमुक्त परवाने (दस्तक) देण्याचा अधिकार कंपनीला.

फर्रुखसियारच्या फर्मानाचा गैरवापर

  • कंपनीच्या नोकरीत असलेल्यांना खाजगी व्यापाराची परवानगी. (पण तो व्यापार जकातमुक्त नाही)
  • या अधिकारांचा कंपनीकडून गैरवापर.
  • खाजगी व्यापारपण दस्तक देऊन जकातमुक्त करत.
  • बादशहाचे फर्मान असल्याने नवाबाला काहीच करता येत नसे.
  • जकातमुक्तीमुळे कंपनीची मोठी हानी होत होती. एकंदरीत हा वादाचा विषय बनला.

(१) मुर्शिदकुलीखान (१७१७-२७)

कंपनीच्या या कृत्याचा त्याने विरोध केला.

  • केंद्रीय मुघल सत्ता कमजोर असण्याच्या काळात – बंगालचा दिवाण नियुक्त झाल्यापासून तो वास्तविक शासक बनला. बादशाहला नजराणा पाठवायचा.
  • बंगालमध्ये शांतता स्थापण्याचा प्रयत्न केला.
  • त्यांच्या काळातील तीन विद्रोह
    1. सीताराम राय, उदय नारायण व गुलाम अहमद
    2. शुजात खान
    3. नजात खान
  • या सर्वांच्या जमिनदारी – रामजीवनला दिल्या.
  • गरीब शेतकऱ्यांना तकावी कर्ज दिले – वेळेवर भू-राजस्व भरण्याइतपत समर्थ होण्यासाठी.
  • जागीर जमिनीचा मोठा भाग – खालसा जमिनीत रूपांतर केली.
  • इजारा व्यवस्था (भू-राजस्व वसुलीसाठी ठेकेदारी पद्धत) सुरू केली.
  • जमींदार व सावकारांकडून राजस्व वसूल करणाऱ्या लोकांची भरती केली.

(२) शुजाउद्दीन (१७२७-३९)

➤ मुर्शिदकुली खानचा जावई

(३) सरफराज खान (१७३९-४०)

➤ शुजाउद्दीनचा मुलगा

(४) अलीवर्दीखान (१७४०-५६)

  • पहिल्या तिन्ही नवाबांच्या काळात बंगालमध्ये शांतता व सुव्यवस्था होती. हिंदू मुस्लिम सर्वांना रोजगाराच्या समान संधी होत्या. अनेक सैन्यदलातील व इतर उच्च पदांवर हिंदू लोक होते. तिन्ही नवाबांनी इंग्रजांना विशेषाधिकाराचा दुरुपयोग करू दिला नाही.
  • अलीवर्दीने – इंग्रज व फ्रेंचांना कलकत्ता व चंद्रनगरच्या फॅक्टरीवर तटबंदी बांधण्यास विरोध केला.

(५) सिराजउद्दौला (१७५६-५७)

  • ➤ अलीवर्दीचा नातू होता.
  • ➤ कंपनीने १७१७ च्या फर्मानाचा गैरवापर करू नये असे कंपनीला बजावले पण या काळात कंपनीने दक्षिणेत फ्रेंचांना हरवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. तसेच भारतीय राजकीय व लष्करी कमजोर दुबे त्यांच्या लक्षात आले

सिराजउद्दौला विरुद्धची कारणे

  • होते. त्याचा फायदा घेत त्यांनी उलट भारतीय मालावरच जबर जकात बसवली. ज्यांनी सबळत दिली त्यांच्यावर जकात लावली
  • सिराजचे शत्रू – शौकतजंग (पुर्णियाचा शासक) व घसिटी बेगम – (नवाबाची मावशी) – हिला इंग्रजांचे प्रबळ समर्थन.
  • कृष्णवल्लभ प्रकरण – नवाबाच्या सेवेत पैशांची अफरातफर केल्याने नवाबाच्या धाकाने – कंपनीच्या आश्रयाला गेला. त्याला नवाबाच्या स्वाधीन करायचे कंपनीने नाकारले.
  • वखारीभोवती तटबंदी – युरोपातील इंग्लंड-फ्रान्स युद्धाचे पडसाद भारतात उमटतील या धास्तीने दोघांनी बंगालमधील आपल्या वखारींना तटबंदी घालण्यास सुरुवात केली.
    नवाबाने – त्यांची ही कृती आपल्या सार्वभौमत्वावर आक्रमण समजले. त्याने ती पाडून टाकण्याचे व युद्ध न करण्याचे आदेश दोघांना दिले. फक्त फ्रेंचांनी आदेश मानून तटबंदी पाडली. या सर्व कारणांमुळे सिराज इंग्रजांवर नाराज होता.

सिराजची कृती –

  • काशिमबाजार फॅक्टरीवर कब्जा केला.
  • १५ जून १७५६ – फोर्ट विलीयमला वेढा.
  • इंग्रज शरण आल्यावर कलकत्त्याचा ताबा नवाबाने माणिकचंदकडे दिला.
  • कलकत्ता गव्हर्नर – ड्रेक होता.
  • काशिम बाजार युद्धकैदी – बंदर.

ब्लॅक होल – अंधारकोठडी –

  • नवाबाने पकडलेले १४६ इंग्रज युद्धकैदी (१८ बाय १४ फूटच्या) खोलीत उष्णता व प्राणवायू नसल्याने त्यातील १२३ कैद्यांचा मृत्यू.
  • ज. हॉलवेल जो (स्वतः एक कैदी होता) त्याने या घटनेचे वर्णन केले होते. या घटनेचा इंग्रजांनी युद्धाच्या समर्थनासाठी वापर केला.
  • इंग्रजांनी फुल्टा येथे आश्रय घेतला.

सिराजचा विश्वासघात करणारे:

  1. दरप्यान वॉटसन व क्लाईव्ह मद्रासहून – बंगाल कारस्थ्यानात सहभागी.
  2. माणिकचंदला लाच देणारा – क्लाईव्हने कलकत्ता ताब्यात घेतले (डिसें. १७५६)
  3. मीर जाफर – मीरबख्श (सेनापती) स्वामीद्रोही – अलीवर्दीच्या बहिणीशी लग्न झाले होते.
  4. अमीनचंद – धनाढ्य व्यापारी.
  5. जगातसेठ – बंगालचा सर्वात मोठा पेढीवाल.
  6. खादिमखान – नवाबाचा बडा लष्करी अधिकारी.

अलीनगरचा तह –

इंग्रजांनी हुल्लड लुटली. सिराज त्याविरोधात गेला. लढाई अनिश्चित पण दोघांत तह झाला. तहाची कारणे –

  • जानेवारी १७५७ – अहमदशाह दुराणीचे दिल्लीत आक्रमण तो बंगालात यायची शक्यता धरून.
  • युरोपात सप्तवार्षिक युद्ध – इंग्रज फ्रेंच यांच्यात. त्याच्या परिणामी फ्रेंच इथे सिराजशी एकत्र येतील या भीतीने तहाची कलमे
  • इंग्रजांना व्यापारातील पूर्वीच्या सवलती अधिकार मिळाले.
  • फोर्ट विलियम (कलकत्ता) तटबंदीस व लष्करी सिद्धतेस परवानगी.

मीरजाफर व कंपनी –

यांच्यात या काळात गुप्त करार. कराराचा मध्यस्थ – अमीनचंद (हा एक धनाढ्य शीख व्यापारी होता)

मीर जाफर बरोबरचा करार

  • मीर जाफरला – इंग्रजांनी नवाब बनवावे.
  • बदल्यात आक्रमणात्मक व संरक्षणात्मक करार
  • यात अनेक आर्थिक व प्रादेशिक लाभ कंपनीला झाले.

प्लासीची लढाई (जून १७५७)

  • इंग्रजांनी फ्रेंच वसाहत चंद्रनगर जिंकले (मार्च १७५७)
  • याच काळात नवाबाला अफगान व मराठ्यांच्या आक्रमणाचे भय होते.
  • अशात २३ जून १७५७ – (प्लासी) येथे क्लाईव्ह व नवाबाचे सैन्य समोरासमोर आले.
  • नवाबाच्या सैन्याचे नेतृत्व फितूर-मीरजाफरकडे होते.
  • लढाईत सिराजउद्दौला मारला गेला.

प्लासीचा परिणाम –

  • मेल्सन "There never was a battle in which the consequences were so vast, so immediate and so permanent."
  • बंगालसनंतर काही वर्षात – भारताचे सार्वभौमत्व – इंग्रजांकडे गेले.
  • व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय सत्तेत झाले.
  • अमाप द्रव्य संपत्ती हात जी इंग्लंडला पाठवली.
  • त्या बळावर प्रबळ लष्कराद्वारे – फ्रेंचाचे उचाटन शक्य झाले.

(६) मीरजाफर (१७५७-६०)

  • बंगालचा नवाब बनला.
  • इंग्रजांना २४ परगणे जिल्ह्यांचा प्रदेश दिला.
  • क्लाईव्ह व इतर अधिकाऱ्यांना लाखो रुपये भेट दिले.
  • बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांना दिल्या.
  • भविष्यात इंग्रजांना – खाजगी व्यापारावर कोणताही कर लागणार नाही याचे आश्वासन दिले.
  • नवाबाच्या संरक्षणासाठी ५० ची फौज. त्याबदल्यात बिहारमधील सोराचा एकाधिकार.
  • इंग्रज रेसिडेंट – वॉटसनच्या विशेष प्रभावात.
  • इंग्रजांच्या विरोधामुळे – विश्वासघातकी – दिवाण राय दुर्लभ व रामनारायण यांना शिक्षा करता आली नाही.
  • त्या काळात कंपनीच्या संचालकांचा आदेश –
    • मुंबई-मद्रास इलाक्यांचा खर्च – बंगालने करावा.
    • कंपनी निर्यातीकरता जेवढा माल भारतातून विकत घेईल त्याची किंमत बंगालच्या उत्पन्नातून दिली जावी.
    • इंग्रजांच्या मागण्या मीरजाफरच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या. कंपनीने केलेल्या पैशांची मागणी तो पूर्ण करू शकला नाही. म्हणून मीरजाफरला नवाब पदावरून दूर करण्याचे क्लाईव्हने ठरवले. यावेळी मीरजाफरने इंग्रजाविरुद्ध डचांशी हात मिळवणी केली.
    • क्लाईव्हने १७५९ ला बेदरा युद्धात डचांना हरवले.

(७) मीरकासीम – (१७६०-६३)

  • मीरजाफरचा जावई.
  • इंग्रज व मीरकासिम मध्ये तह (सप्टेंबर १७६०)

मीरकासिम बरोबरचा तह 1760 च्या अटी

  • कंपनीला – बर्दवान, मिदनापूर व चितागाव जिल्हे द्यावे.
  • दक्षिण मोहिमेसाठी ५ लाख द्यावे.
  • दोघांचे शत्रुमित्र एकच.
  • मीरकासिमने अधिकाऱ्यांना मोठमोठी बक्षिसे दिली.

मीरकासिमचा कार्यकाळ –

  • सत्तेवर येताच काही महिन्यात इंग्रजांचे देणे पूर्ण केले.
  • राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला – इंग्रजांचे साक्षिध्य टाळण्यासाठी.
  • सैन्यसंघटन युरोपियनप्रमाणे ठेऊन मुंगेरला आधुनिक तोफा व बंदुका तयार करण्याचा कारखाना.
  • रामनारायण – (बिहारचा नायब सुभेदार) हा बंडखोरांचा नेता – आता तो मीरकासिमची सत्ता मानत नव्हता. त्याला इंग्रजांचे समर्थन होते. त्याला ठार केले.
  • आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जुन्या करात वाढ. नवे लागू केले.
  • भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना दंडीत केले.
  • शिवाय जकातमुक्तीचा जो प्रचंड गैरफायदा कंपनी घेत असे तेही त्याला आवडत नसे. तसेच व्यापारी क्षेत्रात काही लढा निर्माण झाला तर त्याचा निकाल देण्याचा अधिकार इंग्रजांना राहील. याचा तो विरोध करत असे.
  • वादाच्या तणावातून मार्ग काढण्यासाठी
    1. गव्हर्नर व्हॅन्सिटार्टशी – १७६२ला – मौधीय येथे – मीरकासिमने भेट घेतली.
    2. इंग्रजांवर – ९% पेक्षा जास्त जकात नाही.
    3. व्यापार तंट्याचा निकाल नवाबाने द्यावा.
  • कौन्सिलने हे फेटाळून लावत फक्त २.५% जकात ठरवली व तंट्याचा निकाल इंग्रजांकडेच ठेवावा असे ठरवले.
  • शेवटी मीरकासिमने अंतर्गत व्यापारावरील सर्वांगीण जकात रद्द केली याचा इंग्रजांना राग आला.
  • पाटणा वखारीवर हल्ला केला. एलिसच्या नेतृत्वात नंतरच्या अनेक ठिकाणी मीरकासिम पराजित झाला.

पुन्हा मीरजाफर – नवाब (१७६३-६५)

  • त्याच्याकडून इंग्रजांनी भरपूर द्रव्य उकळले – युद्धखर्च, भेटी इ.
  • मीरकासिमने रद्द केलेली भारतीयांवरील जकात पुन्हा सुरू केली.
  • इंग्रजाशिवाय बंगालमध्ये कोणालाही तटबंदी बांधण्यास मनाई.

बक्सरची लढाई – (ऑक्टो. १७६४)

दरम्यान मीरकासिम अवधला गेला. तेथील नवाब सुजाउद्दौला, मुघल बादशाह – शहाआलम – तिघं इंग्रजाविरुद्ध एकत्र आले.

  • २२ ऑक्टोबर १७६४ बक्सर युद्ध.
  • इंग्रजांचे नेतृत्व मेजर हेक्टर मुन्लो.
परिणाम
  • प्लासीच्या विजयावर शिक्कामोर्तब.
  • अवध नवाब व मुघल बादशाह इंग्रजांना शरण आले.
  • बंगालचा नवाब खेळणे बनला.
  • प्रभाव क्षेत्र – अलाहाबादपर्यंत – दिल्लीचा मार्ग मोकळा झाला.

- यानंतर बंगालमध्ये – अराजकता.
- १७६५ ला क्लाईव्ह परत – गव्हर्नर.

इंग्रज मराठा संघर्ष

१७२ मध्ये माधवराव पेशव्यांचा मृत्यू व १७७३ ला नारायणरावांचा वध परिणामी मराठ्यांमधील अंतर्गत संघर्ष अतितीव्र झाला. रघुनाथरावाने स्वत:ला पेशवा घोषित केले

पेशव्यांचा कालानुक्रम

(१) बाळाजी विश्वनाथ १७१३-१७२०
(२) पहिला बाजीराव १७२०-१७४०
(३) बाळाजी बाजीराव १७४०-१७६१
(४) माधवराव १७६१-१७७२
(५) नारायणराव १७७२-१७७३
(६) सवाई माधवराव/नारायण (दुसरा) १७७४-१७९५
(७) बाजीराव (दुसरा) १७९६-१८१८

इंग्रज-मराठ्यांमध्ये तीन युद्धे झाली –

  • पहिले – १७७५-१७८२
  • दुसरे – १८०३-१८०५
  • तिसरे – १८१८

पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-८२)

या युद्धातील करारांचा क्रम –
  • सुरत – (१७७५)
  • पुरंदर – (१७७६)
  • वडगाव – (१७७९)
  • सालबाई – (१७८२)

लक्षात ठेवण्यासाठी – सुण्याने पुरंदरच्या वडाची साल काढली.

रघुनाथरावला पेशवे बनायचे होते. त्यासाठी मुंबईकर इंग्रज व त्यांच्यात सुरतचा करार झाला.

(१) सुरतचा करार (१७७५)

  • ठाणे, साष्टी, वसई व सुरतजवळील जंबुसर व ओलपाद हे तालुके रघुनाथरावाने कायमचे इंग्रजांना द्यावे, त्याबदल्यात इंग्रजांनी रघुनाथरावाला पुण्यात पेशवेपदी बसवावे.
  • यानंतर रघुनाथराव कंपनीच्या मदतीने पुण्याकडे निघाला 'अडास' येथे अनिर्णित लढाई झाली.
  • हेस्टिंग्जने (कलकत्ता कौन्सिलने) – हा तह रद्द केला. तोपर्यंत युद्ध सुरू झाले होते. त्याने कर्नल आप्टनला पुण्यात पाठवले. त्याने पुन्हा करार केला तोच पुरंदरचा तह.

(२) पुरंदरचा करार (१७६)

  • साष्टीसह ठाण्याचा किल्ला इंग्रजांकडे राहावा. दोघांमध्ये युद्ध संपावे.
  • रघुनाथरावाने राजकारणातून पूर्ण निवृत्त होऊन कोपरगाव येथे रहावे.
  • त्याच्या खर्चाकरता दरवर्षी ₹ ३ लाख १५ हजार पुणे सरकारने त्याला द्यावे.

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामुळे इंग्रज-फ्रेंच संबंध बिघडले असताना सेंट ल्युबिन या फ्रेंच माणसाचे पुण्यात स्वागत म्हणून हेस्टिंग्जने मराठ्यांशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. व मुंबईच्या मदतीला कलकत्त्याहून – गोडार्डला पाठवले.

नोव्हेंबर १७८ ला पेशव्यांनी तळेगाव वडगाव येथे इंग्रजांना हरवले. यावेळी पुण्याची सूत्रे नाना फडणवीसांच्या हाती होती.

(३) वडगावचा तह (१७७९) – पुणे दरबार व मुंबई सरकार यांच्यात.

  • १७७३ नंतर कंपनीने जिंकलेले सर्व प्रदेश मराठ्यांना परत करायचे.
  • भडौच येथून मिळणारा काही पैसा शिंद्यांना द्यायचा.
  • इंग्रजांनी रघुनाथरावाला मदत करू नये.

हेस्टिंग्जला हा करार मान्य नव्हता. या काळात नाना फडणविसांनी इंग्रजांविरुद्ध चार सत्ताधीशांची युती घडवून आणली. पुणे + नागपूर + हैद्राबाद + म्हैसूर.

इंग्रजांनी गुंटूर जिल्हा देऊन निजामाला फोडले. तसेच भोसल्यांना पण वेगळे केले. तिकडे जनरल गोडार्डने अहमदाबाद बडोद्यासह मध्य भारत जिंकला पण पुण्याजवळ तो पराभूत झाला.

कॅप्टन पोफॅमनने ग्वाल्हेर जिंकले, यानंतर मध्यस्थीचे काम महादजी शिंदे यांनी पाहिले.

(४) मे १७८२ – सालबाईचा तह – पुणे दरबार व कंपनी

  • दोन्ही पक्षांनी आपापल्या क्षेत्रावर अधिकार कायम करावा.
  • साष्टी, मुंबईजवळील लहान बेटे व भडौच इंग्रजांकडे.
  • रघुनाथरावाला यापुढे इंग्रजांनी कोणताही पाठिंबा देऊ नये.
  • इंग्रजांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही युरोपियनांशी पेशव्याने संबंध ठेऊ नये.
  • या कराराच्या अंमलबजावणीची हमी महादजी शिंदे यांनी दिली.

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

➤ १८०० मध्ये फडणविसांची मृत्यूनंतर, होळकरांविरुद्ध पेशवे व शिंदे यांची युती झाली. यावेळी बाजीराव पेशव्यांनी दौलतराव शिंदेचे समर्थन केले.

➤ १८०२ ला यशवंतराव होळकरांनी हडपसरच्या लढाईत पेशवे व शिंदे दोघांना हरवले. बाजीराव इंग्रजांच्या आश्रयास वसईत गेला. वसई करार ३१ डिसेंबर १८०२.

वसई करार 1802 च्या अटी

  • तैनाती फौजेची व्यवस्था मान्य.
  • कमितकम ६ हजार फौज तोफखान्यासह पुण्याला ठेवायची.
  • सुरत शहर कंपनीला दिले.
  • गुजरात, नर्मदा व तापी क्षेत्रातील तसेच तुंगभद्रा क्षेत्रातील एकूण ₹ २६ लाख उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना द्यावा बाजीरावाने कबूल केले.
  • इंग्रजांशीवाय – कोणत्याही युरोपियनांशी संबंध ठेऊ नये.
  • निजामाकडून चौथाई घेण्याचा अधिकार पेशव्याने सोडून दिला. तसेच गायकवाडांसोबत युद्ध न करण्याचे वचन

दिले. पेशव्याने स्वीकारलेल्या या तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले.

  • यावेळी बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष – कॅसलरेघ होता.

बाजीरावाने इंग्रजांच्या मदतीने घेतले पेशवेपद – सर्वांना नापसंत होते. इंग्रजांचा मराठी कारभारातील हस्तक्षेप व सिरसत्ताक मोडून काढला पाहिजे अशी सर्वांची भावना होती. या काळात गायकवाडांवर अप्रत्यक्ष इंग्रजांचे नियंत्रण आले होते आणि शिंदे व होळकर यांच्यातच बेबनाव झाला होता. अशावेळी शिंदे, व भोसले दोघांनी इंग्रजांशी टक्कर देण्याचे ठरवले. त्यातूनच दुसरे इंग्रज मराठा युद्ध उद्भवले.

  • दोघांनी एकत्र येऊ नये यासाठी वेलस्लीने – दोन आघाड्या उघडल्या.
  • उत्तरेला जनरल लेक व दक्षिणेला – ऑर्थर वेलस्ली (गव्हर्नर जनरल वेलस्लीचा लहान भाऊ)

देवगावचा तह (भोसले-कंपनी) – २५ डिसेंबर १८०३

  • कटक, बालासोर, वर्धा नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश इंग्रजांचा.
  • वसईच्या – तैनाती फौजेच्या अटी मान्य.

सुर्जी-अंजनगावचा तह (शिंदे-कंपनी) – ३० डिसेंबर १८०३

  • गंगा, यमुना दोआबमधील सर्व प्रदेश नगर, भडौच, अंजन, गोदावरी नदीमधील सर्व प्रदेश इंग्रजांचा राहील.
  • जयपूर, जोधपूर, गोहद या राज्यांवरील नियंत्रणाचा शिंद्यांनी त्याग केला, तसेच दिल्लीच्या सम्राटावरील नियंत्रणाचाही त्याग केला.
  • तैनाती फौजेच्या अटी मान्य केल्या.

यानंतर – यशवंतराव होळकरने एकाकी लढा दिला. पण शेवटी तोही पराभूत झाला.

जानेवारी १८०६ राजपूर घाट (राजघाट)चा तह (होळकर-कंपनी)

  • चंबळ नदीच्या वायव्येकडील प्रदेश इंग्रजांना दिला.
  • बुंदेलखंड क्षेत्रावरील नियंत्रणाचा त्याग केला.
  • पेशवा व कंपनीच्या इतर मित्रांवरील नियंत्रणाचा लढा.

➤ या दुसऱ्या युद्धाने मराठ्यांची सत्ता दुर्बळ झाली.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

➤ १८१३ ला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड हेस्टिंग्जची नियुक्ती झाली. त्याचे धोरण आक्रमक होते. पिंडाऱ्यांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षपणे मराठा सरोला आव्हान दिले.

➤ हेस्टिंग्जने भोसले, बाजीराव पेशवे व शिंदे यांना अपमानकारक तह स्वीकारण्यास भाग पाडले. त्यातून बाजीरावाने अंतिम युद्धाचा निर्णय घेतला. पेशव्यांसोबत आप्पासाहेब भोसले व मल्हारराव होळकर यांनी पण या निर्णयाला पाठिंबा दिला.

अहमदाबाद विवाद – गायकवाड × पेशवा.

  • गायकवाडांचा दूत 'गंगाधरशास्त्री'ची पुणे येथे हत्या. त्यावरून बडोद्याचे गायकवाड व पेशवे यांच्यातील संबंध ताणले गेले.

१३ जून १८१७ चा पुणे करार यानुसार –

  • मराठा राज्याचा सर्वोच्च शासक असल्याचा दावा पेशव्याने सोडला.
  • झांसी-ब्रिटिशांना देण्याचे मान्य केले.
  • या युद्धात गायकवाड व शिंदे वेगळे राहिले.

५ नोव्हेंबर १८१७ – ग्वाल्हेरचा करार (शिंदे)

  • राजपुताण्यावर शिंद्यांचा प्रभाव होता व तो १८०५ च्या कराराने ब्रिटिशांकडे गेला होता.
  • चांगली असल्याने राजपुतांना आपल्याकडे वळवले.
  • पिंडाऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना शिंद्यांनी मदत करावी व त्यांना आपल्या प्रदेशात थारा देऊ नये.
  • राजपुतांवरील सर्व हक्क सोडून द्यावेत.

अमीरखान-गफूरखान-यांना होळकरांपासून फोडले.

आप्पासाहेब भोसले + मल्हारराव होळकर + बाजीराव × इंग्रज

  • इंग्रजांनी त्यांना एकत्र येऊ न देता वेगवेगळे पराभूत केले.

महत्वाच्या लढाया

  • सिताबर्डी लढाईत – भोसले (नोव्हेंबर १८१७) पराभूत.
  • उज्जैन, महिदपूर लढाईत – होळकर (डिसेंबर १८१७) पराभूत (यशवंतरावाची पत्नी. तूळशीबाईने या युद्धात भाग घेतला होता.)
  • खडकी (नोव्हेंबर १८१७), कोरेगाव (जानेवारी १८१८), आष्टी (फेब्रुवारी १८१८) च्या लढाईत बाजीराव पराभूत

मंदसोर तह (होळकर-इंग्रज) ६ जानेवारी १८१८.

  • पेशवा नियंत्रण नाही.
  • तैनाती फौज मान्य केली.

➤ अशारीतीने – मराठा सत्तेची समाप्ती होऊन प्रदेशावर ब्रिटिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले.

म्हैसूर

१७६१ पर्यंत हैदरअली म्हैसूरचा शासक बनला. फ्रेंचांच्या मदतीने 'डिंडिगल' येथे शस्त्रागार स्थापन केले व लष्करी सामर्थ्याच्या बळावर बेदनूर, सुंदा, सेरा, कॅनरा व गुट्टी हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडले.

➤ इंग्रजांनी १७६५ ला निजामाशी करार केला. त्यानुसार हैदरअली विरुद्ध इंग्रजांनी निजामाला मदत करावी त्याबदल्यात निजाम उत्तर सरकारचा प्रदेश इंग्रजांना देईल असे ठरले.

प्रथम इंग्रज-म्हैसूर युद्ध (१७६७-६९)

  • हैदरअली विरोधात अनेकजण एकत्र आले इंग्रज + हैद्राबादचा निजामअली + मराठे + कर्नाटकचा नवाब.
  • हैदरअलीने पैसे देऊन मराठ्यांना तसेच प्रदेश देऊन निजामाला फोडले.
  • कर्नाटकवर आक्रमण केले. व मद्रासला वेढा दिला.
  • इंग्रजांचा सेनापती 'कर्नल स्मिथ' याला पराभूत केले.
  • ४ एप्रिल १७६९ ला इंग्रजांनी हैदरशी करार केला.

यानुसार एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत केले व एकमेकांना मदतीचे आश्वासन दिले.

दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध (१७८०-८४)

➤ या काळात गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग होता.

युद्धाची कारणे –

  • इंग्रजांनी हैदरचा विश्वासघात केला होता १७६९ च्या मदतीचा करारानुसार मराठ्यांनी हैदरवर आक्रमण केले (१७७१ ला) तेव्हा इंग्रजांनी हैदरच्या मदतीला यायला हवे होते पण आले नाही.
  • माहे बंदरावर इंग्रजांनी हल्ला केला कारण महत्त्वाची युद्धसामग्री (तोपा, बंदुका, दारूगोळा) हैदरला फ्रेंचांकडून या बंदरातून मिळत होती. त्यामुळे त्यावर हल्ला म्हणजे हैदरला आघात.
  • फ्रेंच व हैदर संबंधाची इंग्रजांना भीती होती. कारण अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात फ्रेंचांनी अमेरिकेला मदत केली होती.

➤ आता मराठे + निजाम + हैदर असे सारेजण इंग्रजांविरुद्ध एकत्र आले.

जुलै १७८० –

  • हैदरने कर्नाटकवर हल्ला केला. कर्नल बेली व मेजर मुन्रो दोघांना हरवले.
  • गव्हर्नर जनरल हेस्टिंग्जने निजामाला व नागपूरच्या भोसल्यांना फोडले.
  • पोर्टो नोव्हा येथे एकदा हैदर हरला पण नंतर श्रेयटेच्या नेतृत्वाखालील इंग्रज फौजेला हरवले.

दरम्यान – मे १७८२ ला –

  • हैदरला विश्वासात न घेता – मराठ्यांनी इंग्रजांशी सालबाईचा तह करून त्यांच्यापुरते हे युद्ध संपवले.
  • तरी हैदरची लढाई सुरूच होती त्याने जनरल आयरकूटचा पराभव केला.
  • हैदरअलीचा मृत्यू (डिसेंबर १७८२) झाला त्यानंतर त्याचा मुलगा टिपू ने युद्ध सुरू ठेवले.
  • दरम्यान मुंबईहून आलेल्या जनरल मॅथ्यूजने मंगळोर व बेदनूर जिंकले पण टिपूने ते परत घेतले व अनेक इंग्रजांना बंदी बनवले.
  • शेवटी मंगलोरचा तह (मार्च १७८४) झाला व दुसरे इंग्रज – म्हैसूर युद्ध संपले. या तहाने एकमेकांचे प्रदेश व युद्धकैदी परत केले.

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध (१७८९-९२)

➤ गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस.

या युद्धाचे कारण ठरले – त्रावणकोरचे राज्य.

  • तेथील राजाने तसेच टिपूच्या संरक्षणाखालील कोचीन संस्थानचा भाग घेण्याचा प्रयत्न केला. टिपूला हा हस्तक्षेप आवडला नाही. तसेच म्हैसूरच्या काही बंडखोरांनी त्रावणकोरमध्ये आश्रय घेतला होता त्यांना त्रावणकोरच्या राजाने टिपूला परत केले नाही. त्यामुळे संतप्त टिपूने १७९० ला त्रावणकोरवर हल्ला केला.

➤ तत्पूर्वी १७८४ ला इंग्रज त्रावणकोर तह झाला यानुसार एकमेकांना मदत करण्याचे ठरले.

  • इंग्रज + निजाम + मराठे × टिपू असे समीकरण तयार झाले.
  • कॉर्नवॉलिस – वेलोस्मार्गे बेंगलोरला गेला. ते जिंकले (मार्च १७९१) नंतर टिपूची राजधानी श्रीरंगपट्टणम जवळ पोहोचला.

श्रीरंगपट्टणमचा तह (मार्च १७९२) टिपू व कॉर्नवॉलिस यांच्यात झाला यानुसार टिपूला अर्धे राज्य गमवावे लागले.

  • इंग्रजांना बारामहल, डिंडीगूल, मालाबारचा प्रदेश मिळाला.
  • मराठ्यांना – तुंगभद्रा नदीचा उत्तर भाग दिला.
  • निजामाला – पेनार व कृष्णा नदीमधील भाग मिळाला.
  • युद्धखर्चणी – ३ कोटी (टिपूर) लादण्यात आली.
  • कॉर्नवॉलिस – "We have effectively crippled our enemy without making our friends too formidable".

चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध (१७९)

  • गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली
  • सेनापती – आर्थर वेलस्ली (लॉर्ड वेलस्लीचा भाऊ).

वेलस्लीने टिपूवर आरोप लावले की,

  • तो मराठे व निजाम मिळून – इंग्रजांविरुद्ध सारसंधान करत आहे
  • अरब, अफगाण, तुर्की, मॉरिशस व इतर फ्रान्सच्या साम्राज्य मंडळाशी पत्रव्यवहार करून इंग्रजांविरुद्ध मोठे कारस्थान करत आहे
  • शेवट टिपूने उत्तर समाधानकारक न वाटल्याने १७९९ ला वेलस्लीने लष्करी मोहीम काढली. सोबत निजामाचे सैन्य होते.

४ मे १७९ – श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यास वेढा या युद्धात टिपू धारातीर्थी पडला.

  • तहानुसार – कनक, कोयंबतूर, बेनाड, धारपूर व श्रीरंगपट्टणमचा किल्ला इंग्रजांकडे राहिला.
  • काही प्रदेश निजामाला देण्यात आला.
  • म्हैसूरचे छोटे राज्य वडियार घराण्याच्या कृष्णराजाला देण्यात आले. दिवाण म्हणून पूर्नैयाची नेमणूक केली. (जो टिपूचाही दिवाण होता.)
  • म्हैसूरने तैनाती फौज स्वीकारली.

➤ यानंतर टिपूच्या मृत्यूनंतर म्हैसूर इंग्रजांच्या प्रभावाखाली आले.

कर्नाटक

➤ इंग्रज-फ्रेंच युद्ध – हे युद्ध तसे पाहता फ्रेंच-इंग्रज यांच्यातील वादचं तरी प्रत्येक वेळी स्थानिक नेतृत्व, जमिनी, त्यांच्यातील भांडणे, अविश्वास, दगाबाजी यावरच लढले गेले.

युद्ध पार्श्वभूमी/कारणे महत्वाची लढाई तह (कराराचे नाव)
१ ले (१७४६-४८) ऑस्ट्रियातील वारसा युद्धाचा विस्तार सेंट टोमे एक्स-ला-शापेल
२ रे (१७४९-५४) भारतालीील वारसा युद्ध अम्बर, वल्हूर
त्रिचनापल्ली, अर्काट
पाँडिचेरी
३ रे (१७५६-६२) युरोपातील सातवर्षिक युद्धाचा विस्तार तंजौर, वांदिवाश पॅरिस

प्रथम इंग्रज-फ्रेंच युद्ध (१७४६-४८)

  • हे युद्ध म्हणजे युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धाचा भारतातील विस्तार.
  • इंग्रजांनी (बार्नेट नेतृत्वात) फ्रेंचांची जहाजे पकडली. तेव्हा पाँडिचेरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले होता.
  • फ्रेंचांनी इंग्रजांचे मद्रासचे ठाणे जिंकले. तेथील गव्हर्नर 'मोर्स' होता. मदतीसाठी इंग्रजांनी कर्नाटकचा नवाब - 'अन्वरुद्दीन'कडे मदत मागितली.
  • सेंट टोमे लढाई – अन्वरुद्दीन × फ्रेंच यांच्यात झाली.
  • नवाब अन्वरुद्दीनने दोघांना आपल्या भूमीवर लढण्यास मनाई केली. पण फ्रेंचांनी 'मद्रास' जिंकल्यावर ते देण्याचे आश्वासन नवाबाला दिले पण नंतर पाळले नाही त्यामुळे नवाबाने सैन्य पाठवले. ते पराजित झाले.
  • फ्रेंचाचे नेतृत्व – कं. पराडाइजकडे तर नवाबाचे नेतृत्व – महफूजखानकडे होते.
  • एक्स-ला-शापेल (Aix-La-Chapelle) तहानुसार (१७४८) हे युद्ध संपले. कारण या तहानुसार युरोपातील युद्ध संपले

दुसरे इंग्रज-फ्रेंच युद्ध (१७४९-५४)

  • कर्नाटकचा नवाब अन्वरुद्दीन याचा (मेहुणा) दिवाण चंदासाहेब याला अर्काटचा नवाब बनवायचे होते.
  • हैद्राबादचा निजाम-उल-मुल्क आसफजहाच्या मृत्यूंनंतर त्याचा मुलगा नासिरजंग व नातू मुजफ्फरजंग यांच्यात द. सुभेदारीवरून यादवी सुरू होती.
  • फ्रेंचाच्या डुप्लेने मुझफ्फर व चंदासाहेब या दोघांशी करार केला व दोघांना मदतीचे आश्वासन दिले, तर इंग्रजांनी नासिरजंग व न्वरुद्दीनची बाजू घेतली.

अम्बरची लढाई (१७४९) –

  • मुजफ्फरजंग + चंदासाहेब + फ्रेंच यांनी मिळून अन्वरुद्दीनला हरवून ठार केले.
  • चंदासाहेब नवाब झाला. फ्रेंचानी मदत केली म्हणून पाँडिचेरी जवळील ८० गावे फ्रेंच कंपनीला दिली.

वल्हूर येथे नासिरजंगाचे – मुजफ्फरजंग व डुप्ले यांच्याशी युद्ध झाले. यात नासिरजंग मारला गेला (डिसेंबर १७५०).

  • यानंतर मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला – त्याने फ्रेंचाना मसलीपट्टणम पाँडिचेरीजवळचा मोठा प्रदेश व ५ लाख दिले.
  • डुप्ले – कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील केप कामेरीनपर्यंतच्या प्रदेशाचा गव्हर्नर बनला. डुप्लेने बुशीला – हैद्राबादच्या दरबारात ठेवले. मुझफ्फरच्या निधनानंतर निजामाचा तिसरा मुलगा – सालाबतजंग – गादीवर बसला. त्यांच्याकडून 'नॉर्दन सरकारचे' ४ जिल्हे – इंग्रजांना मिळाले मुस्तफानगर, एल्लोर, राजमुंद्री व चिकाकोल.

त्रिचनापल्ली – अन्वरुद्दीनचा मुलगा मुहम्मदअलीने इंग्रजांकडे आश्रय घेतला. किल्ल्याला फ्रेंच व चंदासाहेबाने वेढा दिला. म्हणून इंग्रजांनी फ्रेंचाच्या अर्काटला वेढा दिला. त्रिचनापल्लीची फ्रेंच फौज अर्काटला आली. त्यामुळे त्रिचनापल्ली येथे फ्रेंच हरले.

१७५४ मध्ये – डुप्लेनंतर – 'गॉडेव्हू' आला, इंग्रज व गॉडेव्हू (फ्रेंच) यांच्यात पाँडिचेरीच्या तहाने हे युद्ध संपले.

  • यानुसार –
    • मद्रास, फोर्ट सेंट डेव्हिड, देविकोटा – ब्रिटिशांकडे.
    • पाँडिचेरी, कारीकल – फ्रेंचांकडे.

तिसरे इंग्रज-फ्रेंच युद्ध (१७५६-६२)

  • १७५६ चे युरोपातील सतवर्षिय युद्धाचा भारतातील पडसाद म्हणजे हे युद्ध.
  • एप्रिल १७५८ – फ्रेंचांचा काऊंट लॅली – भारतात आला. तोपर्यंत इंग्रजांनी प्लासीत विजय मिळवला होता. तेथील साधनसामग्रीचा वापर या भागात करणे त्यांना शक्य झाले होते.
  • इंग्रज सिराजुद्दोलासारखी आपली गत करतील असे वाटून सालाबतजंग याने फ्रेंचांशी संबंध तोडले व तो इंग्रजांना शरण आला. इंग्रजाचे नेतृत्व – सर आयर कूट यांच्याकडे होते.

काऊंट लालीने १७५८ ला पाँडिचेरी जवळील सेंट डेव्हिडचा किल्ला जिंकला नंतर तंजावरवर आक्रमण केले पण त्यात त्याला अपयश आले. नंतर मद्रासला वेढा दिला – पण इंग्रजांच्या शक्तिशाली आरमारामुळे तो वेढा उठवला- आरमारात इंग्रजाचे नेतृत्व – पोकॉक व फ्रेंचाचे नेतृत्व – डी ऑश यात फ्रेंचाचा तीन वेळा पराभव.

वांदीवाशीची लढाई – २२ जानेवारी १७६०. ब्रिटिश सेनापती – आयर कूट. बुशीला पकोत, पाँडिचेरी, जिंजी व

माही बंदर ब्रिटिशांनी जिंकले, फ्रेंचाचा अंतिम पराभव झाला.

१७६३ पॅरिसच्या तहाने – सतवर्षिय युद्ध थांबले परिणामी हे पण युद्ध थांबले – पाँडिचेरी व काही प्रदेश फ्रेंचाना परत मिळाला.

पंजाब

  • मुगलानंतर पंजाबवर – अहमदशाह अब्दालीचे सततचे आक्रमण व्हायचे तो पंजाबला अफगाणचा भाग समजायचा. त्याच्यानंतर (१७२ मृत्यू) निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत – शिखांच्या नेतृत्वाखाली. १२ 'मिसल' (लोकशाही पद्धतीच्या आधारावर लष्करी 'मिसल' राज्ये) उदयास आली. त्यापैकी 'रावी' व 'चिनाब' यामधील एक – 'सुकरचकिया'.
  • सुकरचकियाचा प्रमुख महासिंह याचा मुलगा 'रणजितसिंह'. १७९७ पासून – रणजितसिंहाने सुकरचकियाची पूर्ण सत्ता हातात घेतली.
  • अब्दालीचा नातू 'झमानशहा' याचेही पंजाबवर सतत आक्रमण होत होते.
  • १७९८ ला झमानशहाच्या शेवटच्या आक्रमणावेळी त्याने जाताना त्याच्या ज्या काही तोफा चिनाब नदीत पडल्या होत्या. त्या काढून रणजितसिंहाने झमानशहाकडे पाठविल्या. त्याच्या या मदतीबद्दल झमानशहाने रणजितसिंहाला 'राजा' किताब देऊन त्याला 'लाहोरचा गव्हर्नर' म्हणून नियुक्त केले.
  • अल्पवयातच 'अफगाणांचे वर्चस्व' झुगारून लाहोर येथे स्वशासनाची स्थापना रणजितसिंहाने केली.
  • रणजितची राजधानी – लाहोर.

झमानचे आक्रमण व नेपोलियनच्या आक्रमणाची धास्ती म्हणून ब्रिटिशांनी मैत्रीसाठी आपला प्रतिनिधी 'युसूफ खान' याला रणजितसिंहाच्या दरबारात पाठवले.

रणजितसिंहाचा अफगाणांशी संबंध –

  • अब्दालीचा नातू शाहशुजा – १८० ला अफगाणचा शासक बनला.
  • बरकझाई व सदाजाई टोळ्यातील संघर्षामुळे शाहशुजा – परागंदा होऊन रणजितसिंहाच्या आश्रयाला आला.
  • त्याला काबूलवर परत बसण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून रणजितने कोहिनूर हिरा परत घेतला.
  • यानंतर शाहशुजा नैराश्याने इंग्रजांकडे गेला तेथून परत रणजितकडे मदतीला आला.

इंग्रजांशी संबंध –

  • दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या शेवटी – १८०५ ला यशवंतराव होळकर – इंग्रजांविरुद्ध मदतीसाठी रणजितसिंहाकडे आला. पण प्रबळ इंग्रजांशी संघर्ष नको म्हणून रणजितने मदत नाकारली.

१८०६ चा करार –

  • रणजितसिंह + ब्रिटिश (लॉर्ड लेक) + कपूर थळ्याचा सरदार फतेसिंग यांच्यात १८०६ ला करार झाला.
  • शिखांनी – ब्रिटिशांशी शत्रूशी कोणताही संपर्क ठेऊ नये.
  • त्या बदल्यात ब्रिटिश फौजा त्यांच्या प्रदेशात शिरणार नाही.
  • पुढील काळातील गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो (१८०९-१३) याने नेपोलियनच्या आक्रमणाच्या धास्तीने – मेटकाफ याला रणजितसिंहाशी संरक्षणात्मक करार करण्यासाठी पाठवले.
  • परंतु दरम्यान स्पेनच्या बंडामुळे नेपोलियनच्या आक्रमणाचा धोका टळल्याने इंग्रजांनी कठोर धोरणाचा अवलंब केला.
  • १८०९ ला ब्रिटिश फौजा (सेनापती – डेव्हिड ऑक्टरलोनी) यमुना ओलांडून लुधियानाकडे गेला व त्याचवेळी घोषित

रणजितसिंह व ब्रिटिश संबंध

करे की, सतलजच्या दक्षिणेकडील सीख राज्ये ब्रिटिश संरक्षणाखाली आहेत. आता आक्रमण झाल्यास ते प्रतिकार करतील.

  • अर्विद रणजितसिंहाने मगते पळवून १८०९ चा करार केला.

२५ एप्रिल १८०९ चा 'अमृतसरचा करार' – रणजितसिंह व ब्रिटिश

  1. सतलज व रणजितसिंह यांच्यात कायम मैत्री राहील. हा राज्याचा ब्रिटिश आदर मानतील
  2. सतलजच्या ताढ्यातील ३५ परगणे त्याच्याच ताब्यात राहतील. फक्त अट ही की त्या प्रदेशात अंतर्गत सुरक्षितता आवश्यक तेवढीच फौज ठेवावी.
  3. सतलज नदी राज्याची दक्षिण सीमा मानावी.

रणजितसिंहाच्या विजयांची कालानुक्रम

  • १८१३ मध्ये त्याने नेपाळकडून कांगडा व अफगाणांकडून अटक घेतले
  • १८१८ मुलतान जिंकले
  • १८२३ पर्यंत संपूर्ण पंजाबवर स्वतःची सार्वभौम एकसूत्री सत्तास्था स्थापिली
  • १८१० ते १८२८ अफगाणांविरुद्ध अनेक मोहिमा काढल्या
  • १८१९ पर्यंत संपूर्ण काश्मीर – रणजितसिंहाच्या अंमलाखाली आला.
  • १८२४ पेशावर जिंकले.
  • कंपनीने सिंधबाबत – रणजितचे काहीच चालू दिले नाही.
  • १८३१ अलेक्झांडर बर्न्स – सिंधू नदी मार्गे – लाहोर येथे पोहोचला.
  • ऑक्टोबर १८३१ ला – रोपड येथे – गव्हर्नर जनरल बेंटिक व रणजितसिंह यांची भेट झाली, रणजितने – ब्रिटिशांपुढे कायमच नगले घोतले.

रणजितसिंह व ब्रिटिश संबंध

ब्रिटिशांशी केलेल्या कराराबाबत तो जीवनभर प्रामाणिक राहिला. ब्रिटिशांच्या अडचणीचा फायदा त्याने घेतला नाही.
  • दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात १८०५ ला यशवंत होळकरना मदत नाकारली.
  • १८१४ युद्धात नेपाळने मदत मागितली ती दिली नाही.
  • तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धापूर्वी ब्रिटिशाविरुद्ध युती करण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने मागितलेली मदत नाकारली. त्याच युद्धात नागपूर भोसल्याच्या मदतीसाठीची मिण्कष राहिला.
  • १८२४ ला नेपाळच्या संरक्षणात्मक कराराची सूचना तर १८२५ मध्ये भरतपूरने केलेल्या मदतीची मागणी धुडकावली.
ब्रिटिशांनी असा प्रामाणिकपणा राखला नाही.
  • उदा. १८२६ वहाबींनी शिखांविरुद्ध 'जिहाद' पुकारला त्याची तयारी ब्रिटिशांच्याच प्रदेशात राहून केली. तरी त्यांना पाठिंबा दिला.
पंजाबनंतर रणजितचा सिंधवर ताबा घेण्याचा प्रयत्न. ब्रिटिशांनी गोडीने त्याला परावृत्त केले. ऑक्टोबर १८३१ला गव्हर्नर जनरल बेंटिक व रणजित यांच्यात रोपड (रोपड) येथे मैत्री कराराचे नुनीकरण झाले.
  • सिंधू नदीच्या पश्चिमेकडील शिकारपूर जिंकता येणार नाही असे त्यांनी सांगितले. वास्तविक त्यामुळे १८०९ च्या कराराचा भंग होणार नव्हता. रणजितने वाद मोडला.
  • रणजितचा मांडलिक फिरोजपूरचा शासक निपुणिक मृत्यू पावल्यावर १८३५ मध्ये ब्रिटिशांनी ते ताब्यात घेतले. व १८३८ मध्ये लष्करी तळ म्हणून त्याचा वापर करण्यास सुरुवात तेथून राजधानी लाहोर फक्त – ४० मैलावर होते.

रणजितसिंहचे प्रशासन –

  • त्याचे कार्य खालसाच्या नावावर चाले. सरकारचे नाव – 'सरकार-ए-खालसाजी' ठेवले तसेच गुरु नानक व गुरु गोविंदसिंह यांच्या नावाने सिक्के काढले. राज्याच्या मदतीसाठी मंत्रिमंडळ होते.
  • संपूर्ण राज्याचे विभाजन – प्रांतामध्ये. प्रांताचा प्रशासक – नाजिम होता.

    प्रांत – नाजिम

    जिल्हा – कारदार

    ग्राम

  • स्थानिक परंपरेनुसार – न्यायदान होत असे.
    • सर्वोच्च न्यायालय – लाहोर – अदालत-ए-आला
    • आर्थिक क्षमतेनुसार दंड.
    • न्यायालयीन दंड-सरकारच्या उत्पन्नाचे साधन होते.

लष्कर –

  • युरोपियन पद्धतीवर आधारित.
  • १८०५ ला जनरल व्हेनुरा (पायदळ प्रमुख) व अलार्ड (घोडदल प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली.
  • १८२२ ला 'फौज-ए-खास' या नावाने एक खास दल.
  • या दलाच्या कवायतीची भाषा होती – फ्रेंच.
  • तोपखान्याचा प्रमुख – इलाही बक्ष.
  • रणजितच्या सैन्यात – ३९ परकीय अधिकारी होते. (विविध देशांचे)
  • उच्च पदावरील – व्हेनुरा, अलार्ड, कोर्ट, गार्डनर यांनी तोफखान्याचे पुर्नसंघटन केले.
  • व्हेनुरा – डेराजातचा गव्हर्नर होता.
  • १८३७ ला पेशावरचा गव्हर्नर – एविटेबल.
  • मुसलमान फकीर – अजीजुद्दीन त्याचा परराष्ट्रमंत्री होता.
  • जमादार – डोगरा बंधु – खुशालसिंह व तेजसिंह.
  • दिवाण – दिनानाथ.
  • राजमहालाबाहेर मोठी पेटी कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी ठेवली होती. त्याची चावी रणजितसिंहजवळ राहत असे.
  • पक्षाघाताने रणजितचा मृत्यू – जून १८३९.
  • फ्रेंच पर्यटक व्हिक्टर जॅक्वेमाँट याने रणजितची तुलना नेपोलियनबरोबर केली.

रणजितच्या प्रशासनातील दोष –

  • सैनिकांचे पगार वेळेवर नाही.
  • मर्जीतिल अधिकारी – प्रशासनात जे अकार्यक्षम होते.
  • रणजितने तीन डोग्रा बंधूंना राजा किताब दिला. गुलाबसिंग, ध्यानसिंग (दरबारात मुख्यमंत्री), सुचेतसिंग

रणजितच्या मृत्यूनंतर – लष्कर प्रमुख झालेले – लालसिंग-तेजसिंग-शीख नद्वले. रणजितला शीखांबद्दल साशंकता होती. सर्व एकमेकांना खालसाचे समान सदस्य मानत. त्यामुळे एका शिखाला ते राजा म्हणून स्वीकारतील किंवा नाही या शंकेने शीखसरदारांना जबाबदारीची पदे दिली. तसेच त्याच्या उदय काळात शीखांमध्ये पदायोग्य माणसे आढळली नाहीत.

रणजितने ब्रिटिशांबतचे करार पाळले पण त्यांनी पाळले नाही.

रणजितसिंहाचे चारित्र्य उच्च दर्जाचे नव्हते, नितीमत्तेचा अभाव. राणी जिंदन विषयनासक्त तिच्या चारित्र्याबद्दल चर्चा होत असे.

रणजितनंतर पंजाब –

इंग्रज शिख युद्ध –

  • रणजितसिंगनंतर त्यांचा मुलगा खड्गसिंह राजा झाला, पण त्याला अफूचे व्यसन होते. वजीर म्हणून ध्यानसिंह काम पाहत होता. दरबारात दोन गट पडले होते.
    1. सिंधनावालिया, चेतसिंह, अतारसिंह, लेहनसिंह, अजितसिंह,
    2. डोगराबंधु, ध्यानसिंह, गुलाबसिंह, सुचेत सिंह.

रणजितसिंह (१७९२-१८३९)

खड्गसिंह (१८३९-४०)

नौनिहालसिंह (१८४०)

शेरसिंह (१८४१-४३)

दलिपसिंह (१८४३-४९)

यापैकी खड्गसिंह, शेरसिंह व दलिपसिंह ही रणजितसिंहची मुले होती.

  • त्याची संरक्षिका म्हणून आई जिंदन कौर – व वजीर म्हणून हिरासिंह यांची नियुक्त.
  • त्याच्या मृत्यूनंतर वजीर – लालसिंग व सेनापति – तेजसिंह.

पहिले इंग्रज-शिख युद्ध (१८४५-४६)

  • १८४ ला गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिजने सूत्रे हाती घेतली. त्यापूर्वी – लॉर्ड एलनबरो.
  • लुधियाना येथील ब्रिटिश पोलिटिकल एजंट – मेजर ब्रॉड फूट.
  • हार्डिजने पंजाबमधील कंपनीची सैन्यसंख्या वाढवली, सतलजवर पूल करण्याची तयारी केली. यामुळे शिखांना वाटले ब्रिटिशाना आक्रमण करून युद्ध करायचे आहे. तर ते त्यांच्याच भूमीवर लढायचे असे ठरवून डिसेंबर १८४५ला शीख सैन्याने हरिके व कसूर मधून सतलज पार केली. यावेळी इंग्रजांचे नेतृत्व केले ह्यू गफ यांनी केले.
  • हार्डिजची युद्ध घोषणा – १३ डिसेंबर १८४५.
  • या युद्धातील निर्णायक लढाया – (१) मुदकी (२) फिरोजशहा (३) भैरोवाल (४) अलीवाल
  • शेवटची निर्णायक लढाई – सुबरावची लढाई (सोब्रान) १० फेब्रुवारी १८४६.
  • विश्वासघातकी – लालसिंग-तेजसिंह पळून गेले, इंग्रजांना मदत केली. यावेळी ग. ज. हार्डिज युद्धभूमीवर होते. शिखांचा पराभव झाला.

लाहोरचा तह (९ मार्च १८४६)

  • सतलजपलीकडील शिखांची सर्व राज्ये व मालमत्ता, जालंदर दोआब व हजारा हे प्रदेश ब्रिटिशांना मिळाले.
  • दलिपसिंहाने शिख सैन्य कमी करण्याचे व त्यांची हत्यारे लपवून ठेवण्याचे मान्य केले.
    • - पायदळ 20,000 व घोडदळ 12,000 इतकेच ठेवण्याचे मान्य केले.
  • ब्रिटिशांच्या संमतीशिवाय कोणताही ब्रिटिश किंवा युरोपीय नागरिकांना सेवेत ठेवणार नाही.
  • दलिपसिंह पंजाबचा राजा, राणी जिंदन कौर – संरक्षिका व लालसिंहाला वजीर म्हणून मान्यता.
  • लाहोर रेसिडेंट – हेन्री लॉरेन्स. पंजाबच्या अंतर्गत भागात कंपनी हस्तक्षेप करणार नाही.
  • काश्मीरचा महाराजा गुलाबसिंहाला मान्यता.

दुसरे इंग्रज-शिख युद्ध (१८४८-१८४९)

  • ११ मार्च १८४६ ला एक पूरक तह करून १८४८ च्या शेवटपर्यंत इंग्रज सैन्य लाहोर येथे ठेवण्याचे ठरले. ती मुदत जवळ येत असताच्याच पहिल्याच हार्डिजने दलिपसिंह अल्पवयीन असल्याचे कारण सांगून सैन्य तेथेच कसे राहील हे व्यवस्था पाहिली. यामुळे –

भैरोवालचा तह (२ डिसेंबर १८४६)

या तहामुळे व्यावहारिकदृष्ट्या – ब्रिटिश पंजाबचे खरे स्वामी बनले.

  • आठ ब्रिटिशानुकूल सरदारांचे एक 'रिजन्सी कौन्सिल' स्थापून त्या कौन्सिलने रेसिडेंटच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे शासन चालवावे.
  • राणी जिंदनला – रु १.५० लाख पेन्शन देऊन राजकारणातून दूर केले. रिजन्सी कौन्सिलची ती सदस्यही नव्हती.
  • लाहोर येथे ब्रिटिश फौज ठेवण्यात आली. लाहोर क्षेत्रावरील अधिकार ब्रिटिशांना. या फौजेच्या खर्चा सालीना रु २२ लाख ब्रिटिशांना द्यावे होते.
  • १८५४ मध्ये दलिपसिंह सज्ञान होईपर्यंत ही व्यवस्था चालू राहायची होती.
  • नंतर जानेवारी १८४८ मध्ये हार्डिजऐवजी गव्हर्नर म्हणून – डलहौसी याची नेमणूक झाली.
  • मुलतानचा गव्हर्नर 'मूलराज' याच्या बंडामुळे इंग्रजाना पंजाबवर आक्रमणाची संधी मिळाली.
  • बंडाचा प्रसार – इतर भागातही झाला. हजारा प्रांताचा गव्हर्नर छतरसिंहाचे बंड. लष्कर विसर्जन – सैन्याच्या मनात कपात पातळू शिख सैनिकात तीव्र असंतोष व नाराजी.
  • तेजसिंहाला 'राजा' किताब देवेसी व ८ वर्षाचा दलिपसिंहाने त्याच्या कपाळावर टिका लावण्याचे नाकारले. हा स्वतःचा अपमान समजून इंग्रजांनी राणी जिंदनला जबरदस्तीने घरात चुनर किल्ल्यात कैदेत ठेवले.
    • त्यामागचे खरे कारण – असे की, ब्रिटिशांना खंबीर विरोध राणीच करू शकत होती. राणीच्या या अपमानामुळे शीखात ब्रिटिशविरोधी वातावरण पसरले.
  • मुलतानचा गव्हर्नर सावनमल १८४ मध्ये मेला. त्याचा मुलगा 'मूलराज' गव्हर्नर झाला.
    • राणीला कारागृहात डांबणे हा हार्डिजने पंजाबवर केलेला अखेरचा आघात होता. जानेवारी १८४८ ला तो परत गेला व डलहौसी आला.
  • लाहोर येथील ब्रिटिश एजंट बदलला – लॉरेन्सच्या जागी – फ्रेडरिक करी आला.
  • हजारा गव्हर्नर – छतरसिंह याच्या मुलीचा विवाह दलिपसिंहाशी ठरला होता. तो इंग्रज होऊ देत नव्हते. त्याच्याविरुद्ध बंडाचं कारस्थान झालय. त्याचा मुलगा शेरसिंह – मुलताना जाऊन मिळाला. १४ सप्टेंबर १८४८ ब्रिटिशांनी मुलतानचा गव्हर्नर म्हणून – सरदार खनसिंह याची नियुक्ती. त्याच्यासोबत – व्हॅन्स ऑग्न्यू व डब्ल्यू ए. अँडरसन

हे दोन ब्रिटिश अधिकारी दिले. त्यांच्या उद्धट वर्तणुकीने प्रजा अधिकच बंडखोर झाली. हा असंतोष लॉर्ड डलहौसीला संपूर्ण पंजाबात पसरवून द्यायचा होता. कारण एखादच आक्रमण करून पंजाब ब्रिटिश साम्राज्याला जोडता येणार होते.

  • लग्नापासरी लढाई घात इंग्रजाचे नेतृत्व ह्यू गफ याने केले. रावी नदी ओलांडल्यावर संघर्ष झाला.
  • सादुल्लापूरची लढाई अनिर्णित ठरली.
  • जानेवारी १८४९ ला मुलतानची शरणागती – जनरल विश.
  • जानेवारी १८४९ – चिलियनवाला लढाई – शेरसिंग × ब्रिटिश नेतृत्व – लॉर्ड ग. ब्रिटिश हरले. यामुळे ह्यू गफच्या जागी – चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात आली.

फेब्रुवारी १८४९ – गुजरात (चिनाब नदीजवळ) – तोफांची लढाई 'The Battle of the Guns.'

  • महत्वाची लढाई यामुळे पंजाब इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • लढाई निर्णायक असण्याचे कारण तोफा होत्या, तीन तासांच्या तोफांच्या माऱ्याने शिखांचे बळ कोलमडले.
  • १२ मार्च १८४९ ला शिखांनी शरणागती पत्करली.

पंजाबचे विलिनीकरण – २९ मार्च १८४९ ला महाराजा दलिपसिंहाला पदच्युत करून पंजाब ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यात आल्याची घोषणा 'डलहौसी' ने केली.

  • ६ एप्रिल १८४९ राणी जिंदनला चुनरच्या किल्ल्यात ठेवले व महाराजा दलिपसिंग यांनी मार्च १८५३ ला ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेतली. राणी नंतर नेपाळला पळून गेली.
  • १८५४ ला राणी इंग्लंडला गेली. १८६३ ला राणी जिंदनचे निधन झाले. अंत्यसंस्कार नाशिकला करण्यात आले.
  • १८८६ ला दलिपसिंह – भारतात येण्यास निघाला. त्याला एडनला अटक करून पुन्हा इंग्लंडला पाठवले.
  • एडन येथे पुन्हा दलिपसिंहाने शीख धर्माचा स्वीकार.
  • १८८८ – रशियाला भेट.
  • २३ ऑक्टोबर १८९३ निधन.

अफगाणिस्तान

अहमदशाह अब्दालीच्या मृत्यूनंतर (१७७४) सदोजाई व बरकझाई या दोन टोळ्यांच्या यादवीत अफगाणिस्तान दुबळे झाले होते.

  • बरकझाई टोळ्यांचा प्रमुख – दोस्त महमद हा अफगाणिस्तानचा अमीर होता. तेथूनच आलेला आणखी एक अमीर – शाहशुजा (कोहिनूरवाला) रणजितसिंग सोडून (१८१८) ब्रिटिशांच्या आश्रयाला आला.
  • गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंडने – रॉबर्ट बर्न्सला एका व्यापारी शिष्टमंडळासोबत दोस्त महंमदशी बोलणी करायला पाठवले (१८३६) पण इराण रशियाशी अफगाणिस्तानचे युद्ध उद्भवले तर ब्रिटन अफगाणांच्या मदतीला तयार नव्हते. परिणामी करार फेटाळला व महंमद रशियाकडे वळला.
  • डिसेंबर १८३७ कॅप्टन विटकेविच – रशियन प्रतिनिधी काबूलला पोहोचला.
  • त्रिपक्षीय करार (२६ जून १८३८) – ब्रिटिश + रणजित + शाहशुजा यांच्यात झाला.
    • शाहशुजाला काबूलच्या गादीवर बसवणे.
    • ब्रिटिश व रणजितशिवाय कोणाशीही संबंध ठेवू नये.
    • काबूलला ब्रिटिश वकील असावा.

पहिले अफगाण युद्ध (१८३९-१८४२)

  • ब्रिटिश लष्कराचे नेतृत्व – जॉन कीन
  • नोव्हेंबर १८३९ – दोस्त महंमद कैदी म्हणून अफगाणिस्तानाला.
  • शाहशुजा काबूलचा राजा होता.
  • नोव्हेंबर १८४१ – अफगाणांनी रॉबर्ट बर्न्सची हत्या केली. दोस्त महंमदा मुलगा – अकबरखान त्याचे नेतृत्व करत होता.
  • डिसेंबर १८४१ – अकबरखानाशी करार – अफगाणिस्तान सोडणे.
  • फेब्रुवारी १८४२ – गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड एलेनबरो आला.
  • सप्टेंबर १८४२ – जनरल नॉट व पोलक यांनी काबूल जिंकले. अकबरखानाचा पराभव झाला.
  • ब्रिटिशांची माघार.

दुसरे अफगाण युद्ध (१८७८-८०)

  • १८७६ ला लॉर्ड लिटन – व्हाइसरॉय – झाला.
  • रशियाच्या वाढत्या शक्तीला आळा घालण्याच्या डिझरैली सरकारच्या विचारांचा लिटन समर्थक होता.
  • अफगाणचा नवा प्रमुख – शेर अली. सोबत करारासाठी लुईस पेलीला पाठवले.
    • रशियाविरुद्धच्या संरक्षणासाठी – निश्चित नियमित रक्कम ठरवली.
    • शेरअलीचा लहान मुलगा – अब्दुल्ला जानला वारस म्हणून घोषित करणे.
    • काबूलमध्ये ब्रिटिश रेसिडेंट ठेवणे.
  • शेरअलीने करार नाकारला – रशिया-ब्रिटन दोघांना सारखेच अंतरावर ठेवणार होता.
  • ग.ज.लिटन याला शेरअलीच्या या धोरणाचा राग येऊन त्याने कंदाहार कब्जा केला. गिलगिटला ब्रिटिश एजन्सी स्थापित केली व अफगाणिस्तान सिमेवर इंग्रजी अधिकारी पाठवले.
  • यावेळी रशियाने – ब्रिटनला शह म्हणून स्वतःचा दूत पाठवला.
  • लिटनचा अंतिम विरोध नाकारल्याने युद्धास सुरुवात. यात अफगाण हरले.
  • गंडमक करार – शेरअलीचा मुलगा – याकूब खा व इंग्रज यांच्यामध्ये गंडमक या ठिकाणी करार.

तिसरे अफगाण युद्ध (१९१९)

  • या आधी 'पंजदेह' संकट यात रशियाने अफगाणिस्तानचा 'पंजदेह' नामक प्रदेशावर कब्जा केल्यामुळे हे संकट उद्भवले.
  • १९०१ ला अब्दुर्रहमानचा मृत्यू. त्याचा मुलगा हबीबुल्ला गादीवर बसला. त्याने नवा करार करावा ही कर्झनची मागणी फेटाळली.
  • प्रभारी गव्हर्नर जनरल १९०४ ला आम्प्टहिलने सर लुई डेनला काबूलला पाठवले.
  • १९०५ ला करार होऊन तणाव निवळला.
  • १९०७ ला इंग्लंड-रशिया मैत्री करार झाला यात अफगाण प्रश्नावर निर्णय झाला.
    • हबीबुल्लाने या कराराला संमती दिली नाही. त्याच्या पाश्चात्यकडील कलामुळे १९१९ ला त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मुलगा अमानुल्ला गादीवर आला जो ब्रिटिश विरोधी होता.
  • ऑगस्ट १९१९ ला रावळपिंडीच्या कराराने युद्ध संपले. यावर १९२१ ला शिक्कामोर्तब झाले.
    • अफगाण स्वतंत्र राष्ट्र असल्याचे मान्य.
    • परराष्ट्र धोरणाबतचे ब्रिटिश नियंत्रण संपुष्टात.
    • अर्थसहाय्य बंद.
    • अफगाणमध्ये भारतातून येणारा माल जकातमुक्त असावा.
    • लंडन-काबूल येथे परस्परांचे वकील असावे.

ब्रह्मदेश

  • आलोमपोरा – या ब्रह्मी नेत्याने १७५० मध्ये पेंगूर आक्रमण करून तो आपल्या राज्याला जोडला.
  • ब्रह्मी राजाने १८२ ला महाबुदेलाच्या नेतृत्वात आसाम जिंकले. मणिपूर जिंकले.
  • चितगाव जिल्ह्यातील डाहापुरी बेट – ब्रह्मी आक्रमण झाले. त्याच्या मालकीवरून युद्ध उद्भवले.

पहिले ब्रह्मदेश युद्ध (१८२४-२६)

  • गव्हर्नर जनरल लॉर्ड अॅम्हर्स्ट.
  • मांदाबू करार – २४ फेब्रु. १८२६
  • आराकान व तेनसरीम हे किनाऱ्यावरील प्रदेश ब्रिटिशांना मिळाले.
  • ब्रह्मी राजाने काचर, जैन्तिया व आसाम यावरील हक्कावर पाणी सोडले.
  • मणिपूरच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • आव्ह (राजधानी) येथे ब्रिटिश वकील असावा याला मान्यता.
  • ब्रिटिशांना १ कोटी नुकसानभरपाई द्यावी.
  • लॉर्ड अॅम्हर्स्टला 'अर्ल अॅम्हर्स्ट ऑफ आराकान' ही पदवी.

दुसरे ब्रह्मदेश युद्ध (१८५२)

  • गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी.
  • १८३७ ला आलेल्या राजा थराबदी याने यांदाबू करार नाकारला. ब्रिटिशांचे नेतृत्व – जनरल गॉडविन.
  • जगभरातील मौल्यवान टिंबर रिसोर्सेसवर ताबा.
  • १८५२ ला संपूर्ण पेगू प्रांत ब्रिटिश साम्राज्याला जोडला गेला असल्याची घोषणा डलहौसीने केली.

तिसरे ब्रह्मदेश युद्ध (१८८५)

  • १८६२ चा करार – स्थायिक होणे, जहाजे इरावतीतून चीनपर्यंत नेणे.
  • १८७१ लंडन सरकार – ब्रह्मदेशाशी संबंध भारतीय व्हॉइसरॉयमार्फत ठेवले जातील.
  • लिटनच्या काळात वकीलाच्या वागणुकीवरून तणाव. माघारी बोलावले. संबंध सुधारण्याचे रिपनचे प्रयत्न निष्फळ.
  • १८७८ – राजा मिंडनचा मृत्यू. मुलगा थिबा गादीवर. थिबा १८८५ – फ्रेंच वकील हाऊस – मंडालेला (व्यापारी करार) बँक, लोहमार्ग, लाकूड, खाणीची परवानगी.
  • बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन – ब्रिटिश कंपनी १८५ – राजशाही Royalty वरून भांडण. उत्तरेत लाकडाचा व्यापार.
  • दंड देण्यास नकार. डफरिनने ऑक्टोबर १८८५ ला खलिता पाठवला.
  • लष्करी नेतृत्व जनरल प्रेंडरगास्ट – राजा हरला.
  • १ जानेवारी १८८६ उत्तर ब्रह्मदेश विलीन – डफरिनची घोषणा.
  • १८९७ ले. गव्हर्नरची नियुक्ती.
  • १८६ चीन-ब्रिटन करार – तिबेट – ब्रह्मदेश संदर्भात.
  • १९३५ ब्रह्मदेशाची स्वतंत्र घटना तयार करण्यात आली.

खालसा पद्धत / विलीनीकरणाचा सिद्धांत
(Doctrine of Lapse)

गव्हर्नर जनरल डलहौसीच्या काळात खालसा पद्धत चर्चेला आली. माणसाला औरस पुत्र नसेल तर विशिष्ट धार्मिक विधीनुसार एखाद्या मुलाला दत्तक घेण्याचा अधिकार भारतात शतकानुशतके पाळला जात होता.

  • दत्तक घेतल्याचे राजाला कळवावे – (वशिष्ठ संहिता – भाषांतर कोलंब्रुक डायजेस्ट) याचा अर्थ परवानगी घेणे असा नाही फक्त कळविणे.
  • सुरुवातीला कंपनीलाही दत्तकबद्दल आक्षेप नव्हता पण नंतर कंपनीच्या विस्तारवादी धोरणानुसार यात बदल करण्यात आला.
  • डलहौसीच्या मते भारतात तीन प्रकारची राज्ये होती.
    1. स्वतंत्र – जी राज्ये कर देत नव्हती आणि कधीही सर्वोच्च सत्तेच्या नियंत्रणाखाली नव्हती.
    2. अशी राज्ये – जी मुघल सम्राट किंवा पेशव्यांच्या – नियंत्रणाखाली राहून त्यांना कर देत होती – पण आता सर्वोच्च सत्ता असलेल्या इंग्रजांच्या नियंत्रणाखाली होती.
    3. अशी राज्ये – जी इंग्रजांनी निर्मित, पुनर्जीवित केली होती.

१८४८ मध्ये डलहौसी म्हणाला होता –

  • प्रथम राज्याबाबत – दत्तक प्रकरणात हस्तक्षेपाचा आम्हाला अधिकार नाही.
  • द्वितीय – दत्तकासाठी आमची परवानगी आवश्यक. आम्ही नकारही देऊ शकतो पण सर्वसाधारणपणे परवानगी देऊ.
  • तृतीय – राज्यांना वारस म्हणून दत्तक घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. डलहौसीच्या मते – राजाच्या खाजगी संपत्तीवर दत्तक पुत्राचा अधिकार राहील पण सत्तेच्या बाबतीत इंग्रजांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील राज्यांच्या बाबतीत दत्तकांना गादीवर बसण्याची परवानगी सरकार देणार नाही आणि ती राज्ये व्यपगत (Lapse) होतील.
  • * पूर्वी इंग्रजांनी थोडीफार ही पद्धत वापरली होती (उदा. लॉर्ड ऑकलंडच्या काळात) पण डलहौसीच्या काळात या नीतीने उंचांक गाठला. त्याची कारणे –
    1. इंग्रज प्रबळ झाले होते त्यामुळे भारतीय सत्ताधीशांच्या आडून शासन चालविण्याची गरज कंपनीला उरली नव्हती.
    2. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीने – वाढले उत्पादन – यासाठी बाजारपेठांची गरज.
    3. वसाहती स्थापण्यासाठी – फ्रेंच, इटली, जर्मन हे स्पर्धेत उतरले होते.

विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम –

  1. सातारा – पहिले विलिन झालेले राज्य – १८४८
  2. जैतपूर – संभलपूर, ओरछा (१८४९)
  3. बघाट – १८५०
  4. उदयपूर, – १८५२

सा जे सं ब उ

  • (५) झाशी – १८५३
  • (६) नागपूर – १८५४
  • (७) करौली – १८५५
  • (८) अवध – १८५६

तैनाती फौज धोरण
(Subsidiary Alliance System)

लॉर्ड वेलस्ली १७९८ मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याच्या सात वर्षात तैनाती फौजेच्या मार्गाने कंपनी भारतातील सर्वोच्च राजकीय सत्ता बनली.

  • अशा प्रकारची भारतातील पहिली व्यवस्था – डुप्लेने आणली होती. आवश्यकतेनुरूप तो भारतीय राजांना पैशाच्या मोबदल्यात सैनिक सहायता देत असे. ही व्यवस्था क्लाइव्ह व कॉर्नवॉलिस यांनीही स्वीकारली. पण तिला व्यापक स्वरूप वेलस्लीने दिले.

या व्यवस्थेच्या प्रमुख अटी

  1. भारतीय राजांच्या परराष्ट्र संबंधांवर कंपनीचे नियंत्रण राहील. दुसऱ्या राजाशी बोलणी, युद्ध वगैरे कंपनीच्या माध्यमातून.
  2. त्या राज्याच्या सुरक्षेसाठी कंपनी येथे मोठी फौज ठेवेल. जिचा खर्च राज्याने करावा त्यासाठी रोख पैसा किंवा उत्पन्नाचा प्रदेश द्यावा.
  3. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातात.
  4. राजधानीत रेसिडेंट ठेवणे. ईंग्लंडचा
  5. कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना दुसऱ्या युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही.
  6. राज्यांच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही.
  7. अंतर्गत व बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल.

तैनाती फौजेचे कंपनीला झालेले फायदे

  1. देशी राज्य निःशस्त्र व एकमेकांपासून विभक्त झाले.
  2. त्यांची विदेशनीती इंग्रजांकडे, त्यामुळे ते त्याविरुद्ध गट पाडू शकत नव्हते.
  3. राज्यांच्या खर्चावर पोसली जाणारी मोठी सेना – कंपनीला मिळाली. जरी ती राज्यांच्या सुरक्षेसाठी असली तरी इंग्रजांनी आपला वापर तिच्या शत्रूंना व नंतर त्याच राज्यांना नष्ट करण्यासाठी वापरली. या सेनेचा फायदा म्हणजे कंपनीची सैनिक सीमा तिच्या राजनैतिक सीमेच्या पुढे गेली.
  4. फ्रेंचांचा प्रभाव थांबला कारण परवानगीशिवाय विदेशींना नोकरीवर ठेवता येत नव्हते.
  5. रेसिडेंटच्या मदतीने अंतर्गत प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यास मदत.
  6. तैनाती फौजेच्या अधिकाऱ्यांना – भरपूर वेतन मिळू लागले.

भारतीय राज्यांची झालेली हानी –

  1. परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात – भारतीय राज्यांचे सार्वभौमत्व गेले.
  2. लष्करीदृष्ट्या दुर्बल बनली.
  • (३) इंग्रज, रेसिडेंटच्या हस्तक्षेपामुळे प्रशासन चालवणे कठीण झाले.
  • (४) ही पद्धत स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. वेतन व लष्करासमूहीचा खर्चाचा भार राज्यांना डोईजड झाला
  • या पद्धतीचा सर्वप्रथम प्रयोग १७६५ – अवधला – कंपनीने पैशाच्या बदल्यात अवधचे संरक्षण करण्याचे कबूल केले. राजधानीत रेसिडेंट ठेवण्याचे मान्य
  • १७८७ – कर्नाटक नवाब – इंग्रजाशिवाय दुसऱ्या युरोपियनांशी संबंध नको.
  • १७९८ ला वेलस्ली आल्यानंतर तैनाती फौज स्वीकारणारे राज्य –
    • हैदराबाद – १७९८
    • म्हैसूर – १७९९
    • तंजोर – १७९९
    • अवध – १८०१
    • पेशवा – १८०२
    • भोसले – १८०३
    • शिंदे – १८०४

    यांची Cronology लक्षात ठेवण्यासाठी
    है म्हैस तं अ पे भो शि

१८५७ पर्यंत ब्रिटिश राज्याची रचना

या प्रकरणाचा Syllabus मध्ये कुठेही स्वतंत्र उल्लेख जरी नसला तरीसुद्धा राज्यसेवा-2012 च्या मुख्य परीक्षेच्या पेपर पहिला व्यवस्थित पाहिला असता त्यात स्वतंत्रपणे व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल यावर थेट ६ प्रश्न आले होते व इतर संबंधित ४ प्रश्न होते असे लक्षात येते. जे ६० पैकी १० मार्क कव्हर करतात. त्यामुळे त्या सर्वांची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती यात देण्याचा प्रयत्न केला आहे. 2012 मध्ये आलेले प्रश्न

  1. कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले?

    (१) मुलकी पाटील (२) दरोगा (३) जिल्हाधिकारी (४) तलाठी

  2. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (१८७८) कोणी मंजूर केला?

    (१) रिपन (२) लिटन (३) कर्झन (४) डफरीन

  3. इस. १८० मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना केली?

    (१) मेकॉले (२) बेंटिक (३) वेलस्ली (४) डलहौसी

  4. ग.ज. विल्यम बेंटिकने कोणत्या सुधारणा केल्या?

    (अ) राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली.
    (ब) कंपनीच्या नोकरांचे पगार कमी केले.
    (क) भत्ता देणे बंद केले
    (ड) भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले.

    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

    (१) अ, ब आणि क (२) अ व ड फक्त (३) अ, ब, ड (४) वरील सर्व

  5. लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

    (१) बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले.
    (२) कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री-मेरठला नेली.
    (३) सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले.

  • (४) भारतीय लष्करावर विश्वास ठेवला.
  • (५) शासकीय कर्मचाऱ्यांवर–राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली?
    • (१) कर्झन (२) डफरीन (३) रिपन (४) ए.ओ. ह्यूम

बंगालचे गव्हर्नर

  1. रॉबर्ट क्लाईव – (१७५७-६०) प्रथम वेळी
    • प्लासीच्या युद्धात विजय (१७५७)
    • १७५९ – फ्रान्सचा पराभव
  2. हॉलिवेल – १७६०
  3. वेन्सिटार्ट – (१७६०-१७६४)
    • बक्सरचे युद्धात विजय
  4. रॉबर्ट क्लाईव (१७६५-१७६७) – द्वितीय वेळी
    • अलाहाबादचा करार – अवध नवाब व शाहआलम यांच्या सोबत
    • बंगालमध्ये दुहेरी शासन
  5. वेरेलस्ट (१७६७-६९)
  6. कार्टियर (१७६९-७२)
  7. वॉरेन हेस्टिंग्ज (१७७२-७४)

बंगालचे गव्हर्नर जनरल

  1. वॉरेन हेस्टिंग्ज (१७४-१७८५)
  2. जॉन मॅकफरसन (१७८५-८६)
  3. लॉर्ड कॉर्नवॉलिस (१७८६-९३)
  4. जॉन शोर (१७९३-९८)
  5. सर ए. क्लार्क (१७९८)
  6. रिचर्ड वेलस्ली (१७९८-१८०५)
  7. लॉर्ड कॉर्नवॉलिस (१८०५)
  8. जॉर्ज बार्लो (१८०५-१८०७)
  9. लॉर्ड मिंटो (१८०७-१८१३)
  10. लॉर्ड हेस्टिंग्ज (१८१३-१८२३)
  11. जॉन एडम्स (१८२३)
  12. लॉर्ड एमहर्स्ट (१८२३-२८)
  13. विलियम बेली (१८२८)
  14. विलियम बेंटिक (१८२८-३३)

भारताचे गव्हर्नर जनरल

  1. विलियम बेंटिक (१८३३-३५)
  2. चार्ल्स मेटकाफ (१८३५-३६)
  3. ऑकलंड (१८३६-४२)
  4. एलनबरो (१८४२-४४)
  5. विलियम वॉर्ड (१८४)
  6. लॉर्ड हार्डिंग (१८४-४८)
  7. डलहौसी (१८४८-५६)
  8. कॅनिंग (१८५६-५८)

भारताचे व्हाईसरॉय

  1. कॅनिंग (१८५८-६२)
  2. एल्गिन (१८६२-६३)
  3. नेपियर (१८६३), विलियम डेनिसन (१८६३)
  4. जॉन लॉरेन्स (१८६४-६९)
  5. एल्गिन दुसरा (१८९४-९८)
  6. कर्झन (१८९९-१९०५)
  7. मिंटो दुसरा (१९०५-१०)
  8. हार्डिंग (१९१०-१६)

🇮🇳 महाराष्ट्राचा इतिहास – महत्त्वाच्या नोट्स 🇮🇳

📚 1818 ते 1857 मधील महाराष्ट्रातील ब्रिटिशांविरुद्धचे सशस्त्र उठाव याबद्दल संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती आता एका ठिकाणी!

🔥 उमाजी नाईक यांचा उठाव
⚔️ रामोशी, कोळी आणि भिल्लांचे उठाव
🇮🇳 1857 च्या उठावातील महाराष्ट्राचे योगदान
🎯 MPSC | PSI | STI | ASO | Police Bharti | Talathi | Vanrakshak

📖 संपूर्ण नोट्स वाचा →

🌐 VisionGov Academy | स्पर्धा परीक्षा तयारी

Post a Comment

Previous Post Next Post