12. प्राण्यांचे वर्गीकरण - Classification of Animals
प्रस्तावना
आपण 10 व्या प्रकरणात पंचसृष्टीचे वर्गीकरण पाहिले आहे, आता या प्रकरणात आपण 'सृष्टी प्राणी' अभ्यासणार आहोत. पूर्वीच्या वर्गीकरणात फक्त दोन सृष्टी होत्या (वनस्पती आणि प्राणी), परंतु प्रोटोजोआ, कवके, जीवाणू यांपैकी काहींची वनस्पती तर काहींना प्राण्यांमध्ये वर्गिल्या गेले होते. त्यापैकी प्रोटीस्टा सृष्टीतील सर्व प्रोटोजोआ हे प्राणी सृष्टीमध्ये समाविष्ट होते. परंतु आर. एच. व्हीटाकर यांच्या पंचसृष्टींनुसार प्राणीसृष्टी ही आता ठराविक (Specific) झाली आहे.
12.1 प्राण्यांचे वर्गीकरण (सृष्टी-प्राणी)
A) प्राण्यांचे वर्गीकरण
नुक्त्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रजाती असाव्यात. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला 'कृत्रिम पद्धत' म्हणतात. त्यांच्याव्यतिरिक्त थेओफ्रेस्टस, प्लीनि, जॉन रे, लिनियस यांनीसुद्धा कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. डोब्झस्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीनुसार वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वुज यांनीसुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले.
B) असमपृष्ठरज्जु व समपृष्ठरज्जु प्राणी (Non-Chordates & Chordates)
| असमपृष्ठरज्जु | समपृष्ठरज्जु |
|---|---|
| 1. पृष्ठरज्जु (Notochord) नसतो | 1. पृष्ठरज्जु (Notochord) असतो. |
| 2. प्रसनिमध्ये कल्ल्याविदरे नसतात | 2. श्वसनासाठी कल्ले किंवा फुफ्फुसे |
| 3. चेतारज्जु असेल तर तो जोडीने समोरच्या बाजूस असतो. | 3. चेतारज्जु एकच, पोकळ, मागच्या बाजूस भरीव असतो. |
| 4. हृदय असेल तर मागच्या बाजूस | 4. हृदय समोरच्या बाजूस असते. |
C) शरीर संघटनाचे प्रकार
- पेशीस्तर (Cellular Grade Organization) - उदा.: पोरीफेरा संघ
- पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-Tissue) - उदा.: निडारिया संघ
- ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue-Organ) - उदा.: चपटे कृमी (प्लॅटीहेल्मिन्थस)
- अवयव संस्था स्तर संघटन (Organ-System) - उदा.: मानव, बेडूक, खेकडा
D) काही संघ आणि वैशिष्ट्ये
- पोरीफेरा: कॉलर पेशी असतात, या पेशी पाण्याला प्रवाहीत करतात. प्राणी 'स्थानबद्ध प्राणी' आहेत.
- निडारिया/ सिलेंटेरेटा: शुंडके (Tentacles) असतात. दंशपेशी (Cnidoblast) भक्षाच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात.
- चपटेकृमी: उभयलिंगी प्राणी असतात. गोलकृमी: एकलिंगी असतात.
- आर्थोपोडा: जीवन-संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ म्हणून ओळखला जातो. हे प्राणी एकलिंगी असतात.
- ऑक्टोपस: पोहणे, सरपटणे, चालणे या तिन्ही प्रकारे हालचाल करतात.
- ईकायनोडर्माटा: फक्त समुद्रात आढळतात. यांच्या प्रौढावस्थेत पंच-अरीय तर अळी अवस्थेत द्विपार्श्व सममिती असते.
प्राण्यांचे वर्गीकरण - इतर महत्वाचे मुद्दे
हेमीकॉर्डाटा संघातील प्राण्याला 'अकोर्नकृमी' म्हणतात.
हे प्राणी एकलिंगी तसेच उभयलिंगी असू शकतात.
प्राणी सृष्टीमध्ये एकूण 35 संघ येतात, त्यापैकी 11 संघ हे प्रमुख व मोठे मानण्यात येतात. हे वर्गीकरण खालील मुद्द्यांवर अवलंबून असतात.
I. शरीर रचना
- शरीर आवरण हे बहुतांश दुहेरी किंवा तिहेरी असते.
- दुहेरी आवरण असणारे प्राणी : पोरीफेरा व सिलेंटेराटा संघ.
- तिहेरी आवरण असणारे प्राणी हे उर्वरीत 9 संघातील आहेत.
II. शरीर सममिती (Body Symmetry)
सममिती म्हणजे शरीराचे रचनात्मक विभाजन होय. जसे की मानवाचे शरीर दोन समान भागात विभागता येते; म्हणून त्याला 'द्विपार्श्व सममित' (Bilateral Symmetrical) असे म्हणतात.
इतर प्रकार :
- असममित (Asymmetrical) : ज्यांना विशिष्ट आकार नसतो असे प्राणी. उदा. पावला
- अरीय सममित (Radial Symmetrical) : जरी यांना कोणत्याही भागातून कापले तरी दोन्ही सारख्याच भागांमध्ये विभाजन होते. उदा. हायड्रा, तारामासा.
- द्विपार्श्व सममित, उदा. बेडूक, उंदीर, माणूस.
- गोलीय सममित (Spherical Symmetry), उदा. सी-आर्चिन
III. पृष्ठरज्जु असणे वा नसणे
- असणारे : समपृष्ठरज्जु प्राणी (Vertebrates)
- नसणारे : असमपृष्ठरज्जु प्राणी (Invertebrates)
IV. देहगुहा (Body Cavity/Coelom) असणे वा नसणे
- देहगुहा नसणारे (Acoelomic) : पोरीफेरा, सिलेंटेराटा, प्लॅटोहील्मिन्थीस.
- सुडोसिलोम (Pseudocoelom) : संपूर्णपणे देहगुहा नसणे, म्हणून याला भ्रमीत देहगुहा असे म्हणतात. उदा. निमेटोडस.
- युसिलोमेट्स (Eucoelomates) : उर्वरीत सर्व '7' संघ.
V. मुख आणि गुदद्वार निर्मिती
- जर मुख प्रथम विकसित होऊन त्यानंतर गुदद्वार विकसित होत असेल तर त्यास प्रोटोस्टोम्स (Protostomes) असे म्हणतात. उदा.: अनेलिडा, आर्थोपोडा, मोलुस्कस.
- जर गुदद्वार प्रथम विकसित होऊन त्यानंतर मुख विकसित होत असेल तर त्यास ड्युटेरोस्टोम्स (Deuterostomes) असे म्हणतात. उदा.: कॉर्डेटा व इकायनोडर्मस.
VI. प्रचलनाचे अवयव (Organ of Locomotion)
- हालचालीसाठी कोणते अवयव वापरतात. काही जण सरपटतात तर काहीजण पोहतात.
- ज्याप्रमाणे वरील बाबी लक्षात घेऊन प्राणी सृष्टीची एक उपसृष्टी पडते त्यास 'प्रोटाजुआ' असे म्हणतात.
Tags: प्राण्यांचे वर्गीकरण, Body Symmetry, Body Cavity, Protostomes, Deuterostomes, Science, Biology, SSC, MPSC
उपसृष्टी मेटाजुआचे 10 संघ व वर्गीकरण
या सर्व लक्षणांच्या आधारे उपसृष्टी मेटाजुआचे वर्गीकरण पुढील दहा संघात केले जाते :
| अ.क्र. | संघ (Phylum) | प्राणी उदाहरणे |
|---|---|---|
| 1. | पोरीफेरा | सायकोन, स्याजिला |
| 2. | सिलेंटेराटा | हायड्रा, सी-अनिमोन, फायझोलिया |
| 3. | प्लॅटिहेल्मिन्थीस | टेपवर्म, प्लेनेरिया, लिव्हरफ्लुक |
| 4. | निमॅटहेल्मिन्थीस | अॅस्कॅरिस, वुचेरेरिया |
| 5. | अॅनेलिडा | गांडूळ, लीच, नेरीस |
| 6. | आर्थोपोडा | मधमाशी, माशी यासारखे कीटक, कोलंबी, विंचू |
| 7. | मोलुस्का | शंख, शिंपला, अष्टपाद, गोगलगाय |
| 8. | इकायनोडर्माटा | तारामासा, सी-अर्चिन |
| 9. | हेमीकॉर्डाटा | बॅलेनोग्लॉसस |
| 10. | कॉर्डाटा | सायक्लोस्टोमाटा, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व सस्तन प्राणी |
1) संघ पोरीफेरा
- या प्राण्याच्या शरीरावर छिद्रे असतात. सर्वप्रकारचे स्पंज या संघात येतात.
- हे असमित, प्रचलन न करणारे, तसेच घट्ट भागाला चिकटून राहणारे खाऱ्या पाण्यातील प्राणी आहेत.
- यांच्या शरीरावरील छिद्रांना ऑस्टिया म्हणतात. वरच्या भागातील मोठ्या छिद्राला ऑस्क्यूलम म्हणतात.
- शरीरावर शुकिकांचे (Spicules) आवरण असते. हे आवरण कॅल्शियम कार्बोनेट (CaCO3) ने बनले असते.
- ऑस्टियम हे मुखासारखे काम करतात तर ऑस्क्यूलम हे गुदद्वारासारखे काम करतात.
- यातील बहुतांश खाऱ्या पाण्यात आढळतात पण काही गोड्या पाण्यात आढळतात.
- पोरीफेरा ही संज्ञा 'ग्रॅन्ट' यांनी दिली, तर हे प्राणी आहेत हे 'एलिज' यांनी सांगितले.
- हे संजीव अमोनिया हा पदार्थ उत्सर्जित करतात. यांच्यामध्ये रक्ताभिसरण, चेतासंस्था नसते.
- यांच्यात पुनर्जन क्षमता (Regeneration) असते.
Tags: पोरीफेरा, 10 संघ, मेटाजुआ, प्राणी वर्गीकरण, Phylum, Science, Biology, SSC, MPSC
संघ पोरीफेरा - वर्गीकरण
पोरीफेराचे वर्गीकरण 3 वर्गात
| वर्ग कॅल्केरी | वर्ग हेक्साक्टिनेलिडा | वर्ग डेमोस्पॉन्जिया |
|---|---|---|
| सर्व खाऱ्या पाण्यात राहतात उदा.: सायकोन/स्किफा, ग्रँटिया, ल्युकोसोलिनिया, क्लॅथिना |
यांनाच 'काचा स्पंजेस' असे म्हणतात. सर्व खाऱ्या पाण्यात आढळतात. उदा.: युप्लेक्टेला (व्हेनस फ्लॉवर बास्केट), हायॅलोनेमा (Glass Rope Sponge) |
खारे तसेच गोड्या पाण्यात राहतात उदा.: क्लियोनिया (Boring Sponge), क्लिओना (Dead man's figure), युस्पॉन्जिया (Bath sponge), स्पॉन्जिला (गोड्या पाण्यातील) |
2) संघ सिलेंटेराटा / निडारिया (Cnidaria)
- बाह्यत्वचा जास्त विभेदन असते. पाण्यात राहणारे आणि जास्तीत जास्त समुद्रात आढळणारे प्राणी.
- अरीय सममित (Radial Symmetry) असणारे व द्विस्तरी प्राणी.
- शरीराला एकच मुख व त्याभोवती शुंडके (Tentacles) असतात.
- यांचे प्रजनन मुकुलायन (Budding) या अलैंगिक पद्धतीने होते.
- वसाहतीने राहणारे : कोरल्स, सीअनिमोन
एकएकटे राहणारे : हायड्रा, जेलीफिश. - सिलेंटेराटा हे जुने नाव असून याला सध्या निडारिया (Cnidaria) असे म्हणतात.
- सिलेंटेराटा हे नाव 'ल्यूकार्ट' यांनी दिले.
- यांच्यामध्ये प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असतात.
- यांची प्रमुख 2 प्रकारची शरीर रचना असते :
1) पॉलिप (दंडगोल) 2) मेड्युसा (छत्रीसारखे) - सिलेंटेराटाचे वर्गीकरण '4 वर्गात' केले आहे.
सिलेंटेराटाचे वर्गीकरण
| हायड्रोझोआ | स्कायफोझोआ | क्युबोझोआ | अॅन्थोझोआ |
|---|---|---|---|
| गोडे पाणी किंवा खारे पाणी उदा.: हायड्रा (गोडे पाणी), ओबेलिया (Portuguese man of war) |
फक्त खारे पाणी सर्व मेड्युझा प्रकारातील उदा.: ऑरेलिया (Jelly fish) |
फक्त खारे पाणी क्यूबच्या आकाराचे उदा.: कायरियोनेक्स (Sea Wasp) - यामध्ये विषारी पेशी असतात. |
सगळ्यात मोठा वर्ग सर्वच खारे पाणी हे फक्त पॉलिप प्रकारात येतात. उदा.: कोरल्स, सी-अनिमोन (Adamsia), सी-फॅन (Gorgonia), ब्रेन कोरल (Meandrina), सी-पेन (Pinnatula) |
महत्वाची माहिती:
ग्रेट बॅरियर रिफ (क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया) - ही जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट आहे.
Tags: पोरीफेरा, सिलेंटेराटा, निडारिया, हायड्रोझोआ, स्कायफोझोआ, अॅन्थोझोआ, Science, Biology, SSC, MPSC
3. संघ प्लॅटिहेल्मिन्थीस - 4. संघ अॅस्किहेल्मिन्थीस
3. संघ प्लॅटिहेल्मिन्थीस
- यांचे शरीर रिबीनप्रमाणे चपटे, त्रिस्तरी (Three Layer) आणि द्विपार्श्व सममित असते.
- पोशिंद्याला (Host) चिकटून राहण्यासाठी अधरचूषक (Hooks) आणि अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचूषक (Suckers) असतात. बहुतेक प्राणी अंत:परजीवी (Parasitic) तर काही स्वतंत्र राहतात.
- यांच्यात रक्ताभिसरणसंस्था नसते तर मेंदू असतो. यांचे 3 वर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे.
प्लॅटिहेल्मिन्थीसचे 3 वर्ग
| टर्बेलॅरिया | ट्रिमॅटोडा | सियास्टोडा |
|---|---|---|
|
चपटे कृमी, वलययुक्त नसले पाणी व जमीन दोन्हीवर आढळणारे अलैंगिक प्रजनन असते उदा.: प्लेनेरिया (Dugesia), बायप्लॅनिडम |
यांना 'फ्ल्यूक्स' म्हणतात. शरीर वलययुक्त असते. चुषके असतात. अलैंगिक प्रजनन व पुनर्जन नसते. उदा.: ब्लड फ्ल्यूक (Schistosoma), लिव्हर फ्ल्यूक (Fasciola hepatica) |
यांना टेपवर्म म्हणतात. शरीरावर वलय, चुषक असतात. अलैंगिक प्रजनन व पुनर्जन नसते. मुख व आतडे नसतात. उदा.: पॉर्क टेप वर्म (टिनिया सोलियम), डॉग टेप वर्म - बीफ टेप वर्म |
4. संघ अॅस्किहेल्मिन्थीस
- शरीर त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित, लांबट व दंडाकृती असते.
- बहुसंख्य प्राणी अंत:परजीवी असून, एकलिंगी असतात. (Unisexual)
- शरीरात आभासी देहगुहा असते त्यांना सुडोसिलोम असे म्हणतात.
* सुडो = False, सिलोम = Cavity - मुखापासून ते गुदद्वारापर्यंत जाणारी पचन नलिका असते. यापैकी बहुसंख्य प्राणी माणसांमध्ये रोग निर्माण करतात.
- अॅस्किहेल्मिन्थीस या गटात निमॅटोडा, रोटीफेरा, अकॅन्थोसिफला, ग्रॅस्टोट्रायका आणि निमॅटोफोरा यांचा समावेश होतो.
- यांनाच 'राऊंड वर्म्स' किंवा खरे वर्म्स म्हणून ओळखले जाते.
- यांच्यात पेशींची संख्या जन्मापासून मेरेपर्यंत सारखीच असते यालाच युटेली (Eutely) असे म्हणतात
- इतर उदाहरणे:
- अॅकायलोस्टोमा डिओडेनॅली (Hook worm)
- अॅन्ट्रोबायोस व्हर्मिक्युलॅरीस Pin worm किंवा Seat worms
- वूचेरीया बॅन्क्रॉफ्टी (Filaria worm), ड्रॅक्युनकुलम मेडिनेन्सीस (Guinea worms किंवा Serpent worms)
- लोवा-लोवा (Eye worm), ट्रायकिनेला स्पायरॅलीस (Muscle worms)
- ट्रायसियस ट्रिच्युरा (Whip worm)
Tags: प्लॅटिहेल्मिन्थीस, अॅस्किहेल्मिन्थीस, टर्बेलॅरिया, ट्रिमॅटोडा, सियास्टोडा, निमॅटोडा, Science, Biology, SSC, MPSC
परजीवी कृमी आणि आजार + 5. संघ अॅनेलिडा + 6. संघ आर्थोपोडा
परजीवी कृमी, अवयव आणि आजार
| परजीवी प्राणी | अवयव | आजार |
|---|---|---|
| 1. अॅस्कॅरीस (गोल कृमी) | पोट / आतडे | अॅस्कॅरिअॅसिस |
| 2. पिनवर्म | पोट / आतडे | उलट्या |
| 3. फायलरीया* | त्वचा | हत्तीपाय |
| 4. हुक वर्म | पोट | पोटदुखी, गुदद्वाराला खाज |
5. संघ अॅनेलिडा - वलयांकित कृमी (Segmented Worms)
- हे प्राणी त्रिस्तरी, लांबट, दंडाकृती, खंडीयुक्त, द्विपार्श्वसममित आहेत.
- यांच्या शरीरात देहगुहा व साध्या इंद्रियसंस्था असतात. यांना प्रचलनासाठी टूझेटोम (Setae) असतात.
- लैंगिक प्रजनन करतात पण सहसा उभयलिंगी (Hormaphrodite) असतात, म्हणजे एकाच सजीवात स्त्री व पुरुष हे दोन्ही लिंग असणे. या संघापैकी काही प्राणी परजीवी आहेत. (लीच हा बाह्यपरजीवी आहे)
- हे प्राणी खाऱ्या पाण्यात, गोड्या पाण्यात तसेच उपयचर असू शकतात.
- अॅनेलिडा ही संज्ञा 'लॅमार्क' ने दिली. 'शरीरावरील वलय हे ठराविक असून ते वाढत वा कमी होत नाहीत.'
- श्वसनासाठी श्वसनिका (Bronchi) वापर तर उत्सर्जनासाठी नेफ्रीडीयाचा वापर केला जातो.
- रक्ताभिसरण संस्था असते पण RBC नसतात. हिमोग्लोबीन असते.
- CNS, PNS व ANS अशी चेतासंस्था विभागली आहे.
- यांचे 3 वर्गात वर्गीकरण केले आहे.
अॅनेलिडाचे 3 वर्ग
| पॉलीकायटा | ऑलिगोकायटा (उभयलिंगी) | हिरूडिनिया (उभयलिंगी) |
|---|---|---|
|
सर्व खाऱ्या पाण्यातील हालचालीसाठी पॅरापोडिया मांसभक्षी, बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था उदा.: नितावयस/नेरीस, कियाटोप्टेरेस, अफ्रोडाइट, अरिनिकोला, सॅबेला |
भूचर, डोळे नसतात. उदा.: फेरेटीमा (Earthworm), लुम्ब्रिक्स, मेगाकोलेक्स, ट्यूबीफेक्स (Blood worm) ट्यूबीफेक्स हे चिखलात वाढतात, म्हणून जलप्रदूषणाचे निदेशक. |
हिरूडीन हे यांच्या लाळेत असते जे रक्त गोठू देत नाही. बहुतकरून खाऱ्या पाण्यातील रक्त पिणारे व यांच्यात खुली रक्ताभिसरण संस्था डोळ्यांच्या 5 जोड्या उदा.: हिरूडिनिया (Leech) - शरीरावर 33 वलय |
6. संघ आर्थोपोडा
Arthos = संधियुक्त, Podas = पाद/पाय i.e. : Animal with Jointed Legs
- सार्वत्रिक आढळणारे, त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित व प्रचलनासाठी यांना संधियुक्त पाय असतात.
- प्राण्यामधील हा सर्वात मोठा संघ आहे. (सर्व प्राण्यांच्या जवळपास 80%)
- यांचे शरीर खंडीयुक्त (Segmented) असते. शरीराचे डोके, वक्ष, उदर असे तीन भाग असतात.
- यांचे बाह्यकंकाल (External Skeleton) कायतिन या शर्करेने बनलेले असते.
- हे एकलिंगी असतात, लैंगिक प्रजनन करतात. आर्थोपोडा हे नाव व्हॉन सायबोल्ड यांनी दिले.
- हे प्राणी जलचर, भूचर व हवेत उडणारे (हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय) आहेत.
- श्वसन अंगे - कल्ले, फुफ्फुसे, श्वसन नळ्या. उत्सर्जन अंगे - ग्रीन ग्रंथी, कॉक्सल ग्रंथी, माल्पिगीयन नलिका.
Tags: अॅनेलिडा, आर्थोपोडा, पॉलीकायटा, ऑलिगोकायटा, हिरूडिनिया, परजीवी, Science, Biology, SSC, MPSC
संघ आर्थोपोडा - उपसंघ व वर्गीकरण
- यांना साधे किंवा संयुक्त नेत्र (Simple or Compound eye) असतात.
- आर्थोपोडाचे खालील 4 उपसंघ (sub-phylum) पडतात:
- ऑनिकोफोरा
- ट्रिलोबीटा
- केलीकेराटा
- मॅन्डिब्युलाटा
आर्थोपोडाचे उदाहरणे
कीटक वर्गातील उदाहरणे: earwig (Dermaptera), stonefly (Plecoptera), tree cricket (Orthoptera), dragonfly (Odonata), ant (Hymenoptera), sucking louse (Anoplura), thysanuran (Thysanura), mosquito (Diptera), cat flea (Siphonaptera), thrips (Thysanoptera), scarab beetle (Coleoptera), stinkbug (Heteroptera), cabbage butterfly (Lepidoptera), female scale (Homoptera)
आर्थोपोडाचे 4 उपसंघ
i) ऑनिकोफोरा (ऑनिको-पंजे; फोरा असणारे)
उदा.: पेरीपॅटस (Walking worms) - याला अॅनेलिडा व आर्थोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणतात.
ii) ट्रिलोबीटा (ट्रि-तीन; बीटा-लोब)
- यामध्ये मोठ्या आकाराचे आर्थोपोडा होते, सध्या ते लुप्त (extinct) झाले आहेत. (पृथ्वीवरून नाश)
iii) केलीकेराटा
याचे दोन वर्गात (class) वर्गीकरण केले आहे.
- अ) वर्ग मेरोस्टोमॅटा: उदा. लिम्यूलस (King crab/ Horse shoe crab) - सजीव जिवाश्म असून याला संयुक्त डोळे असतात.
- ब) वर्ग अॅरॅक्निडा: चालण्यासाठी पायांच्या 4 जोड्या असतात.
- अँटेना नसतो व साधे डोळे असतात (simple eyes)
- उत्सर्जनासाठी कॉक्सल ग्रंथी तर श्वसनासाठी 'बुक लंग' असतात.
Interesting facts about Scorpion
- It has abdominal sting with neurotoxic poison.
- Sexual dimorphism is indistinct.
- Mating is after courtship dance. In post mating female devours the male.
- It is Viviparous animal and Produces Dozen of young ones.
Tags: आर्थोपोडा, ऑनिकोफोरा, ट्रिलोबीटा, केलीकेराटा, मॅन्डिब्युलाटा, अॅरॅक्निडा, Scorpion, Science, Biology, SSC, MPSC
संघ आर्थोपोडा - उपसंघ मॅन्डिब्युलाटा + 7. संघ मोलुस्का
कोळी: उदरातील ग्रंथीद्वारे (Abdominal gland) स्रावलेल्या पदार्थापासून जाळे तयार करतात.
टिक्स आणि माईट्स: सस्तन प्राण्यात रोग निर्माण करतात.
iv) उपसंघ - मॅन्डिब्युलाटा
यांच्यामध्ये मॅन्डिबल (हनुवटी सारखे) हाड असते. यांचे 4 वर्गात वर्गीकरण केले आहे:
अ) वर्ग क्रस्टिशियन्सी (क्रस्टी = कठीण कवच)
- पाण्यात राहणारे, गील्स द्वारे श्वसन करणारे, पायांच्या 5 जोड्या असणारे तसेच अँटीनाच्या 2 जोड्या आणि संयुक्त नेत्र (compound eye) असणारे सजीव.
- उदा.: पॅलिमोन (झिंगे), अॅस्टॅकस (cray fish), कॅन्सर (खेकडा), डॅफ्निया (water flea)
ब) वर्ग किलोपोडा
- यांनाच 'सेंटीपेड्स' म्हणतात. शरीर डोके आणि उदर यात विभागले असते. प्रतीवलय पायाची 1 जोड, साधे डोळे, मांसभक्षी व विषारी आर्थोपोडा म्हणून ओळखले जातात.
- उदा.: स्कोलोपेन्ड्रा
क) वर्ग डिप्लोपोडा
- यांनाच 'मिलीपेड्स' असे म्हणतात. प्रतीवलय पायाच्या दोन जोड्या, शरीराचे डोके, वक्ष, उदर यात विभाजन झालेले, डोळे नसले, शाक भक्षी, विषारी नसलेला आर्थोपोडा.
- उदा.: जलम
ड) वर्ग इन्सेक्टा (6 पाय)
- यांचे शरीर डोके, वक्ष व उदर असे विभागले असून, अँटीन्याची एक जोडी, संयुक्त डोळा, पायांच्या 3 जोड्या, रक्तातील रंगद्रव्य नसतात. उत्सर्जनासाठी माल्पिगीयन नलिका तर श्वसनासाठी श्वसनलिका असते.
- उदा.: फुलपाखरू, घरमाशी, मधमाशी, उवा, डास, नाकतोडा, टेकूण, गांधीमाशी, झुरळ, वाळवी, पतंग, सिकाडा किडा इत्यादी.
Interesting fact about Cicada Insect
- Male cicada produce louder and shrill sound audible from kilometers away.
- Its embryonic development takes upto 17 years in completion and hence it is commonly called 'seventeen-years-Locust'.
- A valley in Kerala is known as silent valley because of absence of this insect.
जगात सर्वात जास्त संख्या किटकांची आहे. त्यामुळे वर्गीकरणात सर्वात कठीण वर्गीकरण हे किटकांचे असते. इन्सेक्टा हा एक वर्ग असून या वर्गाचे आणखी जवळपास 31 गणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
इन्सेक्टाचे काही महत्वाचे गण
| गण | किटक | गण | किटक |
|---|---|---|---|
| ब्लाटोडी | झुरळ | हॅमेनोप्टेरा | मुंगी, मध माशी |
| कोलिओप्टेरा | भिर, भुंगा (Beetle) | लेपीडोप्टेरा | फुलपाखरू, पतंग |
| कोलेम्बोला | स्प्रींगटेल | थॅन्सेनोप्टेरा | सिल्व्हर फिश |
| डर्मप्टेरा | इअरविग | एम्बीओटेरा | वेबस्पीनर |
| डीप्टेरा | माशी | हेमीप्टेरा | हॉपर, सिकाडा, टेकूण, मावा |
7. संघ मोलुस्का
- जास्तीत जास्त प्राणी हे जलचर असून शरीर अखंडित मृदू कवचाने आच्छादलेले असते.
- हे प्राणी त्रिस्तरी व द्विपार्श्व सममिती असतात. परंतु पावला हा प्राणी असममित आहे.
- याच्या शरीराचे तीन भाग पडतात:
- अग्र भाग : डोके यात ज्ञानेंद्रिय असतात
- पृष्ठ भाग : पचनसंस्थेचा भाग
- पश्चभाग : प्रचलनासाठी स्नायुमय पाय
Tags: मॅन्डिब्युलाटा, क्रस्टिशियन्सी, किलोपोडा, डिप्लोपोडा, इन्सेक्टा, मोलुस्का, Cicada, Science, Biology, SSC, MPSC
7. संघ मोलुस्का - वर्गीकरण
- मोलुस्का ही संज्ञा 'जॉन्स्टोन' यांनी दिली. मोलुस्कसच्या अभ्यासाला 'मॅलॅकॉलॉजी' असे म्हणतात तर यांच्या कवचाच्या (shell) अभ्यासाला 'कॉनकोलॉजी' असे म्हणतात.
- प्राणीसृष्टीतील हा दुसरा सर्वात मोठा संघ असून, हे प्राणी जलचर व भूचर असतात.
- शरीर हे बलययुक्त नसते व ते डोके, अंतरींद्रिय व पाय असे विभागले जाते तर बाह्यआवरण (shell) हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असते.
- श्वसनासाठी कल्ले किंवा 'टेनिडिया' व उत्सर्जनासाठी 'मेटानिफ्रीडिया/मोजेनस अवयव' असतात.
- यांचे वर्गीकरण 6 वर्गात करण्यात आले आहे.
मोलुस्काचे 4 महत्वाचे वर्ग
अ) वर्ग - मोनोप्लेकोफोरा
- एकेरी बाह्यआवरण, खाऱ्या पाण्यात राहणारे, शरीरावर वलय असणारे (अपवाद) डोळे आणि तंतूके नसणारे.
- उदा.: निओपीलिना गॅलिथी - याला अॅनेलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा असून महत्वाचा जिवंत जिवाश्म सुद्धा आहे.
ब) वर्ग - ऑप्लॅक्युटा/पॉलिप्लेकोफोरा
- चेतापुंजाच्या 2 जोड्या चेतासंस्थेला शिडी सारखा आकार देतात, खाऱ्या पाण्यात राहणारे, जास्त बाह्य आवरणे असणारे.
- उदा.: कायतन - with 8 exoskeletal plates.
क) वर्ग - गॅस्ट्रोपोडा (Gastro - पोटाला; Poda - जोडले पाय)
- डोळे, तंतूके व डोके असते, तसेच एकेरी शेल (shell) गुंडाळलेली असल्यामुळे शरीर असममित दिसते.
- उदा.: पावला (Apple snail) - गोड्या पाण्यातील,
- हेलिक्स (Garden snail), अॅप्लिसिया (Sea Hare) → shell absent
- लायमॅक्स (Slug) → shell absent, डोरीस (Sea Lemon)
ड) वर्ग - पेलेसापोडा/बायव्हॅल्व्हीया
- दुहेरी शेल (shell), गोडे किंवा खारे पाणी.
- उदा.: युनिओ, मायटिलस, टेरीडो (Ship Worm), ऑइस्टर (Pinctada vulgaris), Solen (Razor shell)
महत्वाची माहिती: Pearl is secreted by shell glands present in Mantle (covering). The Pearl industry is oldest industry of Japan.
उदाहरणे: शंख, शिंपले (Oyster & Pearl), ऑक्टोपस (Octopus), स्क्विड (Squid), गोगलगाय (Snail)
Tags: मोलुस्का, मोनोप्लेकोफोरा, पॉलिप्लेकोफोरा, गॅस्ट्रोपोडा, पेलेसापोडा, Mollusca, Science, Biology, SSC, MPSC
संघ मोलुस्का - वर्ग ई) व फ) + 8. संघ इकायनोडर्माटा + 9. संघ हेमिकॉर्डाटा + 10. संघ टेनोफोरा + 11. संघ कॉर्डाटा
ई) वर्ग - स्कॅफोपोडा
- हत्तीच्या आकाराचे पाय, सर्वच खाऱ्या पाण्यात राहतात.
- उदा.: डेन्टॅलियम (Elephant Tusk shell).
फ) वर्ग - सिफॅलोपोडा (Foot onto Head)
- बाकीच्या पृष्ठवंशीय सजीवांसारखे डोळे असतात.
- shell ही अंतर्गत असते किंवा नसतेच.
- उदा.: ऑक्टोपस (Devil fish) → shell absent. सेपीया (Cuttle Fish) = दहा पाय असून अंतर्गत शेल असते. लॉलिगो (Squid) → सर्वात मोठा व सर्वात बुद्धिवान अपृष्ठवंशीय प्राणी. i.e. Colossal Squid.
- भक्षकापासून बचावण्यासाठी ऑक्टोपस, सेपीया व लॉलिगो ही काळीनीळी शाई स्रावतात.
8. संघ इकायनोडर्माटा
Echinos = काटे, Derma = त्वचा
- नावात दर्शविल्याप्रमाणेच हे प्राणी काटेरी कवचाचे, कॅल्शियम कार्बोनेटचे कडक कवच असते.
- सागरी प्राणी, त्रिस्तरी, एकलिंगी, अरीय सममित अखंडित शरीर.
- विकसित देहगुहा असते व हे प्राणी यांचे अन्न विशेष अशा जलाभिसरण व्यवस्थेतून मिळवतात.
- हालचालीसाठी (प्रचलनासाठी) नलिकापाद (Tube Feet) असतात. यांच्यात पुनरुद्भवन (Regeneration) क्षमता असते. यांच्यात उत्सर्जन संस्था नसते व हे अमीबा सारखे उत्सर्जन करतात.
- यांचे 5 वर्गात वर्गीकरण केले आहे.
इकायनोडर्माटाचे 5 वर्ग
- अ) वर्ग - अॅस्टेरोडी: शरीराबाहेर अन्नाचे पचन करतात. उदा.: सी-स्टार किंवा स्टार फिश.
- ब) वर्ग - ऑफियुरोडी: मुख समोरच्या बाजूस असते तर गुदद्वार नसते. उदा.: ब्रिटलस्टार
- क) वर्ग - इकायनोडी: मेजाज्झुद्वारे हालचाल. उदा.: सी-अर्चिन, सॅन्ड डॉलर
- ड) वर्ग - होलोथुरोडी: बाहू नसतात पण तंतूके असतात. उदा.: सी-कुकुम्बर.
- इ) वर्ग - क्रिनॉइडी: मुख मागे असते व 5 बाहू असतात. उदा.: सी-ली (Feather star)
9. संघ हेमिकॉर्डाटा
- बिळे करून राहणारा समुद्रातील प्राणी. यांच्या फक्त भ्रूणावस्थेत पृष्ठरज्जू (Nerve cord) अस्तित्व असते.
- शरीर मृदू, अखंडित, त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित प्राणी, यांना पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांतील दुवा म्हणतात.
- यांचे शरीर सोंड, गळपट्टी व प्रकांड (Trunk) असे विभागलेले आहे.
- श्वसनासाठी कल्लाविद्रे (Gill Slits) असतात. हे लैंगिक प्रजनन करतात.
- उदा.: बॅलेनोग्लॉसस (याला सोंडेच्या भागात पृष्ठरज्जू असतो), सॅकॉग्लॉसस
10. संघ टेनोफोरा
- हा लहान संघ असून यात 100 पेक्षा कमी जाती येतात.
- टेनोफेरा हे रंगीबिरंगी असून जेलीफिश सारखे पारदर्शक प्राणी आहेत.
- यांना सी-वॉलनट्स, सी-गुजबेरी असेही म्हणतात. (समुद्री आक्रोड)
- हे खाऱ्या पाण्यात आढळणारे अरीय सममित प्राणी होय, दुहेरी आवरण असते, मेंदू नसतो.
- उदा.: प्लुरोब्रॅकिया - यांनाच कॉम्ब जेली असेही म्हणतात.
11. संघ कॉर्डाटा
- सर्व प्राण्यांना पृष्ठरज्जू (Notocord) असतो. ज्याचे रूपांतर कवटी व पाठीच्या कण्यात होते. (अंतःकंकाल-Internal Skeleton)
- पृष्ठ (मागची) बाजूस चेतारज्जू (Nerve Cord) असतो. ज्याचे रूपांतर चेतासंस्थेत होते.
- श्वसनासाठी कल्लाविद्रे (Gill Slits) किंवा फुफ्फुसे असतात. एन्डोस्टाइल (कंठग्रंथी) असते.
- शरीर, डोके, मान, धड व शेपूट अशा भागात विभागले आहे.
उदाहरणे: Star Fish, Sea Cucumber, Sea Urchin, बॅलेनोग्लॉसस (Balanoglossus)
Tags: स्कॅफोपोडा, सिफॅलोपोडा, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा, टेनोफोरा, कॉर्डाटा, Science, Biology, SSC, MPSC
11. संघ कॉर्डाटा - उपसंघ व वर्गीकरण
- सामान्यपणे बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. हृदय शरीराच्या अधर बाजूस (Ventral Side) असते.
- संघ कॉर्डाटा हा तीन उपसंघात विभागला जातो:
- सिफॅलोकॉर्डाटा
- युरोकॉर्डाटा
- व्हर्टिब्राटा
i) उपसंघ - सिफॅलोकॉर्डाटा
- चेतारज्जू हा टोकापर्यंत असतो, सगळे खाऱ्या पाण्यात राहतात. यांचा आकार जास्तीत जास्त 5 सेमी असून हे पृष्ठवंशरहित टोकदार प्राणी होत. उदा.: अॅम्फिऑक्सस (Lancelets) किंवा ब्रॅकीओस्टोमा
ii) उपसंघ - युरोकॉर्डाटा/ट्युनिकाटा
- सर्व शरीरावर आवरण ट्युनिसीनने बनले असते. (ट्युनिसीन म्हणजे सेल्नुलोज सारखा पदार्थ नोटोकॉर्ड) चेतारज्जू लार्वाच्या टप्प्यात असतो पण नंतरचा स्टेजमध्ये लोप पावतो.
- सुप्त प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते, सगळे खाऱ्या पाण्यात आढळतात.
- उदा.: हॅर्डमनिया (sea squirts), साल्पा, डोलिओलम, ऑयकाप्लूरा.
iii) उपसंघ - व्हर्टिब्राटा/क्रॅनिएटा
- सर्वांजवळ क्रॅनियम (कवटी) नावाचे मेंदूचे कवच असते. हृदय समोरच्या बाजूस (ventral) असते, यकृतसंस्था असते,
- ह्यास - व्हर्टिब्राटा चे वर्गीकरण दोन गटात केले आहे : अ) अॅग्नेथा ब) नॅथोस्टोमॅटा
- पण या गटाचे वर्गीकरण वर्गात केले आहे ते आपण पुढे पाहूया.
व्हर्टिब्राटा (2 विभाग)
| अॅग्नेथा (Jawless) (हनुवटी नसणारा) (2 वर्ग) | नॅथोस्टोमॅटा (Jawed) (हनुवटी असणारा) (2 वर्ग) |
|---|---|
|
ऑस्ट्राकोडर्मी - विलुप्त व्हर्टिब्राटा - आता सर्व लुप्त झाले आहे सायक्लोस्टोमेटा |
पायसेस टेट्रापोडा (पुन्हा 4 वर्ग)
|
टीप: व्हर्टिब्रेट्सच्या 6 वर्गांचा आपण अभ्यास करणार आहोत.
अ) वर्ग सायक्लोस्टोमेटा
- सागरीनिवासी प्राणी, शरीर द्विपार्श्व सममित असते. हृदयाला 2 कप्पे असतात.
- या प्राण्याला अर्धवर्तुळीय बुरी मुख (Suctorial Mouth) व असुमित पर (Unpaired Fins) असतात.
- उदा.: मिक्सीन (Hag fish), पेट्रोमायझॉन
ब) सुयजकामास पायसेस (मासेमारी)
- हा वर्ग माशांचा आहे (Fish). यात गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे येतात.
- हाला शरीरावर स्क्वॅमसचे आच्छादन असते तसेच दोन्ही टोकांना निमुळते असतात.
- श्वसनासाठी आच्छादित किंवा अनाच्छादित कल्ले असतात.
- पाण्यात पोहण्यासाठी पांख्या जोड्या असतात व पुच्छरज्जू (शेपूट) उपयोग दिशा बदलण्यासाठी होतो.
- यांचे हृदय दोन कप्प्यांचे बनले असते व एकेरी रक्ताभिसरण असते.
- हे शीत रक्ताचे प्राणी आहेत (ज्यांचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते) (Poikilothermic)
- हे अंडी घालणारे प्राणी असून बाळात काळभ्रूण घडवून येते.
- कार्तिलाज पूर्णपणे कार्टिलेज (Cartilage) अंतःकंकाल (उदा. शार्कफिश) तर काहींना अस्थिमय व कार्टिलेज अंतःकंकाल असतो (उदा. मासे)
- मासेमारीच्या अभ्यासाला 'इकथिओलॉजी' असे म्हणतात.
- पाण्यात गाळाची कण ओळखण्यासाठी 'लॅटेरोसेप्टर' असतात.
- सुयजकामास पायसेस चे वर्गीकरण 3 वर्गात केले गेले आहे.
Tags: कॉर्डाटा, सिफॅलोकॉर्डाटा, युरोकॉर्डाटा, व्हर्टिब्राटा, सायक्लोस्टोमेटा, पायसेस, Chordata, Science, Biology, SSC, MPSC
सुपरक्लास पायसेस - वर्गीकरण + क) वर्ग अॅम्फिबिया (उभयचर वर्ग)
सुपरक्लास पायसेस चे 3 वर्ग
| प्लॅकोडर्मी | क्वॉन्ड्रिक्थायस | ऑस्टिक्थायस |
|---|---|---|
| - यांच्यातील सर्व लुप्त झाले आहेत (पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत/ हद्दपार आले आहेत) |
- कॉन्ड्रिन-कास्थी, इथायस-fish यांचा अंतःकंकाल (कार्टिलेज) असतो. - हे खा-या पाण्यातच आढळतात. - फक्त 5% मत्स्य या प्रकारात येतात. - मुख समोरच्या बाजूला खाली असते - अंडी घालतात किंवा पिलांना जन्म देतात. - उदा.: स्कॉलिओडॉन (डॉग फिश), इलेक्ट्रीक रे, हातोडा सारखे डोके असणारी शार्क (Hammer Headed shark) रॅबीट फिश (Chimaera) |
- अंतःकंकाल हा हाडांनी बनलेला असतो म्हणून यांना 'बोनी फिश' असे म्हणतात. - खाऱ्या तसेच गोड्या पाण्यात आढळणारे व सर्व प्रकारचे 95% मत्स्य यांच्यात येतात. - मुख टोकाला असते, शेपटी सममित. - उदा.: पापलेट, रोहू, कतला, फिश, कटला, सार्डीन, फिश, सॅल्मन फिश, एक्सोसीटस (Flying fish) हिप्पोकॅम्पस (sea horse) टॉर्पेडो (sucker fish), पेनकोर्डी, टिलापिया बेट्टा (Fighting fish) |
क) वर्ग अॅम्फिबिया (उभयचर वर्ग)
* सध्याच्या उभयचर वर्गाला लिस्सा अॅम्फीबिया म्हणतात.
- पाण्यात व जमिनीवर दोन्हीवरही राहू शकतात. शरीरावर खवले नसतात, शरीर मृदू असते.
- यांच्या अंगावर स्लेम्पल ग्रंथी (Mucosa) असल्याने ते कायम ओलसर असतात.
- अग्रपाद (पुढचे पाय) आखूड असतात, तर पश्चपाद (मागचे पाय) लांब असून त्याच्या त्वचेच्या पडद्याने जोडलेली पाच बोटे असतात. यांच्या शरीराच्या हृदयाला तीन कप्पे असणे, व शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळते.
- यांच्यात बाह्यफलन घडून येते. (अंडी घालतात - Oviparous)
- डिंभावस्थेत (Larval Stage) कल्ल्याद्वारे तर समाधीकाळात (Dormant Period) फुफ्फुसाद्वारे किंवा त्वचेद्वारे श्वसन करतात.
- * पृष्ठवंशीयांमधील सर्वात लहान वर्ग, गोड्या पाण्यात आढळतात.
- खाऱ्या पाण्यात आढळत नाहीत, त्यांना 'मान' (Neck) नसते.
- यांच्या RBC ह्या द्विअवतल (Biconvex) व केंद्रक असलेल्या असतात.
- हे एस्टिवेशन (Summer Sleep) आणि हायबरनेशन (Winter Sleep) हा संकल्पना दाखवतात.
- यांचे वर्गीकरण - अॅम्फिबिया हा वर्ग 3 गणात विभागला जातो.
उदाहरणे: सिलिसियन (Caecilian), बेडूक (Frog), सॅलमॅंडर (Salamander)
Tags: पायसेस, प्लॅकोडर्मी, क्वॉन्ड्रिक्थायस, ऑस्टिक्थायस, अॅम्फिबिया, उभयचर, Shark, Frog, Salamander, Science, Biology, SSC, MPSC
अॅम्फिबिया चे 3 गण + ड) वर्ग रेप्टीलिया (वर्ग सरिसृप)
अॅम्फिबिया चे 3 गण
| गण अॅपोडा (जिम्नोफायनो) | गण युरोडेला (कॉडाटा) | गण अनुरा (सॅल्टॅटोरिया) |
|---|---|---|
|
- पाय नसतात, शेपूट कमी असते किंवा नसतेच) - बीळ करणारे आहेत. उदा.: युरोटायफ्लस इच्थायोफिस (Blind worm) or सिलीसियान |
- शेपूट असते, सारखा आकाराचे पाय असतात व बाह्यकंकाल नसते. उदा.: सॅलॅमंडर (Ambyostoma) नेक्टरस (Mud Puppy) सायरेन (Mud eel) ट्रायट्युरस (Newt) प्रोटीयस (Blind Salamander) |
- पाय असतात, बोटे ही जाळीदार पडद्याने जोडली जातात. - डिंभक अवस्थेत शेपूट असते. उदा.: रानाटाग्रिनियाना (Indian Bull Frog) रानापायपियन्स (Leopard Frog) रोड (Bufo), अलिटस (mid-wife toad) हापला (Tree frog) रायकोफोरस (Flying frog) |
29 एप्रिल : जागतिक बेडूक संरक्षण दिन
ड) वर्ग रेप्टीलिया (वर्ग सरिसृप)
- हे प्राणी शीततर्की व बहुसंख्येने भूचर असतात. पाय खूप लहान असतात किंवा नसतातच.
- त्वचा कोरडी, खवलेयुक्त, खडबडीत असते. शरीर डोके, मान, धड व शेपूट असे विभागले आहे.
- एकलिंगी, अंडज असतात व फलन शरीरांतर्गत होते. श्वसन केवळ फुफ्फुसामार्फत होते.
- बहुतेकांना तीन कप्प्याचे हृदय असते परंतु मगरीला चार कप्प्याचे हृदय असते.
- उदा.: कासव, पाल, सरडा, मगर, शॅमेलिऑन सरडा, उडणारा सरडा (Draco)
- पाय नसणारे : धामण, अजगर, साप, नाग.
- यांच्या कवटींनुसार खालील 4 गट पाडतात :
- अॅनॅप्सिडा
- पॅरॅप्सिडा
- सिनॅप्सिडा
- डायॅप्सिडा
- वरीलपैकी पहिले 3 गट हे जवळजवळ लुप्त (Extinct) झाले आहेत
- डायॅप्सिडा चे विभाजन 3 गणांत केले जाते.
उदाहरणे: कॅमेलिऑन सरडा (Chameleon lizard), उडणारा सरडा (Draco), साप (Snake), कासव (Turtle), मगर (Crocodile)
Tags: अॅम्फिबिया, अॅपोडा, युरोडेला, अनुरा, रेप्टीलिया, सरिसृप, Reptilia, Amphibia, Science, Biology, SSC, MPSC
वर्ग रेप्टीलिया - उपगण + ई) वर्ग एव्हज (पक्षीवर्ग)
रेप्टीलियाचे उर्वरित 3 वर्ग
- अ) रिंकोसिफेलिया : हा न्यूझीलँड चा जीवंत जीवाश्म असून याचा तिसरा डोळा कार्यरत असतो. उदा. तुआतरा
- ब) क्रोकोडिलिया : चार कप्प्याचे हृदय, स्नायूयुक्त पटल, सस्तन प्राण्यांसारखे दात (तीनही गुणधर्म सस्तन
प्राण्यासारखे)
उदा. क्रोकोडाईल, अलिगेटर, घडियाल (मगरीचे प्रकार) - क) स्क्वॅमेटा : यांचे दोन उपगणांत विभाजन होते.
स्क्वॅमेटाचे 2 उपगण
| उपगण (I) लिझार्डस (Lacertilia) | उपगण (II) साप (Ophidia) |
|---|---|
|
उदा.: वॉल लिझार्ड (Hemidactylus)=पाल, - उडणारा सरडा (Draco) - ऑफियोसॉरस - यालाच ग्लास स्नेक असे म्हणतात याला पाय नसतात. - शॅमेलिऑन सरडा |
1) विषारी साप : नाग (Naga)-Neurotoxic - वायपर (Hemotoxic, पिल्लाला जन्म देतो) - हायड्रोफिस (Sea Snake) 2) बिनविषारी साप - - अजगर (Python), - नेट्रिक्स (Pond snake) - टायास (Rat Snake, धामण) |
- सरिसर्पांच्या अभ्यासाला 'हर्पिटॉलॉजी' असे म्हणतात
- लिझार्डस च्या अभ्यासाला 'सॉरॉलॉजी' (Saurology) असे म्हणतात
- सापांच्या अभ्यासाला ओफीडॉलॉजी किंवा सर्पेटॉलॉजी असे म्हणतात.
ई) वर्ग एव्हज (पक्षीवर्ग)
- हे उष्ण रक्ताचे, एकलिंगी, अंडज प्राणी आहे.
- पुढच्या पायाचे रूपांतर पंखात झालेले असते, म्हणून द्विपाद असतात.
- शरीर दोन्ही टोकास निमुळते, हाडे हे पोकळ असल्याने शरीर हलके असते.
- हृदय चार कप्प्यांचे. फुफ्फुसाद्वारे श्वसन होते. बाह्यमुखाचे रूपांतर चोचीत झाले असते.
- हे उष्ण रक्ताचे असल्यामुळे यांना 'होमिओथर्मिक / एंडोथर्मिक' असे म्हणतात. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये यांच्या शरीराचे तापमान सर्वात जास्त असते. (40° ते 45°C)
- यांच्या बाह्यकंकालाचे चोच, पिसे व पंजे यात रूपांतर झाले आहे.
- * यांच्या उदर (Abdomen) नसते, पण घसा गळ्यातील पिशवी असते
- पक्षांमधील ध्वनियंत्राला 'सिरिंक्स' म्हणतात. यांच्यात मूत्राशय नसते (त्यांच्या गर्भावस्थेत मूत्राशय असते)
- यांच्या चेतांच्या 12 जोड्या असतात, पक्षांत वास घेण्याची क्षमता नसते पण डोळे हे 'पेक्टेन' नावाच्या घटकामध्ये तीक्ष्ण नजरेचे असतात
- त्यांच्या कानात एकच हाड असते.
- त्यांच्या त्वचेवर 'प्रीन ग्रंथी' असतात ज्या पिसांची निगा राखतात.
- त्यांचे पाठीमागचे मनके एकत्र येऊन जो भाग तयार होतो त्याला 'पायगोस्टाईल' असे म्हणतात.
- RBC द्विअवतल व केंद्रक असणारे असतात.
- यांचे 2 उपगणांत विभाजन होते :
- ऑर्किओ-ऑर्निथीस
- निओ-ऑर्निथीस
Tags: रेप्टीलिया, लिझार्डस, ओफीडिया, एव्हज, पक्षी, Reptilia, Aves, Herpetology, Ornithology, Science, Biology, SSC, MPSC
वर्ग एव्हज - उपगण + फ) वर्ग मॅमेलिया (सस्तनी वर्ग)
निओ-ऑर्निथीस चे 4 गण
वरीलपैकी पहिला प्रकार लुप्त झाला असून दुसऱ्या प्रकाराचे 4 गणांत विभाजन होते.
- अ) पॅलिओग्नेथी : उदा. 1) शहामृग 2) किवी
- ब) इम्पेनी : उदा. पेंग्विन
- क) ओडोन्टोग्नेथी : दात असणारे पक्षी जे मासे खातात (सगळे लुप्त झाले)
- ड) निओग्नेथी : आधुनिक पक्षी उदा. 1) हमिंगबर्ड (सर्वात लहान पक्षी)
स्विफ्ट (सर्वात जलद पक्षी), मोर, अल्बॅट्रॉस (सर्वात मोठा पक्षी) व्हल्चर (मांसभक्षी पक्षी)
- हे अंडी घालत असले तरी यांच्यात 'फलन' हे अंतर्गत होत असते.
- * स्त्रीलिंगी पक्षांमध्ये फक्त डाव्या बाजूला अंडकोष व अंडवाहिनी (ovary) असतात. ह्यामुळे शरीराचे वजन कमी ठेवण्यास मदत होते. उदा.: पोपट, घार, घुबड.
फ) वर्ग मॅमेलिया (सस्तनी वर्ग)
- हे प्राणी उत्क्रांत, उष्ण रक्ती प्रामुख्याने भूचर व पर्यावरणाशी पूर्णपणे अनुकूलित झालेले असतात.
- यांना दूध खाण्याच्या ग्रंथी असतात. शरीरावर केस, स्वेदग्रंथी (Sweat Gland) व तैलग्रंथी असतात.
- एकलिंगी व जरायुज असतात. परंतु या वर्गात येणारे परंतु अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटीपस व एकिडना होय.
- जरायुज प्राणी म्हणजे थेट पिल्लाला जन्म देणारे (अंडे न घालता)
- हृदयाला चार कप्पे असतात.
- हालणारा जबडा, हालणारा बाह्यकर्ण, डोळ्याची पापणी हालते.
- छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायूमय पडदा असतो. i.e. Diaphragm
- स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी ध्वनिनिर्मिती करू शकतात.
- हे उष्ण रक्ताचे प्राणी असून यांना होमिओथर्मिक किंवा एंडोथर्मिक प्राणी असे म्हणतात.
- यांच्यात घाम ग्रंथी, स्तन ग्रंथी व मेद ग्रंथी असतात व यांचे श्वसन हे केवळ फुफ्फुसामार्फतच होते.
- यांचे 3 उपगणांत विभाजन केले जाते
- प्रोटाथेरिया
- मेटाथेरिया (Marsupials)
- युथेरिया
उदाहरणे: वटवाघूळ (Bat), मुंगूस (Mongoose), डॉल्फिन (Dolphin), हत्ती (Elephant)
Tags: एव्हज, निओग्नेथी, मॅमेलिया, सस्तनी, Aves, Mammalia, Prototheria, Metatheria, Eutheria, Science, Biology, SSC, MPSC
वर्ग मॅमेलिया - 3 उपवर्ग: प्रोटाथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया
i) उपवर्ग- प्रोटाथेरिया : (गण- मोनोट्रेमेटा)
- हे 'अंडी घालणारे' सस्तन प्राणी आहेत. यांच्यात गर्भाशय नसते.
- यांच्यात बाह्यकर्ण नसतो, व स्तनग्रंथी ह्या दोन्ही लिंगात कार्यरत असतात.
- जीवांमध्ये दात नसतात. फक्त टोकदार जबडे असतात
- उदाहरणे : ऑर्निथोरिंकस (Duck-billed Platypus) ही एकमेव विषारी सस्तन प्राणी आहे, त्याची विष ग्रंथी ही
त्याच्या मांडीत असते. हे मोनोट्रेमेटा या गणात येतात. (Monotremata)
टॅकिग्लोसस (Echinda or Spiny ant eater)
ii) मेटाथेरिया :
- पिशवीधारी स्तनधारी प्राणी, यांच्यात गर्भाशय व स्त्रीजननांग यांच्या जोड्या असतात. बाह्यकर्ण असतो.
- स्तनग्रंथी या फक्त स्त्रीलिंगी प्राण्यांमध्ये विकसित होतात.
- यांच्यात 'प्लासेंटा' नसतो, हे थेट पिलांना जन्म देतात.
- उदा. कांगारू (मॅक्रोपस), डायडेल्फिस (Opossum), कोआला (Teddy bear)
टीप: जरी प्रौढ कांगारू व गाय हे जवळपास सारख्या आकाराची असतात पण, जन्माच्या वेळी कांगारू हा घेवड्याच्या (Bean) आकाराचा असतो वजन 1 ग्रॅम तर जन्माच्या वेळी गाईचे वासरू हे 45 किलोग्राम असते.
iii) युथेरिया :
- हे खरे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी आहेत. यांच्यात एकच गर्भाशय स्त्रीजननांग असते. हे पिलांना जन्म देतात.
- स्तनग्रंथी ह्या फक्त स्त्रीलिंगी सजीवांमध्ये विकसित असतात बाह्यकर्ण असते.
- याचे प्रमुख 16 गण पडतात, त्यापैकी काही महत्वाचे गण खालीलप्रमाणे
सस्तन प्राण्यांतील काही महत्वाचे गण
- a. प्रायमेटस : लेमरस, लोरीस, माकडे, आदिजीव (जुन्या वर्गीकरणानुसार) व मानव
- b. इन्सेक्टिवोरा (यांच्यात छोटे सस्तन प्राणी येतात) : हेजो हॉग, मोल
- c. लॅगोमॉर्फा : ससा (oryctolagus)
- d. प्रोबोसिडीया : हत्ती
- e. सिटेसी : व्हेल मासा, डॉल्फिन,
ब्ल्यू व्हेल : पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे पण याला दात नसतात हे प्लॅंक्टॉन खात. (प्लॅंक्टॉन म्हणजे पाण्यावर तरंगणारे प्लंवग)
- स्पर्म व्हेल (दात असणारी व्हेल) हा मासा इतर लहान मासे खातो. (याचा मेंदू मोठा असतो)
- डॉल्फिन - मानवांनंतर हे सर्वात हुशार सस्तन प्राणी आहेत. - f. कार्निव्होरा : मांसाहारी प्राणी येतात. उदा.
- भूचर (Fissipedia) : कुत्रा, वाघ, सिंह, मांजर
- जलचर (Pinnipedia) : सिल, वॉलरस, सी-लायन - g. सिरेनिया : सी-काऊ
- h. अर्टिओडॅक्टीला : ही 2 ते 4 खुरे असणारी तसेच उदराला 4 कप्पे असून रवंथ करणारे प्राणी होत. साधारणपणे त्यांना शिंगे पण असतात. उदा. गाय, म्हैस, मेंढी, हरीण, शेळी, उंट, डुक्कर, जिराफ पानघोडा इत्यादी यातील डुक्कर सोडून इतर सर्व हे रवंथ करणारे असतात (cud-chewing animals)
- i. पेरीसोडॅक्टीला : उदा. घोडा, झेब्रा.
- j. चिरोप्टेरा : वटवाघूळे
- k. रोडेशिया : हा सर्वात मोठा सस्तन प्राण्यांमधील गण आहे. उदा. उंदीर, खार, गिनिपिग, पांढरपाइन इत्यादी
- ब्ल्यू व्हेल च्या त्वचेखाली असणाऱ्या मेदाला ब्लबर असे म्हणतात तर त्याच्या जबड्याला बॅलीन असे म्हणतात.
- 'अंब्रोग्रीस' हे स्पर्म व्हेल च्या आतड्यांपासून मिळविले जाते
- फक्त उंट हा एकमेव सस्तन प्राणी आहे ज्याच्या RBC ला केंद्रक असते बाकी सस्तन प्राण्यांत RBC मध्ये केंद्रक नसते.
Tags: मॅमेलिया, प्रोटाथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया, प्लॅटीपस, कांगारू, व्हेल, हत्ती, Mammalia, Science, Biology, SSC, MPSC
Important Points + जैवविविधतेसंबंधित संज्ञा + लक्षात ठेवा
Important Points
- सृष्टीमध्ये सर्वात जास्त कीटकांची संख्या दिसून येते. Arthropoda
- पोमॅटो हे बटाटा व टोमॅटो यांचे एकत्रीकरणाने बनवितात, ज्यांना बिया येत नाहीत.
- थिओफ्रेस्ट या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाक या गटात केले. (3 प्रकार)
- अरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात केले. (4 गट)
- शाक (Herbs)/रोपटे - यांची खोड हिरवी व नाजूक असतात. तसेच उंचीनी लहान असतात.
- झुडप (Shrub) - खोड थोडेसे कठीण असते. तसेच यांना खोडाच्या खालच्या भागातच फांद्या येतात.
- आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अमलात आला आहे.
- जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमधील रिओ-द-जानेरो येथे 1992 साली झालेल्या वसुंधरा परिषदेत जैविविधता करारावर सहा करण्यात आल्या.
जैविविधतेसंबंधित काही महत्वाच्या संज्ञा
- अभयारण्य (Sanctuary) : असे क्षेत्र ज्यात प्राण्यांना आश्रय व बाहेरील वातावरणापासून वेगळे केले जाते.
- National Park : वन्य जीवनासाठी राखीव ठेवलेली अशी जागा जिथे वन्य सजीव अधिवास (Habitat) करू शकतात.
- Biosphere Reserve = वनस्पती व प्राणी यांच्या संवर्धनासाठी आणि आदिवासी जमातीसाठी जगण्यासाठी सर्वांकरित केलेल्या मोठ्या क्षेत्रास Biosphere reserve म्हणतात.
- Flora = विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील वनस्पतीची जात.*
- Fauna = विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणीजात.*
- प्रदेशानिष्ट जात (Endemic species) = वनस्पती किंवा प्राण्याची अशी जात जी एखाद्याच विशिष्ट
प्रदेशात/क्षेत्रात आढळून येते त्यास प्रदेशानिष्ट जात म्हणतात.
उदा. Indian giant squirrel (खार) and flying squirrel are endenic to pachamarhi biosphere reserve. - Endangered species = जी सजीवांची जात सृष्टीमध्ये खूपच अल्पप्रमाणात शिल्लक आहे किंवा अशी जात जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यास Endangered species म्हणतात.
- Red data Book = हा एक असा संग्रह आहे, ज्यामध्ये सर्व Endangered वनस्पती व प्राणी यांचा समावेश केला जातो.
- भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था स्थापना 1890, प्राणी सर्वेक्षण संस्था स्थापना 1916.
लक्षात ठेवा
- कर्नाटक सरकारने आशियातील हत्तीचे संवर्धन करण्यासाठी राज्यात 'Project Elephant' हा कार्यक्रम राबवला आहे.
- भारताकडे 50% पेक्षा जास्त वाघांची; 65% आशियन हत्ती, 85% एकशिंगी गेंडा आणि 100% आशियन सिंहाची संख्या आहे.
- भारत हा जगातील 12 जैवविविधता देशांतील 6 व्या क्रमांकाचा देश आहे. ज्यामध्ये जगातील 34 Biodiversity hotspot पैकी 2 येतात. ♦ पूर्व हिमालय ♦ पश्चिम घाट
- Threatened species म्हणजे सजीवाच्या अशा जाती ज्या भविष्यात Endangered species होऊ शकतात.
- भारताकडे 172 प्राण्यांच्या जाती या Threatened species म्हणून ओळखल्या जातात म्हणजेच जगातील एकूण Threatened species पैकी 2.9% जाती. - आयुर्मर्यादा
- पण काही वनस्पती खूप काळ टिकतात. (उदा. कोलकत्ता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.) - अंट ईटर हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळस्थान असणारा प्राणी असून तो 'मुंगी अस्वल' या नावाने ओळखला जातो. भारतात उदमांजर हा मुंग्या खाणारा प्राणी आढळतो.
Tags: जैवविविधता, अभयारण्य, National Park, Biosphere Reserve, Endangered species, Red data Book, Biodiversity, Project Elephant, SSC, MPSC, Environment
Interesting + पर्यावरण संबंधित मुद्दे + धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण
वेगळे सजीव आणि त्यांचा वेग
| 1) पांढरा बाज (Falcon) | = 320 कि.मी प्रति तास |
| 2) चिता | = 112 कि.मी प्रति तास |
| 3) काळू चिता | = 40-46 कि.मी प्रति तास |
| 4) ससा (Rabbit) | = 56 कि.मी प्रति तास |
| 5) खार (Squirrel) | = 19 कि.मी प्रति तास |
| 6) उंदीर (Mouse) | = 11 कि.मी प्रति तास |
| 7) माणूस (Human) | = 40 कि.मी प्रति तास |
| 8) कासव (Tortoise) | = 0.27 कि.मी प्रति तास |
| 9) गोगलगाय (Snail) | = 0.05 कि.मी प्रति तास |
| प्राणी | आयुर्मान |
|---|---|
| पाण्याची | 1 ते 4 वर्षे |
| कुत्रा | 12 ते 18 वर्षे (लॅब्राडोर-रिट्रीवर) |
| माकडा | 50 वर्षे |
| हत्ती | 70 ते 90 वर्षे |
| बे माशा | 1 ते 26 वर्षे |
पर्यावरण संबंधित मुद्दे :
- वन संवर्धन कायदा, 1980 - कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीस 15 दिवसांचा कारावास.
- पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 - कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख दंड.
- राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापना 2010 मध्ये करण्यात आली.*
- ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण कायदा 2000 *
- जैवैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1998 *
- ई-कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 2011 *
- वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार *
कलम 49 अ- दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी.*
कलम 49 ब- वन्यप्राण्याच्या कातडीपासून बनविलेल्या वस्तू वापरण्यास बंदी.*
कलम 49 क - वन्यप्राण्याच्या वस्तूना असलेला साठा व्यक्ती जाहीर करणे.* - आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था व त्यांचे मुख्यालय : IUCN = ग्लॅंड (स्वीट्झर्लंड), IPCC= जिनिव्हा, UNEP= नैरोबी (केनिया), WWF = न्यूयॉर्क, वर्ल्ड वाईल्ड फंड इंटरनेशनल = केंब्रिज, ग्रीन पीस इंटरनेशनल = लंडन (यु.के.)
धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण :
- संकटग्रस्त प्रजाती (Endangered species) - लायन-टेल्ड-माकड, रस्नोहॉर्न.*
- दुर्मिळ प्रजाती (Rare species) - रेड पांडा, कस्तुरी मृग.*
- संकटशील प्रजाती (Vulnerable species) पट्टेरी वाघ, गिरचे सिंह.
- अनिश्चित प्रजाती (Indeterminate species) - मॅकॉक खार
टीप: IUCN वरील जातींची यादी (Red list) तयार करते, ज्यामध्ये गेल्या पाच संकटग्रस्त प्रजाती व जिवंत पासून पूर्वी संकटग्रस्त पण आता धोक्याच्या बाहेर आलेल्या प्रजातींचे नावे दर्शवतात.
Tags: पर्यावरण, वन्यजीव संरक्षण कायदा, IUCN, Endangered species, Vulnerable species, Red List, WWF, IPCC, SSC, MPSC, Environment
MPSC अंतर्गत विचारले प्रश्न 2011 ते 2021
प्र.1 खालील जोड्या जुळवा. (MPSC- 2020)
| a) अरिस्टॉटल | i. औषधशास्त्राचा जनक |
| b) थिओफ्रास्टस | ii. अनुवंशिकशास्त्राचा जनक |
| c) लिपोईकेटस | iii. वनस्पतीशास्त्राचा जनक |
| d) ग्रेगर जोहान मेंडेल | iv. जीवशास्त्राचा जनक |
Options: 1) a-ii b-i c-iv d-iii | 2) a-iii b-ii c-iv d-i | 3) a-iv b-iii c-i d-ii | 4) a-i b-iv c-iv d-iii
प्र.2 शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा. (Group-C 2019)
a) अधर बाजूस मुख b) जरायुज c) सायक्लॉइड खवले d) कार्टिलेजियम अंतःकंकाल
Options: 1) a, b, d 2) a, c 3) b, d 4) only d
प्र.3 प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत. (Group-C 2019)
a) सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत.
b) सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात.
c) सर्व किटक परपोषी आहेत.
d) सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहेत.
Options: 1) फक्त b आणि c 2) फक्त a 3) फक्त c आणि d 4) फक्त b
प्र.4 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. (Group-C 2019)
झुल : माल्पिघियन नलिका : गांडूळ : ?
Options: 1) आयचलन 2) प्रमेहकला 3) भ्रूणपिंड 4) वृक्क
प्र.5 मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातील जीवाणूंमुळे मेला प्रदूषणाचे धोके आहेत कारण : (Group-C 2019)
1) हे जंतू रोगकारक आहेत.
2) ते दूषयकांचे विघटन करतात.
3) ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात.
4) ते 48 तासात वाढतात.
प्र.6 प्लेटिहेल्मिन्थसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे: (Group-C 2019)
Options:
1) फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी
2) फ्लॅटवर्म्स, डिप्लोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी
3) फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट प्राणी
4) फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक, स्यूडोसिलोमेट प्राणी
प्र.7 खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? (Group-B 2018)
अ) टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते.
ब) पॅसीला हेपॅटिकाला यकृत फ्लुक या नावाने ओळखले जाते.
क) अॅन्कालोस्टोमा ड्युडेनलिसला हुक जंत असेही म्हटले जाते.
ड) नेमॅटोइड्स ही सामान्यतः द्वीपी जंत असे म्हटले जाते.
Options: 1) क फक्त 2) ब आणि ड फक्त 3) अ फक्त 4) अ आणि क फक्त
प्र.8 खालीलपैकी कोणत्या संघात इंड्रीय पातळीचे संघटन आढळते? (Group-C 2018)
Options: 1) परिफेरा 2) आदिजीव (प्रोटोज़ोआ) 3) चपटेकृमी (प्लॅटीहेल्मिन्थस) 4) सिलेंट्रेटा
प्र.9 टेलेओस्टी या सुपरऑर्डर मधील _______ या प्राण्यांना सामान्यपणे 'उडणारे मासे' असे म्हणतात.(Group-B 2017)
Options: 1) अँम्युला 2) एक्झोसीटस 3) हिप्पोकॅम्पस 4) हेमी-हॅम्पस
प्र.10 _____ या प्राणीवर्गातील सदस्य हे अॅनेलिडातील द्विनिगी प्राणी होत. (Group-B 2017)
Options:
1) पॉलिकाएटा व ऑलिगोकाएटा
2) ऑलिगोकाएटा व हिरुडीनीआ
3) हिरुडीनीआ व आरकीअनेलिडा
4) पॉलिकाएटा व हिरुडीनीआ
प्र.11 वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे ? (MPSC 2017)
Options:
1) सी-फेन, सी-स्टार, सी-पेन
2) जेली-फिश, सिल्वर फिश, स्टार फिश
3) फोलास, पायला, कटलफिश
4) अर्थवर्म, अकॉर्नवर्म, कॅल्म-वर्म
प्र.12 मावा किंवा तुडतुडे किडे हे कोणत्या ऑर्डरमध्ये (गटामध्ये) मोडतात? (Excise 2017)
Options: 1) लेपिडोप्टेरा 2) कोलिओप्टेरा 3) डिप्टेरा 4) हेमीप्टेरा
प्र.13 पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो. (Excise-2017)
Options: 1) लिव्हर फ्लुक 2) टेपवर्म 3) अॅस्कारीस 4) अर्थवर्म
प्र.14 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे .......... या प्राणीवर्गात मोडतात. (Excise 2017)
Options: 1) प्रोटोथेरिया 2) थेरिया 3) युथेरिया 4) मेटाथेरिया
Handwritten Note: Diploblastic - a animal body two embryonic cell layers
Tags: MPSC, SSC, Science, Biology, MCQ, अरिस्टॉटल, मेंडेल, शार्क, प्लटिहेल्मिन्थस, टेलेओस्टी, प्रोटोथेरिया
MPSC/STI/PSI/Asst - प्रश्न 15 ते 29 + उत्तरे
प्रश्न
15. गॅस्ट्रोपोडा (Gastropoda) वर्गातील गोगलगायीचे कवच ---- व्हॉल्वने (valve) बनलेले असते.? (STI 2016)
1) दुहेरी (Double) 2) एकेरी (Single) 3) चौपदरी (Quadruple) 4) तिहेरी (Triple)
16. खालील जोड्या जुळवा. (STI 2016)
a) लिच i) पाइसीज
b) ऑक्टोपस ii) रेप्टीलिया
c) डॉगफिश iii) मल्युस्का
d) स्टेगोसारस iv) अॅनेलिडा
Options: 1) a-ii b-iii c-iv d-i 2) a-iii b-iv c-ii d-i 3) a-i b-iv c-iii d-ii 4) a-iv b-iii c-i d-ii
17. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Salamander) ---- गणात मोडतात. (PSI 2016)
1) जिम्नोफीओना 2) युरोडेला 3) अॅन्युरा 4) अपोडा
18. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुखड पर असममित असतो ? (Asst-2016)
1) पापलेट 2) बॉम्बील 3) मोरी 4) वाम
19. देवमासा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण? (Asst-2016)
1) तो पाण्यात राहता 2) तो अंडी देतो
3) छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. 4) तो उष्णरक्ती प्राणी आहे.
20. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे? (STI 2015)
1) बेडूक 2) पायला 3) मासा 4) तारामासा
21. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? (STI 2015)
अ) सिल्वर फिश प्राणी मत्स्यवर्गात येतो.
ब) कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्ष असते.
1) केवळ (अ) 2) केवळ (ब) 3) (अ) व (ब) दोन्ही 4) (अ) व (ब) दोन्ही नाहीत.
22. सॅलमॅण्डर ह्या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ? (STI 2015)
1) एव्हज 2) सस्तन प्राणिवर्ग 3) उभयचर प्राणिवर्ग 4) सरिसृप
23. सिल्व्हर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात ? (Asst 2015)
1) खडक 2) शैवाळ 3) इतर माश्यांसोबत 4) जुनी पुस्तके
24. शेपटी आणि पाय असणारा हा उभयचर (Amphibian) वर्गातील प्राणी होय. (Asst-2015)
1) सिसिलियन 2) फ्रेक 3) बेडूक 4) सॅलमॅण्डर
25. खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही? (Asst 2014)
1) मच्छर 2) माशी 3) स्पायडर (कोळी) 4) ढेकूण
26. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? (PSI 2014)
1) कांगारू 2) प्लॅटीपस 3) पेंग्विन 4) व्हेल
27. गांडूळ (Earthworm) हा प्राणी कोणत्या संघात (Phylum) येतो. (Asst 2013)
1) पोरीफेरा 2) सिलेट्रेटा 3) अॅनेलिडा 4) मोलुस्का
28. विंचू हा ------------ प्राणी आहे. (STI 2013)
1) अंडी देणारा (Oviparous) 2) पिलाना जन्म देणारा (Viviparous)
3) वरील पैकी दोन्ही 4) यापैकी कोणतेही नाही.
29. गोगल गाय ------ ह्या संघात (phylum) मोडते.? (STI 2011)
1) मोलुस्का 2) आर्थ्रोपोडा 3) इकायनोडर्मटा 4) नेमॅटोडा
उत्तरे
| 1) 3 | 2) 1 | 3) 2 | 4) 4 | 5) 3 |
| 6) 1 | 7) 2 | 8) 3 | 9) 2 | 10) 2 |
| 11) 3 | 12) 4 | 13) 2 | 14) 1 | 15) 2 |
| 16) 4 | 17) 2 | 18) # | 19) 3 | 20) 4 |
| 21) 4 | 22) 3 | 23) 4 | 24) 4 | 25) 3 |
| 26) 2 | 27) 3 | 28) 2 | 29) 1 |
Tags: MPSC, STI, PSI, Biology, MCQ, Gastropoda, Salamander, Earthworm, Platypus, Mollusca

Post a Comment