Top News

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ - Complete Notes | Police Bharti, MPSC, Talathi 2026

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ - Complete Notes | Police Bharti, MPSC, Talathi

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

प्रस्तावना

सन 1857 पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि 1857 चा स्वातंत्र्यलढा यांचा अभ्यास आपण केला आहे. त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते. 1857 नंतर मवाळ व जहाल विचारसरणीबरोबरच सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न काही देशभक्तांनी केला. Police Bharti + MPSC + Talathi साठी हे प्रकरण 4-5 मार्कांचे आहे. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर, भगतसिंग, आझाद यांचा सशस्त्र लढा या प्रकरणात आपण बघणार आहोत.

वासुदेव बळवंत फडके

महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. त्यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडे शस्त्रविदयेचे शिक्षण घेतले.

चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्म. मराठी व संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले.

पुढे पुण्यात लष्करी लेखा विभागात (Military Accounts Department) लिपिक म्हणून नोकरी केली.

ब्रिटीशांकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे ते अस्वस्थ झाले.

क्रांतिकारी कार्य :

1876-78 चा दुष्काळ आणि शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार यामुळे त्यांनी सशस्त्र उठावाचा निर्णय घेतला.

त्यांनी "रामोशी" समाजाचे सैन्य उभे केले. यात बहुजन व मागासवर्गीय होते.

त्यांनी ब्रिटीश खजिने लुटून गरिबांना मदत केली.

त्यांचे उद्दिष्ट होते: "स्वराज्य" स्थापन करणे (ब्रिटीशविरहित भारत).

महाराष्ट्रातील पश्चिम भागात गनिमी कावा (guerrilla warfare) वापरून त्यांनी लढा दिला.

अटक व मृत्यू :

1879 मध्ये एका विश्वासघाताने त्यांना अटक झाली.

जन्मठेपेची शिक्षा सुनावून त्यांना एडन (येमेन) येथील तुरुंगात पाठवण्यात आले.

उपोषण आणि आजारामुळे 1883 मध्ये तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.

चाफेकर बंधू

चाफेकर बंधू हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारी हुतात्मे मानले जातात, ज्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर थेट हल्ला करून ब्रिटिश सत्तेला खुले आव्हान दिले. त्यांची देशभक्ती, बलिदान आणि कर्तृत्व भारतीय इतिहासात अजरामर आहे.

1. प्लेगचे दमन आणि ब्रिटीश अत्याचार :

1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती.

प्लेग नियंत्रणासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांवर अमानुष अत्याचार केले.

प्लेग कमिशनर वॉल्टर रँड (Walter Rand) आणि लेफ्टनंट आयर्स्ट हे विशेषतः अत्याचारासाठी कुप्रसिद्ध होते.

2. रँडचा वध (22 जून 1897) :

दामोदर व बाळकृष्ण चाफेकरांनी, वासुदेवच्या मदतीने, ब्रिटिश अधिकारी रँड आणि आयर्स्ट यांच्यावर पुण्यात गोळ्या झाडून हल्ला केला.

या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले.

अटक व फाशी :

दामोदर चाफेकर यांना लवकरच अटक झाली आणि 18 एप्रिल 1898 रोजी फाशी देण्यात आली.

वासुदेव व बाळकृष्ण यांनाही पुढे अटक झाली.

वासुदेवला : 8 मे 1899 रोजी फाशी

बाळकृष्णाला : 12 मे 1899 रोजी फाशी

त्यांचे सहकारी महादेव रानडे यालाही फाशी झाली.

याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध फार मोठा उठाव केला.

अभिनव भारत

सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.

🔥 MPSC/Police Bharti साठी One-Liner Facts:

क्रांतिकारक महत्वाचे मुद्दे
वा. ब. फडके गुरु: लहूजी साळवे, सैन्य: रामोशी, मृत्यू: 1883 एडन, गनिमी कावा
चाफेकर बंधू पहिले हुतात्मे, रँड वध: 22 जून 1897, दामोदर फाशी: 18 एप्रिल 1898
अभिनव भारत सावरकर, 1900, नाशिक, आधी नाव: मित्रमेळा

1904 साली याच संघटनेला 'अभिनव भारत' असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले.

तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. 1857 चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते, असे प्रतिपादन करणारा '1857 चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

विशेष माहिती

'माझी जन्मठेप' या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला.

बंगालमध्ये 'अनुशीलन समिती'

बंगालमध्ये 'अनुशीलन समिती' ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अनुशीलन समितीच्या पाचशेच्या वर शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारींद्रकुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. कोलकत्याजवळील माणिकतळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.

1908 साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली; परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आले.

रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली. व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्याने केले. पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज बचावला.

मद्रास प्रांतातही क्रांतिकार्य चालू होते. वांची अय्यर या क्रांतिकारकाने अॅश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली.

इंडिया हाऊस

लंडन येथील इंडिया हाऊस हे भारतीय क्रांतिकार्याचे साहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते. पं. श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली होती.

मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला.

इंडिया हाऊसशी निगडित असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरुण होय. त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आले.

गदर चळवळ

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली. ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सशस्त्र घडवून आणता येईल, भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल, असे क्रांतिकारकांना वाटत होते. या संघटनेचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापना झाल्या. 'गदर' ही त्यांतील एक प्रमुख संघटना होती.

अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी 'गदर' या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. 'गदर' म्हणजे विद्रोह. 'गदर' हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते.

बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशविरोधी योजना आखल्या. सन 1915 मध्ये महेंद्रप्रताप, बरकतुल्ला व ओबेदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती.

काकोरी कट

चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला. यालाच 'काकोरी कट' म्हटले जाते. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत.

हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

चंद्रशेखर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यांमध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. 1928 साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी 'हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या संघटनेची स्थापना केली.

शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे नाव होते. 'हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी' आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद.

🔥 Police Bharti + MPSC साठी Super Important Dates & Facts:

संघटना/घटना वर्ष ठिकाण प्रमुख
अभिनव भारत 1904 नाशिक वि.दा. सावरकर
अनुशीलन समिती - बंगाल बारींद्र घोष
किंग्जफोर्ड बॉम्ब 1908 मुझफ्फरपूर खुदीराम बोस, प्रफुल्ल चाकी
इंडिया हाऊस - लंडन श्यामजी कृष्ण वर्मा
कर्झन वायली वध - लंडन मदनलाल धिंग्रा
गदर पार्टी - अमेरिका/कॅनडा लाला हरदयाळ
काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 काकोरी, UP रामप्रसाद बिस्मिल, आझाद
HSRA स्थापना 1928 दिल्ली भगतसिंग, आझाद

भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.

भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले.

चितगाव शस्त्रागारावरील हल्ला

सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज गोळा केली. त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्य सेन यांनी आखली.

16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्य सेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्य सेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली.

शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या.

जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली केला.

🔥 Police Bharti/MPSC साठी सुपर हॉट Facts - एका ओळीत:

क्रांतिकारक/घटना तारीख/वर्ष महत्वाचा मुद्दा
साँडर्स वध - भगतसिंग + राजगुरू. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फाशी 23 मार्च 1931 लाहोर तुरुंग. शहीद दिन
चंद्रशेखर आझाद मृत्यू - अलाहाबाद, आल्फ्रेड पार्क, चकमकीत
चितगाव शस्त्रागार हल्ला - सूर्य सेन प्रमुख. 'मास्टर दा'
सूर्य सेन फाशी 16 फेब्रु 1933 12 सहकाऱ्यांसह फाशी
प्रीतिलता वड्डेदार - आत्माहुती. चितगाव केस
कल्पना दत्त - जन्मठेप. चितगाव केस
शांती घोष + सुनीती चौधरी - शाळकरी मुली. न्यायाधीशाचा वध
बीना दास - गव्हर्नरवर गोळीबार, कोलकाता
ओडवायर वध 1940 उधमसिंग, इंग्लंड. जालियनवाला बागचा बदला
सारांश / निष्कर्ष

संग्रहाचा तात्पर्य

1857 च्या उठावानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा मवाळ व जहाल मार्गांपुरता मर्यादित न राहता, सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेही तीव्र झाला. वासुदेव बळवंत फडके यांनी 'स्वराज्य' ही संकल्पना देऊन सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. चाफेकर बंधूंनी प्रत्यक्ष ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला करून क्रांतीची ज्योत पेटवली.

पुढे सावरकरांच्या 'अभिनव भारत', बंगालमधील 'अनुशीलन समिती', लंडनमधील 'इंडिया हाऊस', परदेशातील 'गदर पार्टी' यांनी क्रांतीला आंतरराष्ट्रीय आयाम दिला. काकोरी कट, HSRA, चितगाव शस्त्रागार हल्ला यांसारख्या घटनांनी भगतसिंग, आझाद, सूर्य सेन, प्रीतिलता वड्डेदार, उधमसिंग यांसारख्या हुतात्म्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्यलढा अधिक आक्रमक बनला.

Police Bharti व MPSC परीक्षेसाठी: या प्रकरणातील तारखा, व्यक्ती, संघटना, ठिकाणे व फाशीच्या घटना यावर थेट प्रश्न येतात. वरील टेबल 10 वेळा वाचून पाठ करा. शहीद दिन 23 मार्च व काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 हे न विसरता लक्षात ठेवा.

VisionGov Trik: "फडके-चाफेकर-सावरकर-भगतसिंग-आझाद-सूर्यसेन-उधमसिंग" हा क्रम लक्षात ठेवा. प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकले.

📜 MPSC इतिहास संपूर्ण नोट्स | आधुनिक भारताचा इतिहास

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे घटक एका ठिकाणी अभ्यासा 👇

✅ MPSC | पोलीस भरती | तलाठी | सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त इतिहास नोट्स

VisionGov Academy 🎯
अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने!

Post a Comment

Previous Post Next Post