Top News

महाराष्ट्राचा भूगोल: कोकण, सह्याद्री, दख्खन पठार - MPSC Notes

महाराष्ट्राचा भूगोल: कोकण, सह्याद्री आणि दख्खन पठार - MPSC Notes

महाराष्ट्राचा भूगोल - मूलभूत माहिती

1. निर्मिती आणि क्षेत्रफळ

  • महाराष्ट्राची निर्मिती: 1 मे 1960 - हा 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.
  • क्षेत्रफळ: 3,07,713 चौ.किमी (30,7713 द.ल. हेक्टर; किंवा 1,18,809 चौ. मैल)
  • अक्षवृत्तीय विस्तार: 15° 8' उत्तर ते 22° 1' उत्तर अक्षांश
  • रेखावृत्तीय विस्तार: 72° 6' पूर्व ते 80° 9' पूर्व रेखांश
  • पूर्व-पश्चिम लांबी: सुमारे 800 कि.मी. (497 मैल)
  • दक्षिणोत्तर रुंदी: सुमारे 720 कि.मी.
  • समुद्रकिनाऱ्याची लांबी: 720 कि.मी. (447 मैल)
  • स्थान: भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून.

2. शेजारची राज्ये

  • वायव्येस: गुजरात राज्य, 'दादरा-नगरहवेली आणि दमण-दीव' हा केंद्रशासित प्रदेश
  • उत्तरेस: मध्य प्रदेश
  • पूर्वेस व ईशान्येस: छत्तीसगड
  • आग्नेयेस: तेलंगणा राज्य
  • दक्षिणेस: कर्नाटक
  • नैऋत्येस: गोवा

3. लोकसंख्या आणि प्रशासकीय माहिती

  • लोकसंख्या (2001): 9,68,78,627
  • 2011 चा अंतिम निष्कर्ष: 11,23,74,333
  • भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण: 9.42% (2001), 9.28% (2011)
  • राजधानी: मुंबई, उपराजधानी: नागपूर
  • विधानसभा मतदारसंघ: 288
  • विधानपरिषद मतदारसंघ: 78
  • राज्यातील लोकसभा मतदारसंघ: 48
  • राज्यातील राज्यसभा मतदारसंघ: 19
  • राज्यातील जिल्हे: 36 - पालघर हा 36 वा जिल्हा. क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा, तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा.
  • जिल्हा परिषदा: 34 - मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाहीत.
  • तालुके: 358 (355+3)
  • ग्रामपंचायती: 27,993
  • पंचायत समित्या: 351
  • महानगरपालिका: 29, नगरपरिषदा: 245, नगरपंचायती: 146, कटक मंडळे: 7
  • शहरे: 534
  • वस्ती असलेली गावे: 40,959
  • वस्ती नसलेली गावे: 2,706

4. महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग व त्यांमधील 36 जिल्हे

प्रशा. विभाग समाविष्ट जिल्हे जिल्हे तालुके क्षेत्रफळ (चौ. किमी) प्रमाण (%)
छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली 8 76 64,813 21.06
नाशिक नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव 5 54 57,413 18.69
पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 5 58 57,201 18.62
नागपूर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर 6 64 51,377 16.70
अमरावती अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ 5 56 46,029 14.94
कोकण पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 7 50 30,728 9.98
एकूण 36 358 3,07,713 100.00

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग व जिल्हा निर्मिती

1. प्रादेशिक विभागानुसार माहिती

प्रादेशिक विभाग समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे जिल्हे तालुके क्षेत्रफळ (चौ. किमी) प्रमाण (%)
विदर्भ (वऱ्हाड) अमरावती विभाग : सर्व 5 जिल्हे,
नागपूर विभाग : सर्व 6 जिल्हे
11 120 97,404 31.64
पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग : सर्व 5 जिल्हे
नाशिक विभाग : नाशिक व अहमदनगर (2)
7 87 89,853 29.20
मराठवाडा (गोदावरी खोरे) छ. संभाजीनगर विभाग : सर्व 8 जिल्हे 8 76 64,813 21.07
कोकण विभाग कोकण विभाग : सर्व 7 जिल्हे 7 50 30,728 9.98
खानदेश (तापी खोरे) नाशिक विभाग : धुळे, नंदुरबार, जळगाव (3) 3 25 24,915 8.10
एकूण 36 358 3,07,713 100.00

2. महत्त्वाचे मुद्दे - लक्षात ठेवा

  • प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम: 1) छत्रपती संभाजीनगर (64,813 चौ.किमी), 2) नाशिक, 3) पुणे, 4) नागपूर, 5) अमरावती, 6) कोकण (30,728 चौ.किमी सर्वात कमी).
  • महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन: 1980 पर्यंत राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. 1981 नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून आजअखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या 36 इतकी झाली आहे.
  • सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा.
  • गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा.
  • नंदुरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील व शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा.
  • कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना मिळून 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

3. कोकणातील किनाऱ्यांची लांबी (किमी)

  • रत्नागिरी: 237
  • रायगड: 122
  • सिंधुदुर्ग: 120
  • मुंबई व मुंबई उपनगर: 114
  • पालघर: 102
  • ठाणे: 25 किमी.

4. जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम

उतरता क्रम - मोठा ते लहान: 1) अहमदनगर (17,048 चौकिमी, सर्वाधिक), 2) पुणे (15,643 चौकिमी), 3) नाशिक (15,582 चौकिमी), 4) सोलापूर (14,895 चौकिमी), 5) गडचिरोली (14,412 चौकिमी).

चढता क्रम - लहान ते मोठा: 1) मुंबई शहर (157 चौकिमी, सर्वात कमी), 2) मुंबई उपनगर (446 चौकिमी), 3) भंडारा (3,895 चौकिमी), 4) ठाणे (4,214 चौकिमी), 5) हिंगोली (4,526 चौकिमी).

5. नवीन जिल्हा निर्मिती - तारीख व जुना-नवीन जिल्हा

विभाजनाचा दिवस जुना जिल्हा नवीन जिल्हा
1 मे 1981 रत्नागिरी सिंधुदुर्ग
1 मे 1981 औरंगाबाद (छ. संभाजीनगर) जालना
15 ऑगस्ट 1982 उस्मानाबाद (धाराशिव) लातूर
26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर गडचिरोली
1 ऑक्टोबर 1990 बृहन्मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगर
1 जुलै 1998 अकोला वाशिम
1 जुलै 1998 धुळे नंदुरबार
1 मे 1999 परभणी हिंगोली
1 मे 1999 भंडारा गोंदिया
1 ऑगस्ट 2014 ठाणे पालघर

महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल: कोकण, सह्याद्री आणि दख्खन पठार

For: MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनसेवा

प्रस्तावना

महाराष्ट्राचा अभ्यास करायचा म्हणजे आधी त्याचा भूगोल समजून घेतला पाहिजे. MPSC, तलाठी, पोलीस भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये 'महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल' यावर 4-5 प्रश्न हमखास विचारले जातात.

महाराष्ट्राचे मुख्यत्वे 3 प्राकृतिक विभाग पडतात - 1) कोकण किनारपट्टी, 2) सह्याद्री/पश्चिम घाट आणि 3) महाराष्ट्र पठार/दख्खन पठार.

1. कोकण किनारपट्टी - 'परशुरामाची भूमी'

महत्त्वाची आकडेवारी:

  • लांबी: 560 किमी, समुद्र किनारा: 720 किमी
  • क्षेत्रफळ: 30,728 चौ.किमी, सरासरी रुंदी: 55 ते 65 किमी
  • उंची: पश्चिमेकडे 15 मी, पूर्वेकडे 275 मी

कोकणची वैशिष्ट्ये:

कोकणाला 'अपरांत' म्हणजे पश्चिमेची भूमी म्हणतात. ही रिया प्रकारची किनारपट्टी आहे. उत्तरेकडे उल्हास नदीजवळ रुंदी सर्वात जास्त 100 किमी आहे. दक्षिण भागात जांभा दगड तर उत्तरेस तांबडी मृदा आढळते.

कोकणातील प्रमुख नद्या - उत्तरेकडून दक्षिणेकडे:

  • उत्तर कोकण: दमणगंगा, वरुळी, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा, भातसई, काळू, मुरबाडी, उल्हास
  • मध्य कोकण: पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, घोड, गंधार, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बाव
  • दक्षिण कोकण: काजळी, मुचकुंदी, काजवी, वाघोटन, शुक, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल

कोकणातील खाड्या आणि बीच:

खाडी = भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीत शिरते ती जागा.

  • पालघर: बोर्डी, डहाणू, सातपाटी बीच
  • मुंबई: मनोरी, मढ, दादर, गिरगाव, जुहू बीच
  • रायगड: अलिबाग, जंजिरा, मुरुड, श्रीवर्धन बीच
  • रत्नागिरी: हर्णे, गुहागर, गणपतीपुळे बीच
  • सिंधुदुर्ग: दाभोळी, तारकर्ली, मोचेमाड बीच

2. सह्याद्री / पश्चिम घाट - 'महाराष्ट्राचा कणा'

बेसिक माहिती:

  • निर्मिती: प्रस्तरभंगामुळे झाली.
  • जलविभाजक: पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्राला व पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात.
  • महाराष्ट्रातील वाटा: 12.2%, लांबी: महाराष्ट्रात 440 किमी
  • सरासरी उंची: 1200 ते 1300 मीटर

कळसूबाई - महाराष्ट्राचा एव्हरेस्ट:

उंची: 1646 मी / 5400 फूट. स्थान: नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर.

सह्याद्रीच्या 3 प्रमुख डोंगररांगा:

  1. सातमाळा-अजिंठा रांगा: तापीगोदावरी नदीचे खोरे वेगळे करते. जिल्हे: सातमाळा-नाशिक, अजिंठा-छ. संभाजीनगर.
  2. हरिश्चंद्र-बालाघाट रांगा: गोदावरीभीमा खोरे वेगळे करते. जिल्हे: अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड.
  3. महादेव डोंगररांगा: भीमाकृष्णा खोरे वेगळे करते. जिल्हे: सातारा, सांगली.

लक्षात ठेवायची ट्रिक: TA-GO-BHI-KRU

सातमाळा-अजिंठा = TApi-GOdavari
हरिश्चंद्र-बालाघाट = GOdavari-BHIma
महादेव = BHIma-KRUshna

सह्याद्रीतील महत्त्वाचे घाट - उत्तरेकडून दक्षिणेकडे:

थळ घाट > माळशेज घाट > बोर/खंडाळा घाट > वरंधा घाट > खंबाटकी घाट > पसरणी घाट > आंबेनळी घाट > कुंभार्ली घाट > अंबा घाट > फोंडा घाट > हनुमते घाट > आंबोली घाट > राम घाट

महाराष्ट्रातील उंच शिखरे:

शिखर उंची (मी) जिल्हा
कळसूबाई 1646 अहमदनगर
साल्हेर 1567 नाशिक
गवळदेव 1522 अहमदनगर
घनचक्कर 1509 अहमदनगर
धोडप 1472 नाशिक
महाबळेश्वर 1438 सातारा

सातपुडा रांगा:

महाराष्ट्राच्या उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यात. नर्मदा व तापी नदीची खोरी सातपुडामुळे वेगळी झाली. नंदुरबार मध्ये तोरणमाळ पठार, अमरावती मध्ये गाविलगड टेकड्या. बऱ्हाणपूर खिंड रावेर-बऱ्हाणपूर दरम्यान.

3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठार - '86% महाराष्ट्र'

बेसिक आकडेवारी - एका दमात पाठ कर:

  • स्थान: सह्याद्रीच्या पूर्वेस
  • व्याप्ती: महाराष्ट्राचा 86.7% भूभाग
  • क्षेत्रफळ: 2.76 लाख चौ.किमी
  • लांबी: पूर्व-पश्चिम 750 किमी, रुंदी: दक्षिण-उत्तर 700 किमी
  • निर्मिती: बेसाल्ट या अग्निज खडकापासून. पश्चिम सीमेजवळ जाडी 2 किमी.

सातपुड्यातील उंच शिखरे:

  • अस्तंभा: नंदुरबार जिल्हा - 1325 मी
  • बैराट: अमरावती, गाविलगड टेकड्यांत - 1177 मी

जिल्ह्यानुसार स्थानिक डोंगर - महत्त्वाचे लक्षात ठेव:

जिल्हा डोंगर/टेकड्या
नांदेड मुदखेड, निर्मल
गोंदिया दरेकसा, गायखुरी, गंगाझरी
नागपूर गरमसूर, पिंपरोळ, चिलकापार
अहमदनगर अदुला, बालेश्वर, कळसुबाई
अमरावती पोहरा, चिरोडी, जिनगड, धारणी
धुळे गाळणा, हनुमान डोंगर (1063 मी), धानोरा
गडचिरोली गडलगट्टा (967 मी), चिरोली, भामरागड, सुरजागड
सातारा महादेव, आगाशिव, बामणोली, मांढरदेव
जळगाव शिरसोली, हस्ती, चांदोर, घोडसगाव
वर्धा रावणदेव, हरणखुरी, तिगाव, गिरड

महाराष्ट्रातील इतर लहान पठारे - नाव + जिल्हा पेअर कर:

पठार जिल्हा पठार जिल्हा
बालाघाट अहमदनगर सासवड पुणे
मालेगाव नाशिक तोरणमाळ नंदुरबार
मसाई कोल्हापूर औंध, पाचगणी, कास सातारा
खानापूर सांगली

पठारावरील प्रमुख नद्यांची खोरे:

गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा-वैनगंगा.

लक्षात ठेवायची ट्रिक:

1. उंच शिखरांची ट्रिक:
असतंभा - नंदुरबार = अस-नं
बैराट - अमरावती = बै-अ

2. पठार-जिल्हा ट्रिक:
बालाघाट - आहमदनगर = बा-आ
सासवड - पुणे = सा-पु
तोरणमाळ - नंदुरबार = तो-नं
कास पठार - सातारा = का-सा

परीक्षेसाठी 2 सेकंदाचे प्रश्न

  1. महाराष्ट्राच्या किती % भूभाग दख्खन पठाराने व्यापला आहे? उत्तर: 86.7%
  2. हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि उंची किती? उत्तर: धुळे, 1063 मी
  3. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर: सातारा
  4. हरिश्चंद्र-बालाघाट रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळी झाली? उत्तर: गोदावरी व भीमा
  5. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? उत्तर: साल्हेर, 1567 मी

समारोप

तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्राच्या तीनही प्राकृतिक विभागांचा एकत्रित आढावा. कोकणची 720 किमी लांब किनारपट्टी, सह्याद्रीचा 1646 मीटर उंच कळसूबाई आणि 86.7% भूभाग व्यापणारे दख्खन पठार - हे तीन मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? Comment मध्ये नक्की सांगा.

Blog Tags:

Maharashtra Geography MPSC Notes in Marathi Kokan Sahyadri Plateau महाराष्ट्राचा भूगोल Talathi Bharti Police Bharti Abhyas

📚 MPSC Geography Notes - Important Links

MPSC, UPSC, Police Bharti, Talathi Bharti परीक्षांसाठी भूगोल विषयाच्या संपूर्ण नोट्स, PDF आणि महत्त्वाची माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.

✅ MPSC, UPSC, Police Bharti आणि Talathi Bharti साठी रोज नवीन Notes व PDF मिळवा.

🌐 www.visiongovacademy.online

Post a Comment

Previous Post Next Post