वातावरण : तापमान, हवामान आणि वारे
विषय: जगाचा भूगोल
प्रस्तावना
मानवाच्या जीवनासाठी वातावरण अत्यंत महत्त्वाचे आहे. वातावरणामुळे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेली हवा, पाणी, हवामानातील बदल आणि सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण मिळते. वातावरणातील बदलांमुळे तापमान, पाऊस, वारे आणि ऋतू निर्माण होतात. या लेखात आपण वातावरणाची रचना, तापमानाचे कटिबंध, वायुदाबाचे पट्टे, विविध प्रकारचे वारे, स्थानिक वारे आणि जगातील प्रमुख चक्रीवादळे यांची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत.
वातावरण
पृथ्वीभोवती असलेल्या अनेक वायूंच्या आवरणास वातावरण म्हणतात. पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी सुमारे 320 किमी इतकी आहे.
वातावरणाची रचना
तापमानातील बदलानुसार वातावरणाचे तीन थरात वर्गीकरण केले जाते.
अ) क्षोभस्तर (Troposphere)
- हा पृथ्वीला लागून असलेला वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे.
- सरासरी जाडी : 10 ते 12 कि.मी.
- यामध्ये वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी 80% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी 90% बाष्प आढळते.
- उदा. कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प इत्यादी घटक क्षोभस्तरात सर्वाधिक आढळतात.
- ढग, धुके, पाऊस, वादळ, वीज, हिमवृष्टी या नैसर्गिक अविघटनांनी निर्मिती क्षोभस्तरात होते.
- वातावरणातील एकूण ओझोनपैकी 10% ओझोन क्षोभस्तरात आढळतो.
- क्षोभस्तरात दर 1 किमी उंचीवर तापमान 6.5°C ने कमी-कमी होत जाते.
- जेटविमाने आणि (वाणिज्यिक जेट विमाने) क्षोभस्तरातूनच प्रवास करतात.
ब) समतापस्तर (Tropopause)
क्षोभस्तर व स्थितांबर यांना अलग करणारा वायूंचा हलका थर. क्षोभस्तराच्या या वरच्या थरात हवा विरळ असते. त्यामुळे या थरात उंचीनुसार तापमानात होणारी घट मंदावते आणि तापमान स्थिर राहते. म्हणून या थरास तपस्तब्धी असे म्हणतात.
क) स्थितांबर (Stratosphere)
- क्षोभस्तराच्या वर 50 किमी उंचीचा वातावरणाचा थर.
- येथील हवा शुष्क असून तापमान काही उंचीपर्यंत स्थिर असते. या थरात वायूंचे प्रमाण सुमारे 19% असते.
- वातावरणातील एकूण ओझोनपैकी 90% ओझोन स्थितांबरात आढळतो.
- ओझोन आवरण (ओझोनाबर) : 1913 साली फ्रेंच संशोधक चार्ल्स फॅब्री आणि हेन्रि बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला.
- भूपृष्ठापासून 15 ते 30 किमी पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. (हवेच्या दशलक्ष रेणूंमागे ओझोनचे रेणू : 2-8)
- स्थितांबरातील या ओझोन थरामध्ये जीवसृष्टीस घातक असलेली सूर्याची 97 ते 99% अतिनील किरणे (UV Rays) व त्यांमधील 'UV-B' हा घातक घटक शोषले जातात. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे या घातक किरणांपासून रक्षण होते.
- ओझोन छिद्र : अतिनील किरणांचे सातत्याने शोषण करत असल्याने वातावरणातील ओझोन थरात घट होते व ती दीर्घकाळ टिकून राहते. यासच ओझोन छिद्र म्हणतात. उदा. अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्र.
- ओझोन थराच्या ऱ्हास कारणीभूत घटक : नायट्रिक ऑक्साइड (NO), नायट्रस ऑक्साइड (N₂O), क्लोरीन (Cl), ब्रोमीन (Br), क्लोरोफ्लुरो कार्बन (CFC), हायड्रॉक्सिल (-OH).
- 2009 साली नायट्रस ऑक्साइड (N₂O) या संयुगाने ओझोन थराचा सर्वाधिक ऱ्हास केला.
- उत्तर गोलार्धातील ओझोनचे प्रमाण दर 10 वर्षांनी 4 टक्क्यांनी कमी होत आहे.
- 1987 च्या मॉन्ट्रियल करारात ओझोनला धोकादायक असणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी करण्याचे ध्येय निश्चित.
- 2060 पर्यंत हा थर पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे.
- 16 सप्टेंबर : जागतिक ओझोन संरक्षण दिन.
ड) दलांबर (Thermosphere)
स्थितांबराच्या वर असलेल्या वातावरणाच्या या थरात हवा विरळ असून उंचीनुसार तापमान अधिक वाढते.
इ) आयनांबर (Ionosphere)
दलांबरावरील वातावरणाचा थर. आयनांबरातील हवेचे कण विद्युतभारित असल्याने येथून रेडिओलहरी (Radiowaves) व विद्युतचुंबकीय लहरी (Electromagnetic waves) पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात. पर्यायाने, संदेशवहनासाठी या थराचा उपयोग केला जातो.
ई) बाह्यांबर (Exosphere)
आयनांबरापलीकडे 440 किमी पेक्षा अधिक उंचीवरील वातावरणाचा थर.
पृथ्वीवरील तापमानाचे कटिबंध (पट्टे)
- 90° - उत्तर ध्रुववृत्त, दक्षिण ध्रुववृत्त
- 66½° उ. - आर्क्टिक वृत्त, शीत कटिबंध
- 23½° उ. - कर्कवृत्त, समशीतोष्ण कटिबंध (उत्तर)
- 0° - विषुववृत्त, उष्ण कटिबंध
- 23½° द. - मकरवृत्त, समशीतोष्ण कटिबंध (दक्षिण)
- 66½° द. - अंटार्क्टिक वृत्त, शीत कटिबंध
तापमानाचा वातावरणावरील प्रभाव
- दिवसातील सर्वाधिक तापमान दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत असते.
- तापमान या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते.
- तापमान वातावरणाचा दाब यांच्यातील संबंध व्यस्त प्रकारचा आहे.
- तापमान वाढल्यास, वातावरण प्रसरण पावून त्याची घनता कमी होते आणि वायुदाब कमी होतो. याउलट हवेचे तापमान कमी झाल्यास, वातावरणाची घनता वाढते व दाब वाढतो.
- पृथ्वीपासून जसजसे उंच जावे, तसे वातावरण विरळ होत जाऊन त्याची घनता कमी होते. पर्यायाने, उंचावर वातावरणीय दाब कमी असतो.
- उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा वातावरणाचा दाब कमी असतो.
- वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वायुदाबमापक हे उपकरण वापरतात.
पृथ्वीवरील वायुदाबाचे पट्टे
- विषुववृत्तीय पट्टा (कमी वायुदाब - डोलड्रूम) : विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान. यास 'डोलड्रूम' व 'ITCZ' असेही म्हणतात. येथे दररोज अभिसरण प्रकारचा मुसळधार पाऊस पडतो.
- मध्य अक्षांशीय/उपोष्ण कटिबंधीय पट्टा (जास्त वायुदाब) : 25° ते 35° अक्षांशादरम्यान. यांना 'शांत पट्टे' किंवा 'अश्व अक्षवृत्ते' म्हणतात.
- 60° अक्षवृत्ताजवळील (उपध्रुवीय) कमी दाबाचा पट्टा : 60° उत्तर व 60° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान.
- ध्रुवांजवळील जास्त दाबाचे पट्टे : 90° अक्षांशांदरम्यान. अतिशीत तापमानांमुळे येथे जास्त दाब असतो.
वाऱ्यांचे प्रकार
1. प्रहेय वारे : व्यापारी वारे, पश्चिम वारे, ध्रुवीय पूर्व वारे
2. स्थानिक वारे : दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे वारे, मतलाई वारे
3. मान्सून वारे : नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे
4. हंगामी वारे : आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे
अ) प्रहेय वारे
1) व्यापारी वारे (पूर्वीय वारे) : 25° ते 35° अक्षवृत्तांकडून विषुववृत्ताकडे वाहणारे वारे. दिशा: पूर्वेकडून पश्चिमेकडे. उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नैऋत्येकडे, दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे.
2) पश्चिम वारे : 25° ते 35° अक्षवृत्तांकडून 60° अक्षवृत्ताकडे वाहणारे वारे. दिशा: पश्चिमेकडून पूर्वेकडे.
अश्व अक्षांश (Horse Latitude) : 25° ते 35° अक्षवृत्तांदरम्यानचा शांत जास्त दाबाचा पट्टा.
गर्जणारे चाळीस (Roaring Forties) : 40° दक्षिण अक्षवृत्तापलीकडील वेगवान पश्चिम वारे.
खवळले पन्नास (Furious Fifties) : 50° दक्षिण अक्षवृत्तापलीकडील सर्वाधिक वेगाचे वारे.
कर्कश साठ (Screeching Sixties) : 60° दक्षिण अक्षवृत्तापलीकडील कर्कश गर्जना करणारे वारे.
3) ध्रुवीय पूर्व वारे : दोन्ही ध्रुवांकडून 60° अक्षांशाकडे मंदपणे वाहणारे. अतिथंड व कोरडे.
ब) स्थानिक वारे
1) दरीय वारे : दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे.
2) पर्वतीय वारे : रात्री पर्वत शिखराकडून दरीकडे.
3) खारे वारे : दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.
4) मतलाई वारे : रात्री जमिनीकडून समुद्राकडे.
क) मान्सून वारे
नैऋत्य मान्सून वारे : जून ते सप्टेंबर. महासागरावरून येतात म्हणून बाष्पयुक्त. भारत, श्रीलंका, म्यानमार इ. देशात पाऊस.
ईशान्य मान्सून वारे : हिवाळ्यात जमिनीकडून येतात म्हणून थंड व कोरडे. बंगालच्या उपसागरावरून येताना भारताच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊस.
ड) हंगामी वारे
आवर्त वारे : मध्यभागी कमी दाब 'L'. चक्राकार वेगाने वाहतात. यांनाच वादळ/चक्रीवादळ म्हणतात. उदा. टायफून, हरिकन्स.
प्रत्यावर्त वारे : मध्यभागी जास्त दाब 'H'. गती मंद. हवा स्वच्छ व कोरडी.
जगातील प्रमुख स्थानिक वारे
| अ.क्र. | वारे | प्रकार | प्रभावक्षेत्र व वैशिष्ट्ये |
|---|---|---|---|
| 1 | लू (Loo) | उष्ण-कोरडे | उत्तर भारतीय मैदानात उन्हाळ्यात दुपारी |
| 2 | फॉन (Fohn) | उष्ण-कोरडे | आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात |
| 3 | चिनूक (Chinook) | उबदार-कोरडे | रॉकी पर्वत - 'Snow Eater' |
| 4 | सिमूम (Simoom) | उष्ण-कोरडे | सहारा व अरेबियन वाळवंट - विध्वंसक |
| 5 | बोरा (Bora) | थंड-कोरडे | आल्प्स ते इटली किनारा |
| 6 | मिस्ट्रल (Mistral) | थंड-कोरडे | फ्रान्स, स्पेन किनारा |
| 7 | पांपेरो (Pampero) | थंड-कोरडे | अर्जेंटिना पंपास प्रदेश |
जगातील प्रमुख चक्रीवादळे 2023
- मिचाँग (Michaung) : 1-6 डिसेंबर, बंगाल उपसागर. तामिळनाडू, AP. 17 बळी. नाव: म्यानमार. अर्थ: सामर्थ्य व लवचिकता
- मिधिली (Midhilli) : 14-18 नोव्हेंबर, बंगाल उपसागर. बांगलादेश. नाव: मालदीव. अर्थ: मोठे झाड
- ऑटिस (Otis) : 22-25 ऑक्टोबर, प्रशांत महासागर. मेक्सिको
- हामून (Hamoon) : 22-24 ऑक्टोबर, बंगाल उपसागर. नाव: इराण. अर्थ: मोठे मैदान
- तेज (Tej) : 20-24 ऑक्टोबर, अरबी समुद्र. नाव: भारत
- डॅनियल (Daniel) : 4-12 सप्टेंबर, भूमध्य समुद्र. नाव: ग्रीस
- ली (Lee) : 17 सप्टेंबर, कॅनडा नोव्हा स्कोटिया
- खानून (Khanun) : जुलै, जपान. नाव: थायलंड. अर्थ: फणस
- बिपरजॉय (Biparjoy) : 6-19 जून, अरबी समुद्र. 9 राज्ये. नाव: बांगलादेश. अर्थ: आपत्ती
निष्कर्ष
वातावरण हा पृथ्वीचा संरक्षक कवच आहे. वातावरणाच्या विविध थरांमुळे, वायुदाबाच्या पट्ट्यांमुळे आणि वाऱ्यांच्या विविध प्रकारांमुळे पृथ्वीवर हवामान आणि ऋतू निर्माण होतात. मान्सून वारे भारतासारख्या देशांच्या शेतीसाठी जीवनदायी आहेत, तर चक्रीवादळे आणि स्थानिक वारे आपत्तीही आणू शकतात. म्हणून वातावरणाचा अभ्यास करणे आणि ओझोन थरासारख्या नैसर्गिक घटकांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. योग्य नियोजन आणि पर्यावरण संरक्षणामुळे आपण निसर्गाशी समतोल साधू शकतो.
📚 Geography व स्पर्धा परीक्षा नोट्स
- 👉 MPSC/UPSC संपूर्ण अभ्यास साहित्य
- 👉 संपूर्ण नोट्स (Complete Notes)
- 👉 भूगोल संपूर्ण नोट्स (Geography Notes)
- 👉 हॉर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait)
- 👉 भूकंप व ज्वालामुखी
- 👉 पृथ्वी, अक्षवृत्त व रेखावृत्त
- 👉 जागतिक नदी प्रणाली
- 👉 संयुक्त राष्ट्र संघ व आंतरराष्ट्रीय संस्था
वरील सर्व नोट्स MPSC, PSI, STI, ASO, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, ZP, तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

Post a Comment